स्टॉक एक्सचेंज कसे कार्य करते (डमीजसाठी) | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

रोखे विनिमय -बाजार कशा रीतीने काम करतो?

रोखे (विनिमय) म्हणजे दुसरे तिसरे काही नसून फक्त राक्षसी जागतिक सोतुजाल आहे.

दर दिवशी या संघटित बाजाराच्या जागेत प्रचंड रकमेची उलाढाल होते.

एकूण साठ महाद्मांहून अधिक (60,000,000,000,000) इतक्या युरोंचा येथे व्यापार होतो.

ही किंमत संपूर्ण जागतिक अर्थकारणातील सर्व माल व सेवा यांच्या किमतीपेक्षा जास्त आहे.

तथापि बाजारात विकल्या जाणाऱ्या सफरचंदांशी व दातांच्या ब्रशांशी याचा काही संबंध नाही

तर याचा संबंधप्रामुख्याने हमीरोख्यांशी आहे.

हमीरोखे हा जास्तकरून समभागाच्या स्वरूपातील संपत्तीचा हक्क असतो.

कोणताही समभाग हा कंपनीतील वाट्याचे प्रतिनिधित्व करतो.

पण मग समभागांची खरेदी विक्री का केली जाते?

पहिली महत्त्वाची व प्रमुख बाब म्हणजे समभागाची किंमत ही संबंधित कंपनीशी निगडित असते.

जर तुम्ही केपनीची किंमत पिझ्झाच्या स्वरूपात विचारात घेत असाल…

तर जितकी एकूण पिझ्झ्याची किंमत जेवढी मोठी तितका प्रत्येक नग मोठा.

उदाहरणादाखल समजा की की फेसबुक नवे व्यापार प्रतिमान वापरून स्वतःचा नफा मोठ्या प्रमाणात वाढवू शकेल.

जर कंपनीच्या पिझ्झ्याचा आकारही वाढला तर त्याच्या परिणामी तिच्या समभागाचीही किंमत वाढेल.

हे समभागधारकाच्या दृष्टीने फारच चांगले आहे.

जो समभाग कदाचित 38 युरो मूल्याचा होता त्याचे मूल्य आता 50 युरो असू शकेल.

जर याची विक्री केली तर प्रत्येक समभागावर बारा युरो नफा मिळेल.

पण यातून फेसबुकला कोणता लाभ होईल?

हे समभाग विकून कंपनीला निधी उभा करता येईल व तो गुंतवून स्वतःचा व्यवसाय विस्तारता येईल.

उदाहरणार्थ, फेसबुकने रोखे बाजारात स्वतःचे नाव नोंदवून सोळा अब्ज डॉलर्स नफा कमावला.

समभागांची खरेदी-विक्री ही मात्र अनेकदा योगायोगाचा खेळ असतो.

कोणती कंपनी उत्तम काम करेल कोणती कंपनी चांगले काम करणार नाही हे कोणालाही सांगता येत नाही.

जर कंपनीचा नावलौकिक चांगला असेल तर गुंतवणूकदार तिला पाठबळ देतात.

वाईट नावलौकिक आणि वाईट कामगिरी असेल तर कंपनीला स्वतःचे समभाग विकणे कठीण जाते.

सामान्य बाजाराप्रमाणे हातात घेऊन घरी नेता येईल असा माल…

रोखे बाजारात उपलब्ध नसतो. तेथे फक्त आभासी माल मिळतो.

तो माल समभागांच्या मूल्याच्या स्वरूपात आणि संगणकाच्या मॉनिटरवर सारण्याच्या स्वरूपात दाखवला जातो.

यात दाखवलेली समभागाची मूल्ये क्षणार्धात चढतात वा घसरतात.

म्हणूनच संधी गमवायची नसेल तर समभागधारकांना झटपट कृती करावी लागते.

अगदी साधीशी अफवा कंपनीच्या समभागाच्या खऱ्या मूल्याचा विचार न करता समभागांची मागणी वेगाने कोसळवू शकते.

अर्थात याच्या उलटही घडू शकते.

विशेषतः लोक दुबळ्या कंपनीचे समभाग खरेदी करतात तेव्हा असे घडते.

कारण त्या कल्पनेच्या (अफवेच्या) पाठी मोठा लाभ मिळवून देण्याची क्षमता आहे असे त्यांना वाटत असण्याची शक्यता असते.

परिणामी अशा समभागांची किंमत वाढते.

विशषतः नव्याने रोखेबाजारात प्रवेश करणाऱ्या कंपन्यांना यातून मोठा लाभ होतो.

जरी त्यांच्या मालाची विक्री घसरत असेल तरी ते त्यांचे समभाग विकून रोकड निर्माण करू शकतात.

परिस्थिती पोषक असेल तर त्यांची कल्पना वास्तवात उतरण्याची शक्यता असते.

पण परिस्थिती पोषक नसेल तर अंदाजाचा बुडबुडा केवळ गरम हवेच्या फुग्याप्रमाणे असतो…

आणि ज्याप्रणाणे बुडबुडा हा केव्हा ना केव्हा फुटतो तशा कंपन्या कोसळतात.

जर्मनीच्या सर्वात मोठ्या तीस कंपन्यांचे मूल्य DAX समभाग निर्देशक म्हणून ज्ञात असणाऱ्या सारांशाने दाखवले जाते.

प्रमुख कंपन्या किती चांगल्या वा वाईट आहेत हे DAX दाखवतो.

त्यातून एकुणातच वर्तमानात अर्थकारण कशाप्रकारे कार्यरत आहे याचीही माहिती मिळते.

अन्य देशातील रोखे बाजारांचे स्वतःचे निर्देशक असतात.

आणि हे सर्व बाजार एकत्रितपणे जागतिक पातळीचा सेतुजालबद्ध रोखेबाजार तयार करतात.

या दृक्श्राव्यफितीचे मथळे Amara.org समूहाने तयार केले.