दंभस्फोटाने षड्यंत्रांचा अंत | Kurzgesagt

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

आंतरजाल ही जणू षड्यंत्र सिद्धांतांची निपज करण्याची जागा आहे.

आता हे खरं की काही षड्यंत्रे हा फक्त मूर्खपणा किंवा गंमत असते तर इतर…

अज्ञानाची प्रस्थापना करतात आणि घातक असे अविश्वासाचे वातावरण निर्माण करतात…

यासाठी आम्ही कुर्झजसाग्ट प्रयोगशाळेत जाऊन एक बिनधोक प्रणाली विकसित केली.

यामुळे सर्व नाही तरी बऱ्याच षड्यंत्र सिद्धांतांचा नाश होईल.

ती खरोखरच सोपी आहे. तुम्ही फक्त स्वतःला विचारा;

विशिष्ट सिद्धांत खरोखरच श्रीमंत आणि सत्ताधारी लोकांवर काही परिणाम करतो काय?

जर या प्रश्नाचं उत्तर होय असेल तर ठीक आहे… तसे असेल तर बहुतकरून तो खरा असण्याची शक्यता नाही.

आपण याची तीन उदाहरणांच्या मदतीने चाचणी घेऊया…

क्रमांक एकः कर्करोग बरा करणारा एक सोपा उपाय आहे पण तो रोखून ठेवला आहे कारण…

त्यामुळे औषधे निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या फायदा नाहीसा होईल.

समजा की अॅपलचा प्रमुख कर्करोगाने मरण पावला म्हणून सर्व श्रीमंत लोक कर्करोगाने मरण पावतात हे खरं आहे असं म्हणता येईल काय?

तुम्हाला काय वाटतं? होय?

कर्करोगावरचा कोणताही उपचार दडपून ठेवलेला नाही.

क्रमांक दोनः रासायन माग… chemtrails… म्हणजे विमानांच्या साहाय्याने हवेत

लोकसंख्या नियंत्रणाची रसायने वा तत्सम काही फवारले जाते अशी विक्षिप्त कारणे दिली जातात.

सत्ताधारी लोक खरेच हवा श्वासावाटे घेतात काय? ओबामा किंवा पुतिन श्वासावाटे हवा घेतात काय?

होय… ‘रसायनमाग’ असे काही अस्तित्वाच नाही.

क्रमांक तीनः जगविनाशाचे षड्यंत्र सिद्धांत

ख्रिस्त विरोधक, माया संस्कृतीतील लोक, कदाचित परग्रहवासी यांच्यामुळे लवकरच जगाचा शेवट होईल असे काहीजण मानतात.

लवकरच हे लोक आपल्यावर खरोखरच विनाशकारी घाला घालतील याकडे श्रीमंत आणि सत्ताधारी लोक दुर्लक्ष करतील काय?

कसे शक्य आहे?

जगाचा शेवट इतक्यात होणार नाही.

अर्थात ही चाचणी प्रत्येक षड्यंत्र सिद्धांताला लागू पडत नाही.

पण काही मूर्ख सिद्धांताना मात्र हे लागू पडते. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी

अशा गोष्टी पटविण्याचा प्रयत्न करेल तर त्याला ही दृक्श्राव्य फीत दाखवा

आणि फेसबुकवरील तुमचे मित्र जास्तच चोखंदळपणे निवडा.