विश्वाचे सर्वात अधिक दक्ष नष्ट करण्याचा तरी खरंतर उपाय - खोटे व्हॅक्यूम | Kurzgesagt

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

जर आपलं विश्व

स्वतःला समूळ आणि क्षमतेनं नाहीसं करणारी

स्व-नाशी कळ सोबत घेऊन आलं,

त्यामुळे एकूण एका

भौतिक वस्तूंचं

अस्तित्व संपुष्टात आलं

आणि त्यावरील जीवन कायमचं

कायमचे नष्ट झाले तर काय होईल?

अखेरचे पारिस्थितिक अरिष्ट असेल -

पोकळी विनाश

सूत्र संगीत

आपलं विश्व स्वतःचा नाश

कसा करू शकेल हे स्पष्ट होण्यासाठी

आपल्याला दोन तत्त्वांचं आकलन करून घेणं गरजेचं आहे.

एक- ऊर्जा पातळी

प्रत्येक गोष्टीला ऊर्जापातळी असते

ही भौतिकीतील गाभाभूत कल्पना आहे.

कोणत्याही प्रणालीची ऊर्जा जितकी जास्त तितकी तिची ऊर्जा पातळी उच्च असते.

उदाहरणार्थ, लाकडाची ऊर्जापातळी उच्च असते.

ते जाळता येतं. या क्रियेत

त्याच्या रेण्वीय बंधांत साठवलेली रासायनिक ऊर्जा मुक्त केली जाते.

ती उष्णतेत रूपांतरित होते.

उरलेली राख ही

लाकडाच्या मूळ पातळीपेक्षा कमी ऊर्जा पातळीला असते.

दोन- स्थैर्य़

विश्वातील प्रत्येक गोष्टीचा,

पूर्ण स्थैर्य असणाऱ्या मूळ स्थितीला येण्याचा प्रयत्न असतो.

या स्थिर स्थितीची ऊर्जापातळी शक्य तेवढी कमी असते.

उदाहरणार्थ, टेकडीवरचा चेंडू अस्थिर असतो

आणि त्याची स्थितिज ऊर्जा खूप असते.

त्याला किंचितसा धक्का दिला तरी तो दरीत घरंगळेल

आणि त्या प्रक्रियेत स्वतःची स्थितीज ऊर्जा गमावेल.

हा चेंडू आता मूळ स्थितीला आणि स्थिर आहे.

तो त्याच स्थितीला राहील.

विश्वातील प्रत्येक गोष्ट

ही दोन तत्त्वे पाळते.

जर एखाद्या गोष्टीकडे भरपूर ऊर्जा असेल

तर ती अस्थिर असते आणि स्थिर होण्यासाठी .

त्यापासून तिला स्वतःची सुटका करून

मूळ स्थितीला यायचे असते.

हे प्रत्येक प्रणालीसाठी सत्य आहे.

अगदी पुंज यांत्रिकीसारख्या

विक्षिप्त प्रणालीलाही ते लागू आहे.

जर आपले भौतिकीचं स्वीकृत आकलन योग्य असेल तर विश्वाला

स्वतःचे गुणधर्म पुंज क्षेत्रांकडून मिळतात.

दुसऱ्या दृक्श्राव्यफितीत आम्ही त्यांचं

तपशीलात स्पष्टीकरण केलं आहे.

या दृक्श्राव्यफितीपुरते ते

विश्वाचे नियम आहेत असे तुम्ही समजा.

कणांनी कसे वागावे आणि आंतरक्रिया कराव्यात

हे ते सांगतात.

विश्वातील सर्व गोष्टींप्रमाणे त्यांना

शक्य तितक्या किमान ऊर्जा पातळीला रहायचे असते.

याला पोकळी स्थिती म्हणतात.

याचा अवकाशातील

पोकळीशी काहीही संबंध नसतो.

वस्तूंचं नामकरण करण्यात वैज्ञानिक कुशल नाहीत

त्यामुळे हे नाव दिलं आहे.

कदाचित एक अपवाद वगळता

क्षेत्रं पोकळी स्थितीला पोहोचली असं आपण म्हणतो.

हिग्गचं क्षेत्र स्थिर नसलं तरी परास्थिर असावं

अशी शक्यता आहे.

स्थिर असण्याचा आव आणला तरी प्रत्यक्षात अस्थिर असलेल्या गोष्टीला

महत्त्व देण्यासाठी परास्थिरता हे विशेषण वापरलं आहे.

ही स्थिती अर्थातच छद्म पोकळी असेल.

हिग्गचं क्षेत्र कणांना स्वतःचं वस्तुमान

प्राप्त करून देण्याला जबाबदार असतं.

विश्वातील सर्व गोष्टी कशा रीतीनं परस्परांशी

आंतरक्रिया करतात याचं नियमन वस्तुमान करते.

हिग्गचं क्षेत्र छद्म पोकळी असेल तर काय होईल?

आपला दरीतील चेंडू विचारात घेऊ:

हा चेंडू हिग्गच्या क्षेत्रात आहे.

कदाचित हिग्गच्या क्षेत्राच्या दृष्टीनं ही दरी किमान ऊर्जा स्थितीला असणार नाही.

कदाचित त्याला याहून अधिक खोल दरीत जायला हवं असेल.

याचा अर्थ असा होईल की हिग्गच्या क्षेत्राकडे मुक्त होण्यासाठी

सज्ज असलेली भरपूर स्थितिज ऊर्जा असेल.

हिग्गचे क्षेत्र लाकडच्या तुकड्याप्रमाणे आहे,

पण ते पेट्रोलमध्ये भिजवलेलं असल्याने

विश्वाला आग लावायला तयार आहे.

पुंज सुरुंगासारख्या यादृच्छिक ठिणगीमुळे

ती हिग्गच्या क्षेत्राची

स्थितिज ऊर्जा मुक्त करू शकते.

हे केव्हाही

आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय घडू शकतं.

जर अवकाशात कोणत्याही क्षणी

असा तथाकथित पोकळी ऱ्हास उद्भवला

तर परिस्थिती मूळ पदावर येणे अशक्य असते.

जसे हिग्गचे क्षेत्र

किमान ऊर्जा स्थितीवर धडकते

आणि ते प्रचंड प्रमाणात

स्थितिज ऊर्जा मुक्त करते.

ही ऊर्जा त्याच्या भोवतीच्या अवकाशाला

अडथळ्यापलीकडे ढकलते

आणि या प्रक्रियेत अधिक स्थितिज ऊर्जा मुक्त करते.

नव्या स्थिर हिग्गच्या क्षेत्राचा गोल प्रकाशाच्या वेगाने वाढतो

किंवा खरी पोकळी सर्व दिशांना

प्रकाशाच्या गतीने वाढते.

विश्वाच्या आकाराच्या पेट्रोलच्या समुद्राला

आग लावली आहे अशी याची कल्पना करा.

हा गोल

त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टी गट्ट करणाऱ्या ऊर्जा

कवचात लपेटलेला आहे.

ज्या कशाला तो स्पर्श करतो

त्यांचे अस्तित्व नष्ट करतो.

हा बुडबुडा कायम वाढत रहातो

आणि त्याच्या मार्गात येणाऱ्या विश्वाचा नाश करतो.

ही घटना वेगाने घडत असल्याने

पूर्वसूचना मिळणे शक्य नसते

काहीही झालं तरी याबाबतीत आपल्याला करण्यासारखं कहीही नसतं.

आपला नाश क्षणार्धात…

तत्काळ होतो.

यामुळे पृथ्वी नष्ट झालेली असेल.

पण जर हिग्गच्या क्षेत्राची

ऊर्जा पातळी बदलली

तर परिस्थिती फारच बिकट होईल.

ऊर्जा पातळीतील बदल सर्व भौतिकी बदलून टाकेल.

यामुळे गोलाच्या खऱ्या पोकळीत

प्रमाणित प्रतिमानाची उचलबांगडी होऊन

त्या जागी आपल्या माहीत नसलेली

भिन्न भौतिकी प्रस्थापित होईल.

मूलभूत कण कसे वागतात,

अणू कसे एकत्र रहातात,

रसायने कशी अभिक्रिया करतात इत्यादी प्रश्नांवर ही भौतिकी आधारलेली असेल.

पोकळी ऱ्हास केवळ जीवनाचा नाश करणार नाही

तर रासायनिकीही त्यामुळे नष्ट होईल

यामुळे आपल्याला ज्ञात असलेले जीवन अशक्य होईल.

ही पोकळी आतून कशासारखी असेल

याची आम्हाला अजिबात कल्पना नाही.

आता ती जे काही आहे ती कदाचित छाया असेल

वा नसेल.

आम्हाला माहीत नाही.

जर पोकळी ऱ्हास घडला तर

पुढे येणारी स्थिती चिंताजनक असेल.

जर तुम्हाला जराशीही काळजी वाटत असेल तर

तसे करू नका.

या क्षणी छद्म पोकळी

ही आपल्या कण भौतिकीच्या सद्य आकलनावर आधारित

अटकळ आहे आणि ती चुकीची असू शकते.

हे खंडं मोजण्यासाठी

मोजपट्टी वापरण्यासारखं आहे.

खेळकर संगीत

तुम्ही हे खात्रीने करू शकता पण शेवटी मात्र

तु्म्ही वास्तव मापाच्या खूप दूर असाल.

या क्षणी मात्र पोकळी ऱ्हास

ही वास्तव गोष्ट आहे

की केवळ घाबरवणारी कल्पना आहे हे कोणीही सांगू शकणार नाही.

परंतु जरी एखाद्या वा अनेक मृत्यूगोलांनी

यापूर्वीच प्रसरणाला सुरूवात केली असेल तरीही

विश्व प्रचंड मोठे असल्यामुळे

ते अब्जावधी वर्षं

आपल्यापर्यंत पोहोचणारही नाहीत.

जर ते पुरेसे दूर असतील तर

प्रसरण पावत असलेल्या विश्वामुळे

कदाचित कधीही आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.

विश्वाच्या व्याप्तीचे प्रमाण लक्षात घेता

प्रकाशाची गती तुलनेने वेगवान नाही.

म्हणून पोकळी ऱ्हास

चित्ताकर्षरीत्या भीतिदायक असला तरी

या क्षणाला ज्यांची आपल्याला भीती वाटायला हवी

अशा इतर अनेक गोष्टी आहेत.

पोकळी विनाशाशी तुलना करता

आपल्याला इतर अनेक कामे पार पाडण्यासाठी

ऊर्जा निर्मिती करायची आहे.

अशा प्रकारच्या दृकश्राव्यफिती बनवण्यासाठी

बनवण्यासाठी शेकडो तास खर्चावे लागतात

म्हणून आम्हाला Patreonवर पाठबळ द्या.

जर तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या नाशाबद्दल

अधिक जाणून घ्यायला आवडणार असेल तर

तर आम्हाला खरोखरच मदत करा.

आम्ही काही महिन्यांतून किमान एकदा

तरी विश्वाचा नाश करण्याचा प्रयत्न केला.

जर तुमच्याकडे जगबुडीची काही संकल्पदृश्ये असतील

आणि आम्ही ती माहिती द्यावी असे तुम्हाला वाटत असेल

तर तुमच्या प्रतिक्रिया…भाष्ये आमच्यापर्यंत पोहोचववा.