काहीतरी काय आहे? | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

सोप्या प्रश्नांची उत्तरं सर्वात कठीण असतात.

एखादी गोष्ट म्हणजे काय असतं?

घटना का घडतात?

त्या ज्या रीतीने घडतात त्याच रीतीने त्या का घडतात?

चला… आपण पायरी पायरीने याचा विचार करण्याचा प्रयत्न करू.

तुम्ही कशाचे बनलेले आहात?

तुम्ही रेणूंपासून बनलेले द्रव्य आहात.

हे द्रव्य अणूंचे बनलेले आहे आणि अणू हे मूलभूत कणांचे बनलेले आहेत.

पण जर मूलभूत कण ही अस्तित्वात असणारी सर्वात लहान गोष्ट आहे

तर ते कशाचे बनलेले आहेत?

या सोप्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण अगदी सोपी सुरुवात करू या… आपण हे विश्व पुसून टाकू या.

द्रव्य, प्रतिद्रव्य, प्रारण, कण… जे काही आहे ते सगळं…

चला तर… आता अजिबात काहीही नसलेल्याकडे, जवळून व बारकाईने पाहू या.

रिक्त… रिकामं… अवकाश म्हणजे काय?

पोकळी म्हणतात ती हीच आहे काय?

येथे अणू नाहीत, द्रव्य नाही, काहीही नाही

हे खरोखरच रिकामं आहे काय?

काहीही नाही म्हणजेच शून्य आपल्याला सर्वकाही बांधण्यासाठी साहित्य पुरवतं.

म्हणजेच रिक्त अवकाश हे बरचसं विस्तृत, शांत महासागरासारखं आहे.

काही घडत नसताना आणि पाणी अगदी स्थिर असताना

जोरदार वारा काही तीव्र लाटा निर्माण करतो.

आपलं विश्व बरचसं याप्रमाणेच कार्य करतं.

तेथे सर्वत्र हे महासागर आहेत

भौतिकीतज्ज्ञ त्यांना ‘क्षेत्रे’ म्हणतात.

हे कदाचित विचित्र आणि नवीन वाटेल.

पण उदाहरणादाखल प्रारणाचा विचार करा.

ज्याला विद्युतचुंबकीय क्षेत्र म्हणतात ते क्षोभित केलं तर एक छोटा पीळ निर्माण केला जातो.

हा कण असतो आणि त्याला आपण फोटॉन म्हणतो.

आपण ज्याचा प्रकाश म्हणून विचार करतो तो हा कण प्रारणवाहक आहे.

हा काही एकमेव प्रकाश नाही.

विश्वातील प्रत्येक कण याच मार्गाने तयार होतो.

द्रव्याच्या सर्वांपैकी प्रत्येक कणाचे स्वतःचा नियम असलेले एक क्षेत्र असते.

उदाहरणार्थ, विद्युतचुंबकीय क्षेत्रांच्या सोबतीने

विश्वात सर्वत्र इलेक्ट्रॉन क्षेत्र असते

आणि त्या क्षेत्रात असलेले छोटे पीळ हे इलेक्ट्रॉन आहेत.

आपल्या विश्वातील सर्व क्षेत्रे मिळून 17 प्रकारचे कण निर्माण करू शकतात.

या कणांचे तीन गटात विभाजन करता येते.

लेप्टॉन, क्वार्क् आणि बोसॉन असे हे तीन गट आहेत.

लेप्टॉन हे इल्क्ट्रॉन्स आणि त्यांना जवळ असणाऱ्या म्युऑन आणि टाऊ कणांचे बनलेले आहेत.

प्रत्येक लेप्टॉन न्युट्रिनोशी निगडित असतो.

दुसरे आहेत क्वार्क.

क्वार्क हा कणांच्या केंद्रांचे कुटुंब आहे.

सर्व क्वार्क नेहमीच गट आणि जोड्यांच्या एकत्र बांधलेल्या स्वरूपात आढळतात.

ते प्रोटॉन आणि न्युट्रॉन बनवतात. यांचे नंतर अणूकेंद्र बनवले जाते.

अनेक इलेक्ट्रॉन आणि क्वार्क एकत्र मिळून द्रव्याचे कण असतात.

तुम्ही पाहत असलेल्या सर्व गोष्टी ते बनवतात.

श्वासावाटे तुम्ही घेत असलेली हवा,

तुम्हाला ऊब देणारा सूर्य,

तुम्ही ज्या गोष्टी करायला हव्यात त्यापासून तुम्हाला विचलीत करणारा, अगदी या क्षणी तुम्ही वापरत असलेला संगणक अत्यादी सर्व गोष्टी त्यात येतात.

पण गोष्टी फक्त अस्तित्वात असत नाहीत

तर त्या काही ना काही करत असतात.

काही तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहायचे तर

गोष्टीचे वर्तन तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असतो.

याच संबंधात बोसॉन आणि त्यांना निर्माण करणाऱ्या क्षेत्रांची भूमिका सुरू होते.

क्वार्क आणि लेप्टॉन हे द्रव्य क्षेत्रांचे बनलेले आहेत

तर बोसॉन बलक्षेत्रांनी बनवलेले आहेत.

विश्वाच्या नियमाला आपण बल म्हणतो

आणि आतापर्यंत आपण चार मूलभूत बले शोधली आहेत.

विद्युतचुंबकीय, गुरुत्व आणि जोमदार आणि क्षीण केंद्रीय अशी ही बले आहेत.

कण ही प्यादी असलेल्या

विश्वाच्या खेळाचे

ही बले म्हणजे नियम-ग्रंथ आहेत.

ते कणांना त्यांनी काय करायचे आणि कसे करायचे हे सांगतात.

उंट तिरपे चालतात, वस्तुमानरहित कण प्रकाशाच्या वेगाने चालतात,

घोडे उड्या मारतात आणि गुरुत्व आकर्षित करते.

कणांच्या आंतरक्रिया कशा रीतीने होतात त्यांचे नियम म्हणजे ही बले आहेत.

या आंतरक्रिया शेवटी विश्वात आपण पाहत असलेल्या

मोठ्या वस्तूंची जुळणी घडून यायला मदत देणारे नियम करतात.

गुरुत्वाकर्षण हा काही फक्त सूर्याभोवती भ्रमण करण्याचा

किंवा झाडावरून सफरचंद पडण्याचा नियम नाही.

हा नियम सांगतो की द्रव्याच्या आकर्षणांमुळे ग्रह व तारे रचले जातात.

विद्युतचुंबकत्व हा केवळ चुंबकाला आकर्षित

वा प्रतिकर्षित करणारा, किंवा विजेच्या दिव्यातील प्रवाहाचे निंयंत्रण करणारा नियम नाही.

तो प्रत्येक रेणूच्या उभारणीचं आणि सर्व अणू बॉम्बचं नियमन करण्याचं काम करतो.

बले आणि कण एकत्रपणे अस्तित्व रचण्याची खेळणी आहेत.

तुम्ही म्हणू शकता की बोसॉन हे द्रव्य आणि कण यांना

जोडणारे व त्यांच्यादरम्यान ये-जा करणारे दूत आहेत.

बोसॉनमार्फत ते परस्परांना कशा रीताने हालचाल करायची हे सांगतात.

प्रत्येक कण इतर कणांशी आंतरक्रिया

करताना बलांचा विशिष्ट संच वापरतो.

उदाहरणार्थ क्वार्क परस्परांशी आंतरक्रिया करू शकतात.

त्यासाठी विद्युतचुंबकीय आणि जोमदार केंद्रीय बलांचा उपयोग करतात.

पण इलेक्ट्रॉन कोणतेही जोमदार बल वापरत नाही.

तो फक्त विद्युतचुंबकीय बल वापरतो.

क्वार्क जोमदार बोसॉनची देवाण-घेवाण करून

परस्परांबरोबर जोमदार केंद्रीय आकर्षणाबाबत संप्रेषण करतात

प्रोटॉन्सच्या मदतीने क्वार्क विद्युतचुंबकीय क्षेत्रातील

इलेक्ट्रॉनच्या बदल्यात फोटॉन देतात.

अशा रीतीने क्वार्क केंद्रांत अडकून रहातात

त्याच वेळी इलेक्ट्रॉन त्यांच्या .

विद्युत आकर्षणामुळे जोडलेले राहून अणूंची रचना करत रहातात

जरी विश्वात जीवन, अतिदिप्तनवतारा, संगणक यांसारख्या

वरवर जटील वाटणाऱ्या भरपूर गुंतागुतीच्या घटना पाहायला मिळत असल्या तरी

तुम्ही जर त्या पुरेशा विशालित करून पाहिल्या तर

तुम्हाला त्यांच्यापाठच्या क्षेत्रांतून फक्त 17 प्रकारचे कण

चार नियमांनुसार खेळत उदयाला येताना दिसतील

आपल्याला या क्षणी गोष्टींसंबंधाने ज्ञात आणि सर्वात पायभूत असलेले

सारांशाने सांगण्यासारखे एवढेच आहे.

भौतिकीतज्ज्ञ या उपपत्तीला

कण भौतिकीचे प्रमाणित प्रतिमान म्हणतात.

तुम्ही मुळातच विश्वाचे नियम निश्चित करणाऱ्या

बलांनुसार वागणाऱ्या महासागरात

ऊर्जेमुळे निर्माण झालेले क्षोभ आहात.

पण बल का आहे आणि ते काय आहे?

याच्या मुळाशी जायचे तर

आपल्याला आणखी काही सोप्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.

या दृक्श्राव्याफितीतील काही आरेखनांचा उपयोग करून आम्ही भित्तीपत्रे तयार केली आहेत.

तुम्ही ती patron.comवर मिळवू शकता.

जर आणखी दृक्श्राव्यफिती बनवण्यासाठी आम्हाला मदत करायची असेल तर

ती येथे करू शकता.

आम्हाला खरोखरच तुमची मदत हवी आहे.

तुम्ही निर्णय घेईपर्यंत आम्ही बनवलेल्या आणखी काही जृक्श्राव्यफिती पाहा.

Amara.org समूहाने उपशीर्षके तयार केली.