एबोला व्हायरसचे स्पष्टीकरण - तुमचे शरीर सर्वात जिवंत राहण्यासाठी कसे संघर्ष करते. | Kurzgesagt

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

कशामुळे इबोलाला इतका धोकादायक ठरतो?

हा विषाणू

शरीराच्या गुंतागुंतीच्या संरक्षण यंत्रणेला

इतक्या पटकन आणि परिणामकारकरीत्या कसा जेरीस आणतो?

चला तर आपण इबोला काय करतो यावर एक नजर टाकू या.

सूत्र संगीत

इबोला हा एक विषाणू आहे.

प्रत्येक विषाणू अगदी सूक्ष्म असतो.

तो आरएनए किंवा डीएनएचे तुकडे

आणि काही प्रोटीने

आणि एक आवरण यांचा बनला आहे.

त्याच्याकडे स्वतःहोऊन काहीही करण्याची क्षमता नाही.

आणि फक्त पेशींना बाधित करून

त्याला जिवंत रहाणे आणि वेगाने पुनरुत्पादन करणे त्याला शक्य होते.

हे टाळता येण्यासाठी आपल्याकडे प्रतिबंधक, -सुरक्षा प्रणाली आहे.

ही प्रतिबंधक प्रणाली कमालीची जटील असल्यामुळे

ती समजून घेणे सोपे जावे यासाठी

आम्ही दृश्य प्रणाली तयार केली.

ती काहीशी पुढीप्रमाणे दिसते.

चला! आपण …इबोला समजून घेण्यासाठी कळीच्या असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करू

आणि उरलेल्या भागांकडे दुर्लक्ष करू.

लक्षात घ्या साधारणतः शाखाकृती पेशी, विषाणूरोधी पेशींची फौज कृतिशील बनवतात

पेशींना आधार देतात…

आणि प्रतिपिंडे बनवणारे कारखाने

रक्षक पेशींबरोबर काम करून विषाणू संसर्ग काही

दिवसातच नाहीसा करतात.

पण जेव्हा इबोला धडकतो तेव्हा

तो आपल्या सुरक्षा प्रणालीवरच प्रत्यक्ष हल्ला करतो.

विषाणूंनी सुरुवातीला काबीज केलेल्या काही पेशींत

शाखाकृती पेशी असतात .

आणि त्या सुरक्षा प्रणालीसाठी मेंदूचे काम करतात.

पेशी वाहतुकीसाठी असलेल्या ग्राही पेशीत स्वतःला चिकटवून घेऊन

इबोला विषाणू शाखाकृती पेशीत प्रवेश करतो.

एकदा का तो आत शिरला की स्वतःचे आवरण विरघळवून टाकून

स्वतःचे आनुवंशिक द्रव्य, केंद्र प्रथिने आणि वितंचके मोकळी करतो

थोडक्यात सांगायचं झालं तर तो

पेशी काबीज करून तो तिची सुरक्षा यंत्रणा निकामी करतो

आणि तिची पुनर्मांडणी करतो.

ही बाधित पेशी आता विषाणू उत्पादक यंत्र बनते

आणि स्वतःचे स्रोत वापरून इबोला विषाणूंची बांधणी करते.

एकदा का ही पेशी पूर्ण भरली की तिचे आवरण विरघळते

आणि स्नायूंत दशलक्षावधी विषाणू मोकळे सोडले जातात.

हा विषाणू केवळ शाखाकृती पेशींची

विशेष आणि प्रति-विषाणू बले कृतिशिल होण्याला प्रतिबंध करतो असे नाही

तर तो विशेष पेशींना फसवणारी

इशारा प्रोटीने पाठवण्यास प्रवृत्त करून

नंतर त्यांना स्वतःचे आयुष्य अकाली संपवायलाही प्रवृत्त करतो.

अशा प्रकारे सुरक्षा प्रणाली गंभीररीत्या विस्कळीत होते

आणि प्रतिसाद देऊ शकत नाही.

जेव्हा विषाणू वेगाने स्वतःची संख्या वाढवतो… आपण अब्जावधी पेशींविषयी बोलतो आहोत हे लक्षात घ्या…

या विषाणू बाधित पेशींबरोबर लढण्यासाठी आवश्यक असलेल्या पेशी येथे आहेत.

निसर्गतः विषाणूंचा जीव घेणाऱ्या पेशी, पण त्याही स्वतः विषाणू बाधित आहेत

आणि रोग पसरणे टाळण्याचे काम करण्यापूर्वीच

त्या मरण पावतात.

त्याच वेळी इबोला

महाभक्षक कोशिका आणि एककेंद्री कोशिका या

रक्षक पेशींना बाधित करतात.

इबोला त्यांच्या संरक्षण क्षमतेच्या मुसक्या बांधून थांबत नाही तर

काहींना रक्त वाहिन्या रचणाऱ्या पेशींना

इशारे देण्यास प्रवृत्त करतो.

यामुळे त्या शरीरात द्रव मुक्त करतात.

हे एवढ्यावरच थांबते तर ठीक होते परंतु येथे

हा द्रव हिंसक अराजक माजवतो.

या विषाणूमुळे शरीरातील सर्व न्युट्रोफिल्स

जागृत… जागरूक होतात आणि परिणामी महाभक्षक कोशिकांचे इशारे

विषाणूंच्या विरोधात परिणामकारक ठरू शकत नाहीत.

शिवाय त्या लढाईत भाग घेऊ शकत नाहीत आणि

न करण्यासारख्या कितीतरी गोष्टी करू लागतात.

न्युट्रोफिल्स रक्तवाहिन्यांना अधिक स्राव मुक्त

करण्याचा इशारा देतात त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊ लागतो

इबोला कडून हल्ला होणारा शरीराचा दुसरा अवयव म्हणजे यकृत.

या विषाणूला यकृतात शिरणे

फार सोपे जाते आणि

तो झपाट्याने मोठ्या प्रमाणात यकृताच्या पेशी मारू लागतो.

यामुळे हा अवयव काम देईनासा होतो व अंतर्गत रक्तस्रावाचे प्रमाण वाढते.

या सर्व गोष्टी एकाच वेळी घडत असतात.

जसा विषाणू पसरतो तेव्हा जिकडे तिकडे अण्वस्त्रफोट होत असल्याची परिस्थिती निर्माण होते.

एखाद्या भागात विषाणूबाधेची एकच घटना घडली तर ते ठीक असते

परंतु आता सर्वत्र एकाच वेळी विषाणूबाधा घडू लागते.

रोगप्रतिबंधक प्रणालीची संपूर्ण यंत्रणा

आता तुमच्या विरोधात संसर्ग हाताळण्यासाठी उत्क्रांत झालेली असते.

आणि विषाणू सातत्याने शरीरात पसरतच जातो.

शरीर जीवावर उदार होऊन जिवंत रहाण्याचा संघर्ष करत असताना

शेवटी विषाणू शरीराच्या अधिकाधिक पेशींना संसर्गित करतो.

या निराशेपोटीच्या शेवटच्या प्रयत्नात बाजी उलटवण्यासाठी

रोगप्रतिबंधक प्रणाली परिकल विभाजनाचे वादळ उभे करते.

परिकल विभाजन हा रोगप्रतिबंधक प्रणालीने घेतलेला अखेरचा पवित्रा असतो ज्यात परिकले आणि पांढऱ्या पेशी यांच्या मदतीने प्रतिहल्ला करण्यासाठी कुंडल तयार केले जाते आणि त्यातून आम्हाला आता जगवा (save our souls) हा इशारा दिला जातो.

याच्या परिणामी रोगप्रतिकार प्रणाली तिची सर्व अस्त्रे वापरून

एकाच वेळी जीव तोडून कामिकाझी स्वरूपाचा (प्राणांची पर्वा न करता) प्रतिहल्ला सुरू करते.

यामुळे विषाणूला इजा होते परंतु त्याच वेळी मोठ्या प्रमाणात विध्वंस मागे ठेवते.

विशेषतः रक्तवाहिन्यांना इजा पोहोचवते.

जितकी रोगप्रतिकार प्रणाली तंदुरुस्त तितकी

तिला स्वतःकडून पोहोचणारी हानी जबरदस्त असते हा विरोधाभास आहे.

रक्त प्रवाहातून अधिकाधिक द्रव बाहेर पडतो.

शरीराच्या सर्व मुखांतून… छिद्रांतून रक्तस्राव होतो.

तुमच्या शरीराचे गंभीर स्वरूपाचे निर्जलीकरण होते.

इतके की अवयवांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी आता रक्तच उरलेले नसते आणि पेशी मरायला सुरुवात होते.

जर या स्थितीला तुम्ही पोहोचलात

तर तुमचा मृत्यू ओढवण्याची शक्यता खूपच जास्त असते.

सद्यस्थितीत संसर्ग झालेले दहापैकी सहा रुग्ण मृत्यू पावतात.

बाप रे! इबोला इतका धोकादायक असेल तर आपल्याला आता घाबरून रहायला हवय्.

नाही. अजिबात घाबरायचं नाही.

इबोलाची तीव्रता वर्तमानपत्रे विकली जायला कारणीभूत ठरते.

यूट्यूबच्या दृक्श्राव्यफिती सहभागी करून घेतल्यामुळे प्रत्येकजण त्याविषयी बोलत आहेत.

इबोलाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील स्रावांचा

किंवा त्याचा संसर्ग झालेल्या वाघळाच्या संपर्क होणे

हा सध्याचा संसर्ग करून घेण्याचा एकमेव मार्ग आहे

त्यामुळे तो तेवढा टाळा.

जून 2014 पासून इबोलाने 5,000 लोकांचा बळी घेतला आहे.

सर्वसाधारण फ्लू दर वर्षी 500,000 लोकांचा बळी घेतो

मलेरिया दर वर्षी एक दशलक्ष मृत्यूंना कारणीभूत होतो.

म्हणजे दर दिवसी 3,000 लोक. ही दृक्श्राव्यफित बनवायला सुरुवात केल्यापासून दहा मुले…

म्हणून इबोला भयानक आणि घाबरवणारा असला तरी

तरीही तुम्ही स्वतःला घाबरवू नका. इबोलाबाबतचा संसर्ग निर्माण व्हायला

माध्यमांनी त्याच्याभोवती तयार केलेली हवा कारणीभूत आहे.

तुम्ही रोगप्रतिकारक प्रणालीसंबंधी अधिक माहिती करून घेणे योग्य.

मरियम डेल्गाडोने लिखितसंहिता तयार केली.

उपशीर्षके Amara.org समूहाने तयार केली.

पुनरावलोकनः एस एर्व्हिट