जीवन म्हणजे काय? खरोखरच मृत्यू होतो काय? | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

जीवन हे मूलतः मृत अशा कहीतरीपेक्षा भिन्न आहे; खरंय् काय?

भौतिकीतज्ज्ञ एर्विन श्रोडिंगर यांनी जीवनाची पुढील व्याख्या दिली आहे.

जिवंत घटक अनागोंदी आणि समतोल यांत होऊ घातलेला ऱ्हास टाळतात.

काय आहे याचा अर्थ?

विश्व ही तुम्ही उतरवून घेतलेली दुमड आहे असं आपण मानून चालूया.

सुरुवातीला ती नियमबद्ध होती आणि काळ जाता जाता ती अधिकाधिक गोंधळयुक्त होत गेली.

ऊर्जा वापरून तुम्ही त्यात सुव्यवस्था निर्माण करून ती नीट करू शकता.

जिवंत गोष्टी हेच तर करतात.

पण जीवन म्हणजे काय?

या ग्रहावरील प्रत्येक जिवंत गोष्ट पेशींची बनलेली आहे.

मूलतः पेशी ही प्रोटीनांनी बांधलेली स्वयंचलित यंत्रणा आहे. खूपच लहान असल्याने काहीही वाटणे वा अनुभवणे तिला शक्या होत नाही

आपण जगण्याचे जे गुणधर्म निश्चित केले आहेत ते सर्व तिच्यात आहेत.

क्रमबद्धता निर्माण करणारे, भोवतालापासून विभक्त ठेवणारे आवरण… भिंत तिला आहे.

ती स्वतःला नियंत्रित करते आणि सातत्याने स्थिती टिकवण्यासाठी स्वतःची देखभाल करते..

जिवंत रहाण्यासाठी ती काहीबाही खाते.

ती वाढते … विकास पावते.

ती पर्यावरणाशी आंतरक्रिया करते.

तिला उत्क्रांतीला सामोरे जावे लागते.

ती स्वतःसारखे अनेक बनवते.

पण ज्या सर्व गोष्टींमुळे पेशी बनते त्याचा कोणताही भाग जिवंत नसतो.

पेशीचा हा भाग इतर गोष्टींशी रासायनिक रीत्या अभिक्रिया करतो आणि नव्या क्रिया घडवून आणतो.

या क्रिया इतर क्रिया सुरू करतात आणि नंतर त्या आणखी क्रिया सुरू करतात.

प्रत्येक पेशीत दर सेकंदाला अनेक दशलक्ष रासायनिक क्रिया घडत असतात.

यातून जटील संघटन तयार होते.

कोणतीही पेशी हजारो प्रकारची प्रोटिने बांधते.

यातील काही साधी असतात तर काही गुंतागुंतीच्या सूक्ष्मयंत्रणा असतात.

प्रति तास 100 कि मी गतीने धावणाऱ्या गाडीची कल्पना करा. त्याचवेळी ती

रस्त्यावरील काहीबाही गोळा करून स्वतःचा प्रत्येक भाग सातत्याने पुन्हा घडवत आहे.

पेशी नेमकं हेच करते.

परंतु पेशीचा एकही भाग जिवंत नाही.

घडणीसाठी लागलेली प्रत्येक गोष्ट विश्वाच्या नियमांनुसार हालचाल करणारे मृत द्रव्य आहे.

म्हणून जीवन म्हणजे घडत असलेल्या या सर्व अभिक्रिया- प्रक्रियांची गोळाबेरीज आहे काय?

सरतेशेवटी प्रत्येक पेशी मरण पावते.

नव्या स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या घटकांची निर्मिती करून याला प्रतिबंध करणे हे या संपूर्ण प्रक्रियेचे ध्येय असते.

आणि आम्ही आता डीएनए बद्दल बोलतो आहेत.

तसं पाहू गेल्यास जीवन म्हणजे भरपूर प्रमाणात असणारी आनुवंशिक माहिती वागवत रहाणारी गोष्ट आहे.

प्रत्येक जिवंत गोष्ट उत्क्रांतीला सामोरी जाते

आणि त्यातून विसकित होणारा डीएन्ए ही या खेळात टिकून रहाणारी भोवतालातील सर्वात उत्तम जिवंत गोष्ट असते.

म्हणजे डीएन्ए हेच जीवन आहे काय?

जर तुम्ही डीएन्एला त्याच्या फोलपटातून सोलून काढले तर तो नक्कीच खूप जटील रेणू आहे.

पण तो स्वतः होऊन काहीही करत नाही.

येथेच विषाणू सर्व काही जास्त गुंतागुंतीचे करून ठेवतात.

ते मुळातच लहान फोलपटात असलेल्या आरएन्ए किंवा डीएन्एने विणलेल्या दोऱ्या असतात

आणि काहीही करण्यासाठी त्यांना पेशींची गरज असते.

त्यांना जिवंत किंवा मृत म्हणून गणायचे याची आपल्याला अजूनही खात्री नाही.

असे असले तरी पृथ्वीवर 225,000,000 घनमीटर विषाणू आहेत.

बहुधा आपण त्यांच्या विषयी काय विचार करतो याची त्यांना पर्वा नसावी.

मृतावर हल्ला करून त्याला पुनर्चलीत करणारेही काही विषाणू आहेत.

पुनर्चलीत मृत त्यांच्यासाठी पोशिंदा बनतो आणि जिवंत आणि मृत यातील सीमा अधिकच धूसर होते.

उदाहरणादाखल सूत्रकणिकांचा विचार करू.

त्या बहुतेक गुंतागुंतींच्या पेशींसाठी ऊर्जा निर्मिती यंत्रणा आहेत.

त्या पूर्वी मुक्त जगणारे बॅक्टेरिया होत्या. त्यांनी मोठ्या पेशींशी सहकार्य केले.

अजूनही त्यांना स्वतःचा डीएन्ए आहे आणि त्या स्वतःचे गुणन करतात परंतु

त्या आता जिवंत नाहीत. त्या मृत आहेत.

स्वतःचा डीएन्ए टिकवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचा विनिमय केला.

म्हणजेच जिवंत गोष्टी स्वतःच्या आनुवंशिक संकेताला टिकवण्यात

लाभदायी ठरत असेल तर स्वतःला मृत म्हणून उत्क्रांत करू शकतात.

याचा अर्थ आसाही होतो की अस्तित्वाचे सातत्य टिकवण्यासाठी खात्रीचे व्यवस्थापन करणारी माहिती हेच कदाचित जीवन आहे

मग कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे काय आहे?

आपल्या सर्वात साधारण व्याख्यांनुसार आपण संगणकांत .

कृत्रिम जीवन निर्माण करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत.

आपण त्यासाठी उभारलेले तंत्रज्ञान तेथे पोहोचण्याला किती वेळ लागेल एवढाच काय तो प्रश्न आहे.

आणि ही काही विज्ञान काल्पनिकाही नाही.

अनेक हुशार लोक त्यादृष्टीने कृतिशील राहून काम करत आहेत.

तुम्ही असाही युक्तिवाद कराल की संगणकीय विषाणू जिवंत आहेत.

हँ… ठीक आहे. तर मग जीवन म्हणजे काय?

वस्तू, प्रक्रिया, डीएन्ए की माहिती?

हो फारच वेगाने गोंधळाचे होत आहे.

एक गोष्ट मात्र निश्चित आहे.

निर्जीव घटकांत काही अभौतिक घटक असल्यामुळे

किंवा त्यांचे जिवंत वस्तूंपेक्षा भिन्न

तत्त्वांच्या आधारे होत असेल ही

कल्पना चुकीची ठरण्याची शक्यता आहे.

मानवाने चार्लस डार्विनच्यापूर्वी आपल्यात काही जादूचे आपल्याला विशेष बनवणारे आहे

असे समजून स्वतःत व इतर सर्व जीवांत फरक रेषा आखून घेतली होती.

जेव्हा आपल्याला आपण, प्रत्येक जिवंत असणाऱ्यासारखेच, उत्क्रांतीची निर्मिती आहोत,

हे स्वीकारावे लागले तेव्हा आपण वेगळी रेषा आखली.

पण संगणक काय करू शकतात आणि जीवन कसे काम करते याबद्द्ल जसजसे आपण अधिक शिकतो आहोत तसतसे आपले

जीवनाचे आपण केलेले वर्णन ज्याला तंतोतंत लागू पडेल असे पहिले यंत्र निर्माण करण्याच्या जास्तीत जास्त जवळ जात आहोत.

आणि त्याच प्रमाणात आपली स्वतःची प्रतिमा पुन्हा धोक्यात येत आहे.

आणि आज ना उद्या कधीतरी हे होणारच आहे.

आणि तुमच्यासाठी आणखी एक प्रश्नः

जर विश्वातील यच्चयावत गोष्टी समान गोष्टींपासून बनलेल्या असतील तर

विश्वातील सर्व काही मृत आहे

किंवा विश्वातील सर्व काही जिवंत आहे असा त्याचा अर्थ होतो काय?

हा फक्त जटीलतेचा प्रश्न आहे काय?

सर्व प्रथम आपण जर कधीही जिवंत नव्हतोच

तर त्यामुळे आपण कधीच मरू शकणार नाही काय?

जीवन व मरण हा असंबद्ध प्रश्न आहे आणि आपण अद्यापही त्याची दखल घेतलेली नाही असं आहे काय?

आपण विचार करत होतो त्यापेक्षाही आपण खूपच अधिक प्रमाणात आपल्या भोवतीच्या विश्वाचा भाग आहोत अशी शक्यता आहे काय?

आमच्याकडे पाहू नका. तुमच्यासाठी आमच्यापाशी उत्तर नाही.

तुम्हाला विचार करण्यासाठी आमच्याकडे फक्त प्रश्न आहेत.

काहीही झालं ती याप्रमाणे प्रश्नांसंबंधाने विचार करताना आपल्याला जिवंत असल्यासारखे वाटते

आणि ते आपल्याला समाधानही देते.

Amara.org समूहाकडून उपशीर्षके