जन्मापासून मृत्यूपर्यंत ब्लॅक होल्सचे स्पष्टीकरण. | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

अस्तित्वात असलेल्या अनेक विलक्षण गोष्टींपैकी एक आहे कृष्णविवर.

त्यांचा सहजासहजी काही अर्थ लावणे शक्य वाटत नाही.

ती येतात कोठून?

आणि जर तुम्ही त्यात पडलात तर काय होईल?

तारे हे जास्त करून हायड्रोजन अणूंचा कल्पनातीत वजनदार साठा असतो.

प्रचंड वायूमेघाच्या स्वतःच्या गुरुत्व बलामुळे कोसळण्यातून तारे तयार होतात.

त्यांच्या गाभ्यात केंद्रीय मिलाफ होऊन कुटलेल्या हायड्रोजन अणूंचे हेलियममध्ये रूपांतर होते

व प्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त होते.

प्रारण स्वरूपातील ही ऊर्जा,

गुरुत्व बलाच्या विरोधात जोर लावून

दोन बलांतील नाजुक संतुलन टिकवून ठेवते.

जोपर्यंत गाभ्यात अणूकेंद्र मिलाफ घडत असतो

तोपर्यंत तारा पुरेसा स्थिर रहातो.

आपल्या स्वतःच्या सूर्यापेक्षा जास्त द्रव्य असलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत

गाभ्यातील उष्णता आणि दाबामुळे त्यांच्यातील केंद्र मिलाप वजनदार मूलद्रव्ये घडवायला सुरुवात करतात.

ही प्रक्रिया लोह अणू घडेपर्यंत चालते

लोह निर्माण करणाऱ्या केंद्र मिलाप प्रक्रियेत,

त्यापूर्वी जी मूलद्रव्ये घडतात त्या

प्रक्रियेप्रमाणे ऊर्जा निर्माण होत नाही.

क्रांतिक प्रमाण गाठेपर्यंत

ताऱ्याच्या केंद्रात लोह रचलं जातं

आणि प्रारण व गुरुत्व यांचे संतुलन अचानक मोडित निघतं.

गाभा कोसळतो.

क्षणार्धात

तारा आक्रसतो.

गाभ्याला अधिकाधिक द्रव्य पुरवत असताना

तो प्रकाशाच्या चौथ्या भागाच्या गतीने मार्गक्रमण करतो.

ताऱ्याचा अतिदीप्त नवताऱ्यात स्फोट होत त्याचा मृत्यू होत असतानाच्या क्षणाला

विश्वातील सर्व वजनदार मूलद्रव्ये तयार झाली.

यातून एकतर न्युट्रॉन तारा तयार होतो किंवा

किंवा जर तारा पुरेसा बजनदार असेल तर

गाभ्याचे संपूर्ण द्रव्य कृष्णविवरात कोसळते.

जर तुम्ही कृष्णविवराकडे पाहाल तर

तुम्हाला जे काही दिसेल ते वास्तवात घटना क्षितिज आहे.

हे घटना क्षितिज ओलांडणारे काहीही असले तरी त्याची कृष्णविवरातून

सुटका होण्यासाठी त्याने प्रकाशापेक्षा अधिक गतीने प्रवास करणे गरजेचे आहे.

दुसऱ्या शब्दात सांगायचं तर कृष्णविवरातून काहीही मुक्त होणे शक्य नाही.

म्हणूनच आपण फक्त काळा गोल पाहतो

काहीही परावर्तित होत नाही.

पण जर घटना क्षितिज हा काळा भाग असेल तर कृष्णविवराचा विवर हा भाग कोणता असेल?

कृष्णविविराच्या विवर हा भाग कोणता?

विलक्षितता.

ते नेमकं काय आहे याची आपल्याला खात्री नाही

या विलक्षिततेची घनता अनंत आहे.

त्याचे सर्व द्रव्य अवकाशातील एका बिंदूत एकवटलेले आहे असा याचा अर्थ होतो

आणि त्याला पृष्ट वा आकार नसतो.

किंवा ते काहीतरी पूर्णपणे वेगळे असते.

या क्षणी आपल्याला काहीही माहीत नाही.

हे शून्याने भागण्यासारखे आहे.

जाता जात एक सांगायला हवं… कृष्णविवरे व्हक्क्युम क्लिनरसारखी वस्तू खेचत नाहीत.

जर आपल्याला सूर्याच्या बदल्यात तितक्याच वजनाचे कृष्णविवर मिळाले तर

तर गोठून आपला निश्चितपणे मृत्यू होण्यापलीकडे

पृथ्वीसाठी फार काही बदल होणार नाही.

जर कृष्णविवरात पडलात तर तुमचं काय होईल?

बहेरून कृष्णविवराभोवतीचा

काळाचा अनभव वेगळा असेल.

तम्ही घटना क्षितिजाकडे पोहोचताना तुम्हाला गती मंद झाल्यासारखे वाटेल.

तुमच्यासाठी काळ मंद गतीने जाईल.

कोणत्यातरी एका क्षणाला तुम्हाला काळात गोठल्यासारखं भासेल.

अगदी हळू तुम्ही लाल व्हाल

आणि अदृश्य व्हाल.

दुसरीकडे तुमच्या परिप्रेक्ष्यातून

तुम्ही उरलेलं विश्व वेगाने पुढे जात असल्याचे पाहाल.

हे भविष्यात पाहण्यासारखं असेल.

या क्षणी तरी पुढे काय घडू शकेल हे आपल्याला माहीत नाही.

पण आमच्या विचारानुसार दोनापैकी काहीतरी एक घडेल

एक तर तुम्ही पटकन मराल.

कृष्णविवर अवकाशाला इतका जास्त वक्राकार देते

की एकदा का तुम्ही घटना क्षितिज ओलांडले

की तेथे फक्त एकच दिशा शक्य आहे.

घटना क्षितिजाच्या आत हे शब्दशः खरे होणार आहे हे लक्षात घ्या…

तुम्ही फक्त एकाच दिशेने जाणार आहात.

हे एखाद्या फारच अरुंद आणि प्रत्येक पावलानंतर बंद होत जाणाऱ्या बोळातून चालण्यासारखे आहे.

कृष्णविवराचे द्रव्य इतके एकवटलेले असते

की काही ठिकाणी काही सेंटिमीटरची लहान अंतरे पार करताना

तुमच्या शरीराच्या विविध भागांवर गुरुत्व बल दशलक्ष अधिक ताकदीने कार्य करेल असा त्याचा अर्थ होतो.

तुमच्या पेशीचे भाग फाडून वेगळे केले जातील,

तुम्ही एक अणूमात्र रुंदीचा

उष्ण आयनद्रायूचा प्रवाह बनेपर्यंत

तुमचं शरीर अधिकाधिक ताणलं जाईल.

दुसरं म्हणजे तुम्ही पटकन मराल.

घटनाक्षितिज ओलांडल्यानंतर लगोलग

तुम्ही अग्नीभिंतीवर आदळाल आणि तत्क्षणी मरण पावाल.

यातील कोणताही पर्याय विशेष सुखदायी नाही.

किती लवकर तुम्ही मराल ते कृष्णविवराच्या वस्तुमानावर अवलंबून आहे.

कृष्णविवर जितकं लहान तितकं ते तुम्हाला त्याच्या घटना क्षितिजावर प्रवेश करण्यापूर्वीच मारून टाकेल.

या तुलनेत माठ्या आकाराच्या वजनदार कृष्णविवराच्या आतल्या भागात तुम्ही काही क्षण प्रवास करू शकाल.

नियमानुसार

तुम्ही विलक्षिततेच्या जितके दूर असाल

तितके तुम्ही जास्त वेळ जिवंत रहाल.

कृष्णविवरं विविध आकारात येतात.

तारकीय कृष्णविवरांचे

वस्तुमान सूर्यापेक्षा काही पट जास्त असतं

आणि त्याचा व्यास लघुग्रहाइतका असतो.

आणि प्रत्येक आकाशगंगेच्या

केंद्रस्थानी अतिवजनदार कृष्णविवरं आहेत

व ती अब्जावधी वर्षे पुरवठा करत आहेत.

सध्या ज्ञात असलेले सर्वात जास्त वस्तुमान असलेले

कृष्णविवर S5 0014+81 हे आहे.

त्याचे वजन आपल्या सूर्यापेक्षा 10 अब्ज पट आहे.

त्याचा व्यास 236.7 अब्ज किलो मीटर आहे.

हे अंतर, सूर्य आणि प्लुटो यांच्यातील अंतराच्या 47 पट आहे.

सर्व शक्तिमान कृष्णविवरांप्रमाणे

सरतेशेवटी त्यांचे हॉकिंग प्रारण नावाच्या प्रक्रियेद्वारे बाष्पीभवन होते.

हे कसे घडते याचे आकलन होण्यासाठी

आपल्याला रिकाम्या अवकाशात पाहावे लागेल.

रिकामे अवकाश हे वास्तवात रिकामे नसतेच.

ते अस्तित्वात उगवण्यासाठी

आणि एकमेकांचा नायनाट करण्यासाठी टपलेल्या आभासी कणांनी भरलेले असते.

जेव्हा कृष्णविवराच्या नेमके कडेजवळ हे घडते तेव्हा

तेव्हा एक आभासी कण कृष्णविवरात बुडवला जातो

आणि दुसरा त्यातून सुटतो आणि त्याचा वास्तव कण बनतो.

यामुळे कृष्णविवर स्वतःची ऊर्जा गमावते.

सुरुवातीला ही क्रिया कमालीची मंद असते.

जसजसे कृष्णविवर लहान होत जाते तशी ती वेगवान होत जाते.

जेव्हा ते मोठ्या लघुग्रहाच्या वस्तुमानापर्यंत लहान होते तेव्हा

तेव्हा ते कक्षतापमानाला प्रारण करते.

जेव्हा ते एखाद्या पर्वताइतक्या वस्तुमानाचे होते तेव्हा

त्याचे प्रारण आपल्या सूर्याच्या स्वरूपाचे असते.

आणि त्याच्या जीवनाच्या शेवटच्या सेकंदात

कृष्णविवर अब्जावधी, प्रचंड अशा अणूकेंद्री बॉम्बच्या स्फोटांत निर्माण होऊ शकणारी उर्जा प्रारित करून टाकतो

पण ही प्रक्रिया अत्यंत मंद असते.

आपल्या ज्ञात असलेले सर्वात मोठे कृष्णविवर

पूर्णपणे बाष्पीभूत व्हायला एक गूगॉल वर्षे घेईल

हे नाहीसं होणं प्रत्यक्ष पाहायला कोणीही आसपास असणार नाही

कारण अंतिम कृष्णविवराला प्रारित व्हायला लागणारा वेळ बराच प्रदीर्घ असेल.

हे विश्व त्याच्या फार पूर्वीच

वसती करण्याला लायक राहिलेले नसेल.

आपल्या गोष्टीचा हा शेवट नाही.

कृष्णविवरांसंबंधाने ढीगभर मौजेच्या कल्पना येथे आहेत.

आपण दुसऱ्या भागात त्यांचा शोध घेऊ.