व्हिडिओ
ट्रान्स्क्रिप्ट
मंगळाच्या फोबॉस आणि डायमॉस MM#2 उपग्रहांचे स्पष्टीकरण.
मंगळाचे फोबॉस आणि डायमॉस हे दोन उपग्रह आहेत.
ते अतिशय लहान आहेत. पण किती लहान असावेत?
मंगळाशी किंवा आपल्या चंद्राशी तुलना करता
जरी त्यांचे लहान असणे हा ज्याच्या त्याच्या मताचा प्रश्न असला तरी…
एकंदरीत ते लहानच आहेत.
त्यांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जवळपास पृथ्वीवरील लक्झेम्बर्ग आणि माल्टा यासारख्या.
सर्वात लहान राज्यांएवढे आहे.
फोबॉस आणि डायमॉस हे जरी हलके-फुलके नसले तरीही…
प्रत्यक्षात त्यांचे गुरुत्वीय बल त्यांना गोलाकार प्राप्त करून देण्यासाठी पुरेसे बलवान नाही.
यामुळे ते चंद्राप्रमाणे दिसण्याऐवजी प्रचंड बटाट्यासारखे दिसतात.
कोणे एके काळी ते लघुग्रह पट्टयाचा भाग होते आणि गुरुग्रहाच्या जास्त वस्तुमानाच्या गुरुत्वाकर्षणाने त्यांना त्या पट्टयाबाहेर लाथाडून टाकले….
ही त्यांच्या उत्पत्तीची सर्वा लोकप्रिय उपपत्ती आहे.
यामुळे मंगळासारख्या ग्रहाला त्यांना स्वतःच्या गुरुत्वाकर्षणात त्यांना पकडून ठेवता आले.
दर साडेसात तासात फोबॉस मंगळाभोवती सरासरी 9,400 किलोमीटर अंतर कापून एक भ्रमण पूर्ण करतो.
तो आता मंगळावर आदळण्याच्या मार्गावर असून दर वर्षी तो 2 मीटरने मंगळाच्या जवळ जात आहे..
मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत्या 50 ते 100 दशलक्ष वर्षामध्ये तो एकतर तुकड्यात विभागला जाईल
किंवा त्याचे सुंदर रिंगणात रूपांतर होईल…
किंवा मंगळावर आदळून नाहीसा होईल.
या टक्करीदरम्यान मुक्त होणाऱ्या ऊर्जेमुळे या छोट्या ग्रहावरील सर्व जीवमात्र मरून जातील. .
जर मंगळावर मानव (जीव) असतील तर त्यांनी खूप मजबूत असे निवारे बांधायला हवेत.
तर दुसरीकडे छोटा डायमॉस मंगळाच्या पकडीतून हळू हळू सुटका करून घेत आहे.
अखेरीस, तो या एकाकी लाल ग्रहाला मागे टाकून आणि अवकाशात उड्डाण करील.
जर मंगळ दुसऱ्या एखाद्या लघुग्रहाला पकडीत घेण्याची व्यवस्था करू शकला नाही …
तर येत्या काही दशलक्ष वर्षांतच मंगळ हा उपग्रहीन व एकटा ग्रह असेल.
इंग्रजी मथळे डानोअर यांनी दिले आहेत.