इराकमध्ये ISIS, सीरिया आणि युद्ध समजलेले. | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

अरे देवा! इराकची समस्या संपली असं तुम्हाला नेमकं केव्हा वाटलं…

कारण काही काळ तुम्ही त्याबद्दल काहीही ऐकलेलं नाही…

खूनी अंदाधुंदी आणि दहशत… हे सगळं काही तेथे पुन्हा स्थिरावलं आहे…

झालं तरी काय?

2003 मध्ये दहशतवादाशी संबंध आणि व्यापक विध्वंस करणाऱ्या शस्त्रास्त्रांचा साठा असल्याच्या

संशयावरून अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं.

त्या वेळी देशावर सद्दाम हुसेन या क्रूर हुकूमशहाचं शासन होतं.

तो सुन्नी अल्पसंख्यांकांपैकी होता

आणि शिया बहुसंख्यांकाना दडपत होता.

इराकवर बऱ्यापैकी झटकन विजय मिळूनही

त्या देशाच्या भविष्याविषयी अमेरिकेकडे कोणतीही योजना नव्हती.

पण तोपर्यंत बहुसंख्यांक शियांनी वर्चस्व प्रस्थापित करून

सुन्नींना दडपणे सुरू केले.

करण अन्य पंथांना दडपणे ही उत्तम कल्पना असल्याचे सिद्ध झाले आहे.

याचा परिणाम म्हणून सुन्नी बंडखोरांनी डोके वर काढायला सुरुवात करणे यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही.

आणि अल-कायदा सारखे दहशतवादी गट इराकमध्य घुसले…

आणि पूर्वीच्या सैन्यात बहुतकरून स्थानिक सुन्नींचं प्राबल्य होतं. त्या सैन्याने

अमेरिकेच्या सैन्याशी व नव्याने अस्तित्वात आलेल्या राज्याशी लढाई सुरू केली.

परिणामी 2006 मध्ये रक्तरंजित नागरी युद्ध झाले.

तेव्हापासून इराकच्या जनतेचे पंथांवरून विभाजन झालेले आहे.

ज्या दहशतवाद्यांना नाहीसं करण्यासाठी अमेरिकेने आक्रमण केलं

त्याच आक्रमणाने दहशतवाद फोफावला हा इतिहासातील दुःखद दैवदुर्विलास आहे

कारण आता इराक हे दहशतवादाचे परिपूर्ण प्रशिक्षण केंद्र बनले आहे.

या गुंतागुतीच्या संघर्षाचे चांगले आकलन करून घेण्यासाठी

आपल्याला मुस्लिम धर्मियांच्या शिया आणि सुन्नी या दोन पंथांतील

परस्परसंबंध समजून घेतले पाहिजेत.

जगातील एकूण मुस्लिमांपैकी जवळपास 80% सुन्नी आहेत तर जवळपास 20% शिया आहेत.

आणि दोन्ही बाजूंकडच्या कडव्यांना एकमेकांविषयी जराही आपुलकी नाही.

सौदी अरेबिया आणि इराण हे पंथांच्या या खेळातील दोन ताकदवान खेळाडू आहेत.

त्यांना स्वतःच्या राज्यांचे आणि धर्माचे विभाजन यासारख्या आणि देशांतर्गत समस्या नाहीत आणि भरीला त्यांच्याकडे

खनीज तेलातून मिळालेला गडगंज पैसा आहे.

ते या विभिन्न पंथांच्या एकमेकांशी लढणाऱ्या गटांना पाठबळ पुरवतात.

या दहशतवादी संघटनांपैकी पैकी सौदी अरेबियाकडून पाठबळ मिळणारी

इस्लामिक इराक राज्य किंवा थोडक्यात आयएसआय ही एक संघटना होती.

2010 मध्ये अरब स्प्रिंग ही घटना घडली

आणि मध्यपूर्वेतील सर्व परिस्थिती पालटली.

बशार अल् असद हा सिरियातील हुकूमशहा राजीनामा द्यायला तयार नव्हता …

आणि त्याने आपल्याच जनतेविरोधात भीषण नागरी युद्ध छेडले.

जसे युद्ध लांबत गेले तसे त्या लढाईत परदेशी लोक सामील होत गेले.

बहुसंख्य लोक हे धार्मिक करणांमुळे

आणि त्या प्रदेशात इस्लामचे राज्य उभारण्याच्या ध्येयाने त्यात ओढले गेले.

यापैकी एक कुप्रसिद्ध आयएसआय ही संघटना आता

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरिया किंवा आयसिस झाली आहे.

ते वर्षानुवर्षे इराकमध्ये लढत आहेत

आणि त्यांच्याकडे उत्तम प्रशिक्षण घेतलेले हजारो धर्मांध सैनिक आहेत

उत्तर इराकच्या काही भागांचे नियंत्रण जणू काही आता त्यांच्याच हातात आहे

आणि त्यांनी त्यांच्या धर्माचे राज्य उभारण्याचा निर्धार केला आहे.

आणि ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती अशाप्रकारे त्यांनी सिरियातील धर्मांध खेळ बदलून टाकला आहे.

आयसिस हा विश्वास बसणार नाही इतक्या टोकाचा हिंसक आणि कडवा गट आहे

की त्याने सिरियाच्या जवळपास प्रत्येक बंडखोर सैनिक तुकडीबरोबर लढाई छेडलेली आहे.

त्यांनी इतर मुस्लिम दहशतवादी गटांवर हल्ले करून त्यांच्या सदस्यांना ठार केले आहे.

त्या प्रदेशात त्यांचे नियंत्रण असून तेथे त्यांनी इस्लामिक राज्य उभारले आहे.

त्यांचे शासनाचे नियम इतके कडक आहेत की अल् कायदा आणि सौदी अरेबिया यांच्यासारख्या कडव्यांनाही त्याचा धक्का बसला

आणि त्यांनी त्यांचे पाठबळ काढून घेतले.

असंख्य नागरिकांच्या खुनांसाठी,

असंख्य आत्मघातकी बॉम्बफोटांबद्दल, स्त्रिया व मुलांना ओलीस ठेवण्याबद्दल,

त्यांच्या कैद्यांच्या फाशी आणि शिरच्छेदांबद्दल त्यांनी आयसिसला जबाबदार धरले आहे.

मध्युगीन अमानुषतेच्या या सर्व प्रकारांचे विवरण टाळणेच योग्य ठरेल.

इराकचा अधिक प्रदेश ताब्यात घेण्याची ही वेळ आहे…

असा या सर्व “प्रेमळ” मानवी समूहांच्या मेळ्याने निर्णय घेतला आहे.

अमेरिकेने इराक सोडल्यापासून शिया पंतप्रधान नोउरी अल् मलिकी यांनी

सु्न्नींच्या विरोधात शक्य असेल तेथे ताकद एकवटली आहे…आणि त्यांच्या बाबतीत भेदभाव करणे सुरू ठेवले आहे.

इराकी शासन हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी, अक्षम समजले जाते

आणि त्याच्या बहुसंख्य नागरिकांकडून त्याचा निश्चतपणे तिरस्कार केला जातो..

इराकी सैन्य 3,00,000 सैनिकांनी बनलेले असून

आणि त्यासाठी करातून मिळालेल्या 250 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम खर्च केली आहे.

पण हे सैन्य स्वतःच्या शासनाला धार्जिणे नाही.

ते एकतर शहरामागून शहरातून माघार घेत आहे किंवा त्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकत आहेत.

कारण विरोध करणाऱ्या प्रत्येकाला ठार केले जाईल अशी आयसिसने घोषणा केली आहे.

आणि त्यांनी त्यांचा इरादा वेळोवेळी सिद्ध केला आहे.

जून 2014पर्यंत त्यांनी इराकचा मोठी तुकडा जिंकून घेतला.

यात इराकमधील मोसुल हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर सामील आहे.

ताब्यात घेतलेल्या बँकांतील दशलक्षावधी रुपये त्यांनी चोरले आहेत.

यातून त्यांनी स्वतःच्या संघटनेला पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत दहशती संघटन बनवलेले आहे.

आणि ते सातत्याने परमावधीचे मध्युगीन धार्मिक राज्य

प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

इराण आणि अमेरिका त्यांच्याशी एकत्रितपणे लढत देण्याचा विचार करत आहेत.

ही परिस्थिती कशाप्रकारे भीषण झाली हे तुमच्या लक्षात आले असेल…

देश पुन्हा उभा करण्याची किंमत मोजून तुम्ही युद्धात पराजित केलेल्या लोकांची त्यांना सत्तेपासून, जगण्यापासून वंचित ठेवून

त्यांची पिळवणूक केली जात आहे हे इराकमधील घटनांनी दाखवून दिले आहे.

या घटना फक्त हिंसेच्या दुसऱ्या उसळीची बिजे दाखवत आहेत.

काहीही करून आपल्याला हे कडे तोडून टाकायला हवे.