त्रिटन MM#3 चा कसा पकडायचा? | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

त्यापैकी बहुतेक लहान बटाट्याच्या आकाराचे बर्फ आणि दगडांचे तुकडे आहेत.

काही नेपच्यूनपासून इतके दूर आहेत की त्यांना नेपच्यूनभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 29 वर्षे लागतात.

त्यापैकी जवळजवळ सगळेच नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणात बंदिस्त झालेले लघुग्रह आहेत.

नेपच्यूनच्या भोवतालच्या सर्व द्रव्यापैकी 99.5 % द्रव्य ट्रायटनमध्ये एकत्रित झालेले आहे.

तो ज्ञात असलेल्या सर्व ग्रहात 7वा मोठा व सूर्य मालिकेतील त्याच्याहून…

लहान लघुग्रहातील सर्वांचे द्रव्य एकत्र केल्यानंतर होणाऱ्या वजनापेक्षा जास्त वजनदार लघुग्रह आहे.

त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ हे रशिया आणि ऑस्ट्रेलिया या दोघांच्या भूपृष्ठांइतके मोठे आहे.

तसेच सूर्यमालिकेतील आपल्याला माहीत असलेल्या भूविज्ञानाच्या दृष्टीने सक्रिय असलेल्या केवळ चार वस्तूंपैकी ट्रायटन हा एक लघुग्रह आहे.

त्याचप्रमाणे ट्रायटन हा नेपच्यूनभोवती चुकीच्या दिशेने म्हणजे नेपच्यून ज्या दिशेने भ्रमण करतो त्याच्या विरुद्ध दिशेने भ्रमण करतो.

ट्रायटनसारख्या सूर्यमालिकेतील मोठ्या वस्तूच्या संबंधात ही बाब एकमेव ठरते.

यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ट्रायटन हा नेहमीच नेपच्यूनचा उपग्रह होता असे नाही परंतु…

तो बहुधा नेपच्यूनला शरण गेलेला बटू लघुग्रह होता असावा…

ज्या वेळी सूर्यामालेच्या निर्मितीला फार काळ लोटला नव्हता व तिचे स्वरूप निश्चित झाले नव्हते त्या काळची ही गोष्ट आहे.

ज्या काळात नेपच्यूनचे सूर्यमालेच्या बाह्यभागात स्थलांतर झाले त्या काळात…

ट्रायटन हा द्वैती प्रणालीचा भाग होता ही उपपत्ती सर्वात लोकप्रिय आहे.

नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणाचा द्वैती प्रणालीत अडथळा निर्माण होऊन इतर घटक बेचकीतून फेकल्याप्रमाणे अवकाशात फेकले गेले. ..

असे होतानाच ट्रायटन नेपच्यूनच्या कक्षेत लोटला गेला.

यामुळे नेपच्यूनच्या इतर उपग्रहांच्या कक्षा प्रचंड प्रमाणात अस्ताव्यस्त झाल्या…

आणि बहुतेक ते नेपच्यूपासून दूर लोटले गेले आसावेत…

किंवा त्यांची नेपच्यूनशी टक्कर झाली असावी वा ते नेपच्यूनवर आदळले असावेत.

नेपच्यूनच्या उपग्रहांवर ट्रायटनचा अंमल का आहे याचे यातून स्पष्टीकरण मिळते.

पण एके दिवशी याचा शेवट होईल.

नेपच्यून ट्रायटनची गती मंद करीत आहे .

आणि अर्थातच

तो नेपच्यूनला धडकेल …

किंवा नेपच्यूच्या गुरुत्वाकर्षणाने भरडला जाऊन त्याचे शनीच्या रिंगणासारखे प्रणालीभोवती प्रचंड रिगण तयार होईल.

म्हणूनच ट्रायटनवर स्थावर मालमत्ता विकत घेऊ नका.

मॅद्स हेगमान निल्सन यांनी इंग्रजी मथळे निश्चत केले - 2015

उपशीर्षके Amara.org समूहाने दिली आहेत.