होमिओपॅथी स्पष्टीकरण - कोमल हीलिंग किंवा बेपर्वा अफरातफलक? | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

होमिओपॅथी हे जरी सर्वात वादग्रस्त वैध्य्कशास्त्र अस लं,

तरी ते सर्वात लोकप्रिय पर्यायी वैध्य्कशास्त्र आहे.

काही लोकं त्याच्या विरोधात असली तरीही

बाकीच्या लोकांचा त्याच्या अपार शक्तीवर व परिणाम्कार्क्तेवर संपूर्ण विश्वास आहे.

होमिओपॅथी काम कशी करते?

आजची होमिओपॅथी कशी तयार झाली,

आणि आधुनिक वैध्यकशास्त्र त्याकडून काय शिकू शकतं?

होमिओपॅथीचं पहिलं तत्त्व म्हणजे समान गोष्टी एकमेकांना बरं करतात.

उपायात वापरले जाणारे साहित्य हे ज्या रोगांची लक्षणे बरी करायची असतात

त्याच लक्षणांची कारणे असतात.

म्हणजे समजा एखादा उपाय जर ताप बरा करण्यासाठी वापरला जात असेल

तर तो बेलाडोना नावाच्या वनस्पतीपासून बनवला जाऊ शकतो,

ह्या वनस्पतीमुळे ताप होऊ सुद्धा शकतो.

मधमाशीच्या विषापासून बनवलेला उपाय हा खाजऱ्या सूजांवर वापरला जातो, इत्यादी.

दुसरा तत्व म्हणजे उपाय तयार करण्याची खास पद्धत, “पोटेंटायझेशन”.

हे म्हणजे एखाद्या पदार्थाला सौम्य करून ढवळल्यास

त्यातली रोग बरी करण्याची क्षमता सक्रीय करते व त्याची परिणामकारक्ता वाढवते.

हे करण्यासाठी, वापरले जाणारे सामग्री अल्कोहोल किंवा डीस्टील्ड पाण्यात विरघळवले जातात.

होमिओपॅथीचे डॉक्टर्स एक भाग द्राव नऊ भाग पाण्यात मिसळतात,

ज्याने द्राव त्याच्या मूळ संहततेच्या एक दशौंशावर येतो, ज्यानंतर हा द्राव हलवला जातो.

अशा प्रकारे तयार झालेला द्राव हा १X शक्तीचा असतो.

एक भाग सामग्री आणि नऊ भाग विद्रावक (अल्कोहोल किंवा पाणी), रोमन अंक ‘X’ म्हणजे ‘१०’ ह्यावरनाव दिलेला.

आता हि प्रक्रिया पुन्हा केली जाते.

तयार झालेला द्राव एक भाग आणि शुद्ध पाणी नऊ भाग मिसळून पुन्हा एकदा ढवळले जातात.

आता तयार होतो २X.

हे पुन्हा पुन्हा करून हव्या त्या शक्तीचा द्राव मिळवला जाऊ शकतो.

तयार उपाय आता मौखीकरीत्या घेतला जातो,

किंवा कधी कधी छोट्या साखरेच्या गोळ्यांच्या रुपात त्यांना विकलं जातं.

उदाहरणार्थ, २०X च्या ताकतीचा द्राव म्हणजे एक एसपिरीनची गोळी अक्ख्या अटलांटिक महासागरात विरघळवल्यासारखं.

पण काही द्राव अजून टोकाचे असतात, उदाहरणार्थ ३०C.

C म्हणजे मिश्रणात एक भाग सामग्री व ९९भाग पाणी आहे.

मग उपलब्ध असलेलं ३०C च्या मिश्रणात एक भाग द्राव आणि

एक दशलक्ष , अब्ज, अब्ज, अब्ज, अब्ज, अब्ज, अब्ज भाग पाणी आहे.

समजा आपल्याला एक लहान गोळी हवी असेल, ज्यात मूळ द्रव्याचा फक्त एक अणु असेल,

तर आपल्या गोळीचा व्यास हा पृथ्वी व सूर्यातील अंतराएवढा असेल.

दीडशे कोटी किलोमीटर.

ही गोळी एवढी मोठी असेल की ती स्वतःच्या वस्तुमानामुळे एका कृष्णविवरात रुपांतर करेल.

ह्यामुळे पोटेनटायझेशन हा होमिओपॅथीच्या टीकांमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे.

एवढं जास्त सौम्यीकरण केलेला द्राव हा जास्त परिणामकारक होतो असा समज आहे.

पण भौतिक पातळीवर हे अर्थहीन आहे.

बहुतेक होमिओपॅथी औषधं एवढी सौम्य केलेली असतात की

त्यातला एक सक्रीय अणु सुद्धा उरत नाही.

असे संहत मिश्रण का काम करते ह्याचं कारण म्हणून असं सांगितलं जातं की

प्रत्येक सौम्यीकरणानंतर मिश्रण हलवल्याने

मिश्रणात द्रावाची सार राहते.

सोप्या शब्दात सांगायचं तर पाण्याला त्यात काय मिसळलं आहे ह्याची स्मृती राहते.

पण हे जर खरं असेल, तर जो कुठला पदार्थ पाण्याला स्पर्श करून गेला असेल

तो त्याची सार पाण्यात ठेवून जातो,

नंतर ह्याने अप्रत्याशित परिणाम होतो जर तो चुकून गिळला गेला तर.

महासागरात जगणाऱ्या आणि तरंगणाऱ्या जीवांचा विचार करा.

पाण्याचा प्रत्येक घोट हा होमिओपॅथीचा अतिसंहत मिश्रण असेल.

असं असून होमिओपॅथी सर्वात यशस्वी वैध्यकशास्त्र कसा झाला?

१८व्या शतकात वैध्यकशास्त्र आजच्या वैध्यकशास्त्रापेक्षा खूप वेगळं होतं.

रक्तवाहिनी कृत्रिमरीत्या कापून रक्तस्त्राव वाहू देण्यासारख्या उपायांमुळे

रुग्णाची परिस्थिती अजून खालाव्ल्यासारखी व्हायची.

म्हणून जर्मन वैद्य साम्युएल हाह्नेमान ह्यांना एक विनाव्यात्यायाचा, नैसर्गिक उपाय हवा होता,

आणि होमिओपॅथीने विस्तार पावला.

आणि त्यावेळेला होमिओपॅथीची रूग्णालये यशस्वी झाली कारण

काहीही दुखापत न करणे हे केव्हाही दुखापत करण्यापेक्षा जास्त चांगला असतं.

हाह्नेमान यांनी त्यांच्या रुग्णांवर कडक नियम लागू केले.

प्रथम तुम्हाला कॉ फी, चहा, मद्यपान, तिखट खाणे, गोड पदार्थ टाळावे लागायचे. चीज, कांदे आणि मांसाहार हे ही प्रतिबंधक होते.

लोकरीचे कपडे, बसल्याजागी काम करणे, बंद खोलीत बसून राहणे, उबदार खोलीत राहणे, घोडेस्वारी करणे,

डुलक्या काढणे, खेळ खेळणे,

हस्तमैथुन करणे, आणि अर्थात कामुक पुस्तकं वाचणे, इत्यादी हे ही प्रतिबंधक होते.

फक्त तेव्हाच हे उपाय काम करतात असे होमिओपॅथीच्या शोधाकार्त्याचे म्हणणे होते.

अर्थात हे सगळे नियम आता दुर्लक्षित केले जातात आणि त्यांच्याबद्दल डोलले जात नाही.

गेल्या १५० वर्षांत वैद्यकशास्त्र खूप बदलले आहे.

ह्या पूर्वी मानवी इतिहासात आपण एवढ्या चांगलं आरोग्य कधीच उपाभोग्लेलं नाही.

ह्यापूर्वी आपण कधीच एवढे जगलो नाहीत, आणि ह्याचे श्रेय आपण तयार केलेल्या नवीन यंत्रणांना जाते.

आधुनिक लक्षणसूचक, निरीक्षण पद्धती व शास्त्रलोक्त मुल्यामापानांचा वापर करून

कुठल्या गोष्टी उपयुक्त आहेत ह्याचे निष्कर्ष काढता येतात.

ह्या साधनांमुळे, असंख्य निरीक्षणं व समीक्षणे केल्यावर

आपल्याला कळलंय की होमिओपॅथीचा प्लासीबो पलीकडे काहीही परीणाम होत नाही व ह्यात काही शंका नाही.

असा असूनही, जर लोकांना त्याने मदत मिळत असेल तर त्यात हरकत काय आहे?

कदाचित तुम्हाला ह्याचा वापर करून बरे वाटलं असेल,

किंवा तुम्हाला असं कोणीतरी माहिती आहे जे होमिओपॅथीमुळे एखाद्या भयानक आजारातून बाहेर पडलय,

आणि होमिओपॅथी लहान मुलांवर व प्राण्यांवर काम करते असे खूप अहवाल आहेत.

अशा अनुभवांचा काय अर्थ काढायचा?

प्लासिबो इफेक्ट हा अत्यंत वास्तविक आहे, काल्पनिक नव्हे.

तुम्ही कितीही हुशार असलात तरीही तुम्ही ह्यापासून सुरक्षित नाही.

जर लोकांचा विश्वास असेल की एखादी गोष्ट त्यांना बरी करू शकते,

तर फक्त त्या विश्वासाच्या बळावरच हवा तो परिणाम दिसू शकतो.

हा प्लासिबो इफेक्ट हस्तांतर करू शकतो हे आता सिद्ध केला गेलेलं आहे.

लहान मुलं आणि प्राणी त्यांच्या आई-वडिलांवर किंवा मालकांवर अवलंबून असतात, आणि त्यांच्या भावनांशी एकरूप असतात.

जर एक पालक एखाद्या उपायावर खूप विश्वास ठेवतो आणि त्यामुळे शांत होतो,

तर त्यामुळे पाल्यालाही आराम मिळू शकतो आणि त्याच्या आजाराची लक्षणं कमी होऊ शकतात.

हे प्राण्यांमध्ये पण दिसून येतं, जेव्हा ते त्यांच्या काळजी घेणाऱ्या माणसांच्या हावभावांना पाहून प्रतिक्रिया देतात.

पण होमिओपॅथीचा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे काळ.

आपली शरीरं तग धरून ठेवणारी मशीनं आहेत.

इन्फेक्शन काही दिवसांतच बरी होतात.

पण आजारी वाटत असतानाच औषधं घेऊन तुम्हाला बरे वाटत असेल तर

असं वाटतं की त्यांनीच तुम्हाला बरे वाटलं. पण वास्तवात हे काहीही न करता पण झालं असते.

होमिओपॅथीचा उद्योग हा मोठ्या औषध कमपन्यांचा सौम्य पर्याय असल्याचा दावा करतो.

पण खरतर होमिओपॅथीच एक मोठा औषध उद्योग आहे.

अब्जावधी डॉलर्स कमवले जातात, प्रचंड नफा कमावून.

होमिओपॅथीच्या उद्योगाला स्वतःची लॉबी संस्थाने असतात, जी होमिओपॅथीच्या शत्रूंचा सामना करतात.

ह्यात खूप पैसे पणावर लावलेले असतात.

जागतिक पातळीवर २०२४ पर्यंत ह्याची मागणी १७ अब्ज होण्याची अपेक्षा आहे.

काही समीक्षकांच्या मताप्रमाणे होमिओपॅथी सामाजिक आरोग्यासाठी हानिकारक आहे

कारण त्यामुळे सिद्ध झालेल्या वैध्य्शास्त्रावरचा लोकांचा विश्वास कमी होतो.

होमिओपॅथीवरचा विश्वास लासिकारांवरच्या टीकांसारखा आहे.

ह्यामुळे लोकांना त्यांना लागणारी मदत मागण्यापासून परावृत्त करू शकते,

अशाही वेळी जेव्हा त्यांचे किंवा त्यांच्या मुलांचे प्राण पणावर लागले आहेत.

पण होमिओपॅथीच्या यशामागचे कारण आपण वापरात आणू शकतो, आणि आपण हे करायला हवे.

होमिओपॅथिक डॉक्टरबरोबरचे पहिले संभाषण हे खूप वेळ घेऊ शकते,

आणि ते खूप वैयक्तिकही असू शकते.

जो रुग्ण आधीच एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे ये-जा करत असेल

त्याला अशा तर्हेच्या लक्ष देण्याचा आणि सहानुभूतीचा खूप फायदा होऊ शकतो,

जरी संभाषण हे त्यावर असलेला उपाय नसला.

आधुनिक वैध्याकशास्त्र हे कार्यक्षम आहे. दर वर्षी त्यामुळे कोट्यावधी प्राण वाचतात.

पण हे खूप कडक शिस्तीची रचना असलेली संघटना आहे.

कमी बजेट डॉक्टर आणि नर्सेसना खूप रुग्णांकडे लक्ष देण्यास भाग पडतात.

सल्ला देणे हे वेळेत करावे लागते,

रोग्चीकीत्सा पटकन करावी लागते, उपचार फटाफट करावे लागतात,

ज्यामुळे रुग्णांना अदृश्य, भयभीत आणि मागे टाकून दिल्यासारखे वाटते.

हे आधुनिक वैध्याकशास्त्र होमिओपॅथीकडून शिकू शकते.

ते एका मानवी गरज भरून काढते.

आपल्याला व्यक्तिविशिष्ट वेळ काढायला हवा. माणसं बघायला हवीत, आकडेवारी नाही.

पण जरीही सहानुभूती महत्वाची असली, तरीही ती वास्तविक उपचाराचा पर्याय नाही.

विश्वासामुळे डोंगरदेखील हलू शकतात, पण साखरेचे पाणी कर्करोग बारा नाही करू शकत.

काही वर्षांच्या कालावधीनंतर, कार्झ्गेसाग्त परतलंय जर्मन भाषेत.

फंकच्या मदतीने आम्ही जर्मन चॅनेल पुन्हा चालू केला आहे, आणि ह्यावर दर १-२ आठवड्यात १ विडीओ उपलोड करत आहोत.

आमचे लोकप्रिय वीडीओ पुन्हा जर्मन मध्ये प्रकाशित करण्याव्यतिरिक्त

असेही विडीओ असतील जे इंग्रजी भाषेत काही काळ उपलभ्ध नसतील.

आमचा चॅनेल इकडे पहा, आम्जाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा, सबस्क्राईब करा आणि विडीओ पहा.

जर चॅनेल छान चालला तर जर्मन विडीओ काही वर्षे नियमित होतील, आणि आम्ही इतरही भाषेत विडीओ बनवू.