ब्रह्मांडातील शेवटचा तारा - लाल ड्वार्फसंबंधी स्पष्टीकरण. | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

एके दिवशी शेवटच्या ताऱ्याचा मृत्यू होईल आणि हे विश्व कायमचे अंधारे होईल.

एक अगदी लहान प्रकारचा तारा; बहुधा रक्तबटू, आपल्यासाठी

परग्रह जीवन शोधण्याचा आपल्याला उपलब्ध आसणारा अगदी शेवटचा सर्वोत्तम पर्याय असेल.

विश्व जगण्यासाठी निरूपयोगी ठरण्यापूर्वी मानवांना उपलब्ध असणारे कदाचित ते अंतिम वसतीस्थान असेल.

तर याच्याविषयी आपल्याला काय माहिती आहे आणि तो आपले शेवटचे आशास्थान का आहे?

विश्वातील किमान 70% तारे हे रक्तबटू आहेत.

ते सर्वात लहान असलेले तारे आहेत. त्यांचे वस्तुमान साधारणपणे आपल्या सूर्याच्या 7 ते 50% आहे.

हे वस्तुमान आपल्या सर्वात मोठ्या गुरूग्रहाइतकेही नाही कारण तो त्यांच्या तुलनेत प्रचंड आहे

ते अतिशय मंदपणे प्रकाशतात.

केवळ डोळ्यांनी ते पाहता येणे ही अशक्यप्राय बाब आहे.

तुम्ही रात्रीच्या आकाशात एकही रक्तबटू पाहिलेला नसणार.

जर आपले सर्व तंत्रज्ञान वापरले तर आपल्याला आपल्या शेजारचे

रक्तबटू स्पष्टपणे दिसू शकतात.

पृथ्वीच्या आसपास असलेल्या 30 ताऱ्यांपैकी पैकी 20 तारे रक्तबटू आहेत.

सर्व ताऱ्यांप्रमाणे रक्तबटू हायड्रो़जन अणूंचा मिलाफ करून हेलियमअणू तयार करतात.

पण भरपूर वस्तुमान असलेले तारे तयार झालेला सर्व हेलियम स्वतःच्या गाभ्यात गोळा करतात.

रक्तबटू मात्र अभिसरण प्रक्रियेतच रहातात. म्हणजेच हेलियम आणि हायड्रोजन वायू सतत एकमेकांत मिसळत रहातात.

यामुळे मालवण्यापूर्वी… विझण्यापूर्वी… ते स्वतःचे ईंधन अतिशय कमी गतीने वापरतात.

रक्तबटू इतक्या मंदगतीने जळतात

की त्यांचा सरासरी जीवन-विस्तार एक ते शंभर महापद्म वर्षांइतका आहे.

या तुलनेत आपला सूर्य आणखी पाच शंभर कोटी वर्षे टिकून राहील.

विश्व केवळ 13.75 महापद्म वर्षांचे असल्यामुळे

एकाही रक्तबटूने पुढच्या विकास पायऱ्या गाठलेल्या नाहीत.

महापद्म वर्षांतील अस्तित्वात असलेला प्रत्येक तारा हा अजूनही बाल्यावस्थेतच आहे.

बालकांबद्दल बोलतोच आहोत तर हे लक्षात घ्या की संपूर्ण विश्वातील वयाने सर्वात लहान तारा

हा देखील रक्तबटू आहे कारण लहान रक्तबटू हे तारा म्हणून अस्तित्व संपण्याच्या काठावरचे आहेत.

ते हायड्रोजन नसलेले अतिशय तुकडे आहेत आणि ते फक्त ताम्रबटू आहेत.

अणू मिलाफप्रक्रिया फार काळ तगून न राहिल्यामुळे ते तारे म्हणून टिकू शकले नाहीत.

मग परग्रहवासीयांच्या किंवा माणसांच्या नव्या वसतीस्थानाचे काय?

आपला सू्र्य एके दिवशी मरणार असल्याच्या परिणामी आपल्याला नव्या वसतीस्थानाचा शोध घ्यायला हवा.

आणि जिथे वस्तीयोग्य ग्रह असतील तेथे परग्रहवासी देखील असतीलच.

सर्व रक्तबटूंपैकी किमान निम्म्या भोवती पृथ्वीच्या अर्ध्या ते चौपट वस्तुमानाचे दगडी ग्रह

ग्रह आहेत असे केपलर अवकाश वेधशाळेचे निरीक्षण आहे.

त्यातील अनेक ग्रह हे वस्तीयोग्य टप्प्यातील आहेत म्हणजेच ताऱ्याभोवतीच्या या क्षेत्रात पाणी द्रवरूपात असण्याची शक्यता आहे.

पण रक्तबटू तुलनेने कमी तापमानाला जळत

असल्याने त्या ग्रहाला वस्तीयोग्य होण्यासाठी तो त्याच्या बराच जवळ असायला हवा.

म्हणजे हा ग्रह बहुधा आपला बुध हा ग्रह सूर्याच्या जितका जवळ आहे त्यापेक्षाही रक्तबटूच्या जवळ असायला हवा.

त्यांचे एकमेकांच्या जवळ असणे स्वतःबरोबर अनेक समस्या आणते.

उदाहरणार्थ, ताऱ्याच्या इतक्या जवळ असलेला ग्रह बंदिस्त भ्रमण करतो

म्हणजेच त्या ग्रहाची एकच बाजू नेहमी ताऱ्याच्या बाजूला असेल. (पृथ्वीच्या चंद्राप्रमाणे)

ही बाजू प्रचंड तापलेली असेल तर सावलीत असलेली बाजू गारठून गोठलेली असेल.

म्हणजेच त्यावर जीवन असणे कठीण असेल.

जर कदाचित त्या ग्रहावर ताऱ्याची ऊर्जा विभाजित करणारा पुरेसा मोठा सागर असेल तर

तर तेथे जीवधारणेसाठी आवश्यक स्थैर्य काही प्रमाणात निर्माण होईल.

पण रक्तबटूचे सर्व गुरुत्वाकर्षण बल त्या ग्रहाला पिळवटून टाकेल

आणि काही काळातच तो तापल्यामुळे कदाचित स्वतःचे सर्व पाणी गमावून बसेल.

या ग्रहांचा शेवट शु्क्राप्रमाणे त्याचा जळता आणि उष्ण असा नरक होईल.

अनेक रक्तबटूंचे ऊर्जा प्रदान भिन्न असते ही दुसरी समस्या आहे.

ते ताऱ्यांच्या डागाने झाकले जातात आणि परिणामी त्यांच्याकडून उत्सर्जित 40% प्रकाश अनेक महिने रोखला जाईल.

याचा परिणाम म्हणून ग्रहावरचा महासागर गोठून जाईल आणि

अन्य वेळी ते शक्तिमान सौर(तारा)प्रभा उत्सर्जित करतील

तो अचानक होणारा प्रचंड असा शक्तिवान ऊर्जेचा भडका उडेल.

हे रक्तबटू काही क्षणातच त्यांची दिप्ती दुप्पट करतील.

यामुळे ग्रहाच्या वातावरणाचा बराच मोठा तुकडा खेचून घेतील व तो जाळून टाकतील.

यामुळे एकीकडे तो ग्रह वांझ होईल.

तर दुसरीकडे, त्यांचे टोकाचे दीर्घायुष्य ही मोठी जमेची बाब ठरते.

हा मध्यम पातळीच्या कृतीसह असणारे रक्तबटू

हा ग्रह म्हणजे जीवनाला आधार देणारी विस्मयकारक जागा ठरू शकेल.

जवळपास चार शंभर कोटी वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे.

आणि सूर्य अति तप्त होण्यापूर्वी अजून एक शंभर कोटी वर्षे आपल्या हातात आहेत.

त्यानंतर मात्र पृथ्वीवर गुंतागुंतीचे जीवन अस्तित्वात राहू शकणार नाही.

मानवजात एकतर नष्ट होईल किंवा नव्या ठिकाणी वस्ती करून रहायला सुरुवात करू.

योग्य परिस्थिती असलेल्या रक्तबटूभोवती

आपण जवळपास महापद्म वर्षे संस्कृती विकसित करू शकतो.

आकाशगंगेतील जवळपास 5% रक्तबटू वसती करण्यायोग्य असून ते अंदाजे पृथ्वीच्या आकाराचे आहेत.

याचा अर्थ असा की एकूण चारशे कोटी वर्षांपेक्षा जास्त काळ आपलीवस्ती टिकून राहील.

पण कदाचित आपल्याला पृथ्वीसारख्या ग्रहाची आवश्यकता असमार नाही.

रक्तबटूंभोवती असणारे वायू राक्षसांचे चंद्र हे जीवनासाठी योग्य असण्याची शक्यता आहे.

खरे पाहता ते वजनदार असलेले खडकाळ ग्रह आहेत व त्यांना उत्कृष्ट (सुपर) पृथ्वी असे म्हटले जाते.

एकट्या आकाशगंगेचा विचार करता रक्तबटूभोवती .

एकंदरीत 60 शंभरकोटी वस्तीक्षम ग्रह आसावेत असा अंदाज आहे

म्हणजेच आपल्या भविष्यातील अस्तित्वाचा विचार करता रक्तबटू हे कदाचित फार महत्त्वाचे आहेत.

पण कोणत्यातरी क्षणी सर्वांचा मृत्यू हा ठरलेलाच आहे आणि रक्तबटू त्यात आहेच.

येत्या महापद्म वर्षांत जेव्हा विश्वातील शेवटचा रक्तबटू नाश पावणार असेल तेव्हा

ती घटना फार भव्य अशी असेल.

जेव्हा त्याचा हायड्रोजन संपून जाईल तेव्हा रक्तबटू नीलबटूत रूपांतरित होईल व पूर्णपणे जळून जाईल.

जेव्हा त्याचे ईंधन संपते तेव्हा तव्हा त्याचे सफेद बटूत रूपांतर होते.

हा सफेदबटू जवळपास पृथ्वीइतका लहान असतो आणि तो अगदी दाटीने बांधला गेलेला असतो.

तो ऱ्हास झालेल्या वायूंचा… हेलियम-4 अणूकेंद्रांचा बनलेला असतो.

कोणत्याही प्रकारचा उर्जास्रोत नसल्यामुळे तो टोकाच्या संथपणे थंड होत जाईल.

शेवटच्या स्थितीला पोहोचण्यासाठी म्हणजे थंड काळाबटू होण्यासाठी त्याला महापद्म वर्षे लागतील.

चित्तवेधक असल्यामुळे सफेद व काळे बटू समजून घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या दृक्श्राव्यफिती बनवाव्या लागतील.

काहीही असले तरी विस्वातील शेवटचा तारा गायब होण्यापूर्वी या फिती बनवायला खूप वेळ लागेल.

विश्वातील प्रकाश बंद होण्यापूर्वी आपल्यापाशी असलेला भरपूर वेळ वापरून जर मानव

अवकाश-साहस करण्यात यशस्वी ठरू शकला तर ते माहीत असणे आपल्याला उत्तेजित करणारे आहे.

तुम्ही Patreon.com. वर आमच्या दृक्श्राव्यफितीला दिलेल्या पाठबळाबद्दल आभार.

अधिक दृक्श्राव्यफिती बनवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत दिल्यास आम्हाला ते खूप आवडेल.

उपशीर्षकेः Amara.org समूहाकडून