व्हिडिओ
ट्रान्स्क्रिप्ट
अचानक तुमच्या शेजारी एखाद्या नाण्याच्या आकाराचे कृष्णविवर अवतरले तर…
तुमचं काय होईल?
थोडक्यात उत्तर द्यायचं तर तुम्ही मराल…
दीर्घ उत्तर द्यायचं तर ते परिस्थितीवर अवलंबून राहील.
त्या कृष्णविवराचं वस्तुमान नाण्याइतकं आहे काय..
किंवा ते नाण्याच्या रुंदीचे आहे काय?
समजा की हे नाणे अमेरिकेच्या निकेलप्रमाणे 5 ग्रॅम वस्तुमानाचे आहे…
आणि जादूने ते कृष्णविवरात खेचले गेले…
या कृष्णविवराची त्रिज्या दहाचा -30 वा घातांक मीटर इतकी असेल.
तुलना करता हायड्रोजन अणूची त्रिज्या दहाचा -11 वा घातांक इतकी असते.
म्हणजेच कृष्णविवराची अणूशी तुलना करता ते …
अणू सूर्याच्या तुलनेत जितका लहान असतो तितके लहान असते.
कल्पनातीत लहान
आणि या छोट्या कृष्णविवराला कल्पनातीत छोटे आयुष्य असते.
हॉकिंग प्रारणांमुळे त्याचा विनाश होतो.
स्वतःचे अल्प वस्तुमान ते 10 च्या - 23 व्या घातांक सेकंदात ते प्रारित करेल
त्याचे 5 ग्रॅम वस्तुमान हे 450 टेट्राज्युल ऊर्जेत रूपांतरित करेल.
यामुळे जो स्फोट होईल तो साधारणपणे…
हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर टाकलेल्या बॉम्बच्या एकत्रित विचारात घेतलेल्या भडक्याच्या तिप्पट भडक्याचा असेल.
या परिस्थितीत तुम्ही मराल.
तुमचे नाणे देखील गमावून बसाल.
जर कृष्णविवराचा व्यास सर्वसाधारण नाण्याइतका असेल
तर ते भरपूर वजनदार असणार.
अमेरिकन निकेलइतक्या व्यासाच्या कृष्णविवराचं…
वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा अधिक असेल.
त्याचे पृष्ठीय गुरुत्वबल
आपल्या ग्रहाच्या सध्याच्या गुरुत्वबलाच्या अब्ज, अब्ज पटींनी जास्त असेल.
तुमच्या एकूण एक पेशीच्या चिंधड्या उडतील
इतक्या ताकदीचे त्याचे भरती बल तुमच्यावर कार्य करेल.
काय घडतंय हे तुम्हाला समजायच्या आतच कृष्णविवर तुम्हाला गिळंकृत करेल.
जरी या स्थितीतही गुरुत्वाकर्षणाचे नियम तेच असले
तरी पूर्णपणे विभिन्न अशी गुरुत्वाकर्षण घटनेची अनुभूती तुम्ही
इतक्या उच्च घनतेच्या घटकांच्या सभोवती घ्याल.
दृष्टिक्षेपात येणाऱ्या विश्वापर्यंत या गुरुत्वीय बलाचे
आकर्षण विस्तारलेले आहे.
घटकापासून तुम्ही जितके दूर जात तितके गुरुत्वाकर्षण क्षीण होत जातं.
पृथ्वीवर या क्षणी तुमचे डोके आणि तुमच्या पायाची बोटे
तिच्या केंद्रापासून जवळपास समान अंतरावरच आहेत.
पण तुम्ही जर निकेलच्या आकाराच्या कृष्णविवरावर उभे रहाल तर
तुमचे पाय त्याच्या केंद्राच्या शेकडोपटींनी जवळ असतील…
आणि त्यावरील गुरुत्वीय बल हे डोक्यावरील गुरुत्वबलाच्या तुलनेत
दहा हजार पटींनी मोठे असेल आणि ते तुमचे अब्जभर तुकडे करेल.
पण हे कृष्णविवर तुमच्यापर्यंत थांबणार नाही.
हे कृष्णविवर आता पृथ्वी-चंद्र यांच्यासह तयार झालेल्या मृत्यू-प्रणालीतील
प्रभावी गुरुत्वीय घटक असेल.
हे कृष्णविवर या ग्रहाच्या केंद्रात कोसळेल आणि त्याला बाहेरून आत गिळंकृत करून टाकेल…
असा विचार कदाचित तुम्ही कराल.
वास्तवात पृथ्वी देखील कृष्णविवरात घुसेल अणि त्याभोवती भ्रमण करत असल्याप्रमाणे
हेलकावू लागेल.
असे होत असतानाच प्रत्येक वेळी तिच्या वस्तुमानाचे लचके खाल्ले जातील
आणि हे खूपच भयप्रद असेल.
पृथ्वी जेव्हा या प्रकारे आतून खाल्ली जाईल
तेव्हा ती विखुरलेल्या उष्ण दगडांच्या चकतीच्या स्वरूपात कोसळेल…
आणि ती कृष्णविवराला घट्ट वर्तुळाकार कक्षेच्या आकारात वेढून चाकेल.
जेव्हा हळूहळू कृष्णविवराचे पृथ्वी-भक्षण संपलेले असेल त्यावेळी त्याचे वस्तुमान दुप्पट होईल.
चंद्राची भ्रमणकक्षा जास्त लांबीच्या व्यासाचा लंबवर्तुळाकार धारण करेल.
याचे सूर्यमालेवरील परिणाम भयानक असतील.
शब्दशः विचार करता भयानक म्हणजे घाबरवून सोडणारे असतील.
कृष्णविवराकडून येणारी भरतीबले बहुधा पृथ्वीच्या जवळपास असणारे सर्व लघुग्रह अस्ताव्यस्त करून टाकतील.
याबरोबरच लघुग्रहांचे पट्टेदेखील अस्ताव्यस्त होतील.
यामुळे सूर्यमालेतील खडक कलते होतील.
काही दसलक्ष वर्षे हा भडिमार आणि
त्याचे परिणाम या गोष्टी नित्याच्या होतील.
अन्य ग्रह अल्प प्रमाणात क्षोभित होतील पण ते जवळ जवळ त्याच भ्रमण कक्षेत रहातील.
ज्याला आपण पूर्वी पृथ्वी म्हणत होतो ते कृष्णविवर आता…
पृथ्वीच्या जागी सूर्याभोवती भ्रमण करू लागेल.
या परिस्थितीत देखील तुम्ही मराल.
बक्षिस म्हणून मिळालेली ही दृक्श्राव्यफित पॅट्रेऑनवर तुम्ही दिलेल्या योगदानामुळे मिळेल.
तुमच्या पाठबळाबद्दल खूप धन्यवाद!
हा विषय आस्कसायंस सबरेडिट या संकेतस्थळावरील प्रश्नावर आधारित आहे.
आमच्या बरोबर या दृक्श्राव्याफितीवर काम करणाऱ्या मॅच (चॅप्लिन?) या उत्तराची रचना केली.
यासारख्या भयप्रद माहितीसाठी त्याच्या, क्वार् आणि कॉफी या ब्लॉगला भेट द्या.
जग तुम्हाला या दृक्श्राव्यफितीची चर्चा करायची असेल तर आमचास्वतःचे सबएडिट तयार आहे.
कृष्णविवर आणि तसेच न्युट्रॉन ताऱ्यांविषयी जाणून घेण्यात रस असेल तर येथे क्लिक करा.
Amara.org समूहाने उपशीर्षके तयार केली.