मानवी उत्पत्ती: इतिहासापूर्वी काय घडलं? | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

आपण राहतो ते जग आपल्याला सर्वसाधारण आणि सामान्य वाटत असतं.

असं वाटतं की माणसांचे अस्तित्व असंच असतं आणि नेहमीच माणसे अशीचच अस्तित्वात होती.

पण, तसं नाही.

या पूर्वी कधीही आपण मानव आजच्या सारखे अत्याधुनिक आणि आपल्या गरजांना योजनाबद्धपणे अनुकूल करून घेतलेल्या जगात रहात नव्हतो.

या जगाने आपल्याला स्वतःला आणि आपल्या अस्तित्वाची काळजी विसरून जगण्याची चैन करण्याची मोकळीक दिली.

अन्न, निवारा, सुरक्षा -हे सर्व काही, कमी-जास्त असू शकेल, पण ते सर्व गृहित धरले जाते.

परंतु या सोयींसह जगणारे आपण थोडेच लोक विशेष आहोत कारण मानवी इतिहासाच्या 99.99% कालावधीतील लोकांचे जीवन पूर्णपणे वेगळे होते.

आणि फक्त एकच मानवी इतिहास अशी काही गोष्ट अस्तित्वातच नाही.

आमची कथा 6 दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाली . यावेळी होमीनिनी या टोळीचे विभाजन झाले आणि माकडांशी असलेले आपले नाते संपले.

2.8 दशलक्ष वर्षांपूर्वी मानव (होमो) प्रजातीची पोटजात म्हणजेच पहिला मानव उदयाला आला.

आपल्याला माणूस म्हणून फक्त स्वतःबद्दल विचार करायला आवडतो पण हे सत्यापासून फारच दूर आहे.

जेव्हा 200,000 वर्षांपूर्वी आपण मानव अस्तित्वात आलो, तेव्हा किमान सहा इतर मानवी प्रजाती त्याच्या आसपास अस्तित्वात होत्या.

तुलनाकरता येण्याजोगी बुद्धिमत्ता आणि क्षमता असणारे हे भाईबंद एकमेकांना आश्चर्यकारकरीत्या घाबरत होते असावेत त्यामुळे ते एकमेकांसाठी परग्रहवासी असल्याप्रमाणे जगत होते.

त्यातील काही खूपच यशस्वी ठरले.

होमो इरेक्टस ही उपजाती 2 दशलक्ष वर्षे टिकून राहिली.

म्हणजे ते आधुनिक मानवाच्या तुलनेत दहापट जास्त काळ अस्तित्वात होते.

इतर मानव उपजातींतील शेवटचा मानव साधारण 10.000 वर्षांपूर्वी नामशेष झाले.

अशा कोणत्या कारणाने ते मृत्यू पावले हे आपल्याला माहीत नाही.

निअँडरथॉल किमान काही टक्के आणि इतर मानवी डीएनए आाधुनिक मानवात आहेत म्हणजेच त्याच्यात काही मिश्रण आहे.

पण, प्रजाती एकमेकांत विलीन झाल्या असे म्हणण्यासाठी हे नक्कीच पुरेसे नाही.

म्हणूनच आपले भाईबंद स्रोतांवर मालकी मिळवण्याच्या लढाईत हरल्यामुळे किंवा छोट्या वंशहत्यांच्या मालिकांमुळे नामशेष झाले हे आपल्याला माहीत नाही.

काहीही असो पण आपण मात्र राहिलो.

तर आता पुन्हा मानवतेच्या सुरुवातीकडे वळूया.

2.8 दशलक्ष वर्षांपूर्वी आदिम मानवाने उपकरणे वापरली …

पण आगीवर नियंत्रण मिळवायला शिेकेपर्यंत जवळ जवळ 2 दशलक्ष वर्षे तो फार मोठी प्रगती साधू शकला नाही.

आग म्हणजे स्वयंपाक. यामुळे अन्न अधिक पोषक बनले आणि त्याने मेंदूच्या विकासात योगदान दिले.

आगीने प्रकाश आणि ऊब निर्माण केली यामुळे दिवसाची लांबी वाढली आणि हिवाळ्याची भेसूरता कमी केली.

भरीस भर म्हणून आगीने हिंस्र जनावरांना भीती दाखवून पळवून लावले एवढेच नाही तर तिचा उपयोग शिकारीसाठीही होऊ लागला.

जळलेले जंगल किंवा गवताळ भूमीने लहान प्राणी पुरवले, कठीण कवचाची फळे व कंद आयते भाजून मिळाली.

300,000 वर्षांपूर्वी पासून, बहुतेक विभिन्न मानवी प्रजाती शिकारी-फळे व कंद गोळा करणाऱ्या छोट्या समाजांत जगत होता.

त्यांच्याकडे आग, लाकूड, दगडी उपकरणे होती. त्यांनी भविष्याची योजना आखली होती, त्यांचे मृत त्यांनी पुरले आणि त्यांना स्वतःची संस्कृती होती.

पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते एकमेकांशी बोलले.

ही बहुधा आपल्या आजच्या भाषेपेक्षा कमी जटील अशी एक प्रकारची पूर्वज भाषा होती असावी.

जर आपल्याकडे कालयंत्र असेल तर आपण किती दूरच्या भूतकाळात जाऊ शकू.

थोडी बाळे पळवा आणि आज त्यांना असं वाढवा की ती थोडी वेगळी आहेत हे कोणाच्याही लक्षात येणार नाही.

याबाबत अर्थातच बरेच वाद आहेत.

शरीररचनाविज्ञानुसार 200,000 वर्षांपूर्वी आधुनिक मानव उदयाला आला.

आपण बहुधा जास्तीत जास्त 70,000 वर्षे मागे प्रवास करून वर्तनाने आधुनिक मानवाची गाठ घेऊ शकतो… त्याला पकडू शकतो.

त्या पूर्वीच्या बाळांत मात्र बहुतेक कळीच्या जनुकीय उत्परिवर्तनांचा अभाव होता.

ही उत्परिवर्तने आधुनिक भाषा आणि अमूर्त विचारकौशल्यांनी युक्त आशा मेंदूची रचना होण्यासाठी आवश्यक होती.

साधारणपणे 50.000 वर्षांपूर्वी कोणत्यातरी विशिष्ट काळात नवनिर्मितीचा स्फोट झाला,

यामुळे उपकरणे आणि शस्त्रे अधिक अत्याधुनिक झाली आणि संस्कृती अधिक गुंतागुंतीची झाली.

कारण या टप्प्याला, मानवाला बहुउद्देशीय मेंदू प्राप्त झाला होता….

आणि एकमेकांशी माहिती संप्रेषणाद्वारे प्रभावीपणे, खोल तपशीलात जाऊन संवाद साधण्यासाठी…

अधिक प्रगत भाषाही प्राप्त झाली होती.

संप्रेषणाच्या उपलब्धीमुळे जास्त जवळिकीने सहकार्य साधणे शक्य झाले आणि या पृथ्वीवरील अन्य कोणत्याही प्राण्याच्या तुलनेत आपण खऱ्या अर्थाने वेगळे ठरायला हीच उपलब्धी कारणीभूत ठरली.

तुलनेने दुबळी शरीरे आणि निम्न प्रतीची संवेदन क्षमता नाही तर मोठ्या गटांत लवचीकपणे सहकार्य करण्याची क्षमता आपल्या उपयोगाची ठरली.

उदाहरण द्यायचे तर आपले समूह मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे

किंवा लांडग्यांचा परस्पर जिव्हाळा असलेला परंतु छोट्या कळपाप्रमाणे ताठर नाहीत.

जसा आपला मेंदू उत्क्रांत होत गेला तसतसे आपल्या काही करता येऊ लागले पण तोपर्यंत जीवनात पुढील गोष्टी केल्या जात नव्हत्या.

एक - वेगाने ज्ञानविस्तार.

दोन - पिढ्यांपिढ्यातून प्राप्त केलेल्या ज्ञानाचे जतन.

तीन - अधिक खोल अंतःदृष्टी मिळवण्यासाठी पूर्वज्ञानाच्या आधारे ज्ञानाची बांधणी करणे.

हे अविचाराचे वाटेल पण वरील प्रगती गाठेपर्यंत माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवावी लागत होती.

हे आनुवंशिकतेने घडत होते आणि हा प्रगतीचा कार्यक्षम मार्ग नव्हता.

तरीही, पुढील 40,000 वर्षे, मानवी जीवन जवळपास तसेच राहिले.

ज्यावर काही बांधणी करावी तो पायाच मामुली होता.

आपले पूर्वज अनेक प्राण्यांपैकी एक होते.

घर म्हणजे काय याचे ज्ञान असल्याखेरीज गगनचुंबी इमारत बांधणे कठीण आहे.

आपल्या पूर्वजांबाबत वृत्तीने उद्दाम असणे सोपे असले तरीही पण तसे करणे हा अज्ञानीपणा आहे.

50,000 वर्षांपूर्वी माणसे टिकाव धरण्यात विशेषज्ञ होती.

त्यांच्याकडे त्यांच्या प्रदेशाचा विस्तृत मानसिक नकाशा होता.

त्यांच्या संवेदना त्यांच्या पर्यावरणाशी सुसंवादित झाल्या होत्या.

त्यांना वनस्पती आणि प्राणी यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती होती व त्यांनी ती तोंडपाठ होती.

अनेक वर्षांच्या काळजीपूर्वक प्रशिक्षणाची आणि नाजुक शारीरिक कौशल्यांची गरज असलेली गुंतागुंतीची उपकरणे तो घडवत.

आजच्या आपल्या खेळाडूंच्या तुलनेत त्यांची शरीरे त्यांच्या दैनंदिन चाकोरीमुळे सुदृढ होती…

आणि ते त्यांच्या जमातीत सधन सामाजिक जीवन जगले.

प्रारंभिक आधुनिक मानवाच्या सर्वसाधारण आकारमानाच्या मेंदूला टिकाव धरण्याची अनेक कौशल्ये प्राप्त असणे आवश्यक होते…

म्हणूनच त्यांचा मेंदू कदाचित आजच्या मेंदूच्या आकारापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे.

एक गट म्हणून आम्हाला आज खूप माहिती आहे, पण एक व्यक्ती म्हणून आपले पूर्वज आपल्याहून श्रेष्ठ होते,

पण नंतर सुमारे 12,000 वर्षांपूर्वी, विविध ठिकाणच्या मानवांनी शेती विकसित केली.

यानंतर सर्व काही वेगाने बदलले.

त्यापूर्वी एक शिकारी आणि अन्न शोधार्थ भटकणारे म्हणून टिकाव धरण्यासाठी, प्रत्येकाकडे सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट शारीरिक आणि मानसिक कौशल्ये असणे आवश्यक होते.

कृषियुगाच्या उदयानंतर टिकाव धरण्यासाठी व्यक्तींना वाढत्याप्रमाणात इतरांच्या कौशल्यांवर अवलंबून रहाणे शक्य झाले.

याचा अर्थ हा की त्यांतील काहींना विशेषज्ञ होणे शक्य झाले.

कदाचित त्यांनी अधिक चांगली उपकरणे बनवण्यासाठी काम केले, कदाचित त्यांनी वेळ अधिक प्रतिरोधक पिकांची किंवा चांगल्या पशुधनाची उपज करण्यासाठी वेळ दिला असेल.

कदाचित त्यांनी गोष्टींची निर्मिती करण्यास सुरुवात केली असेल.

शेती अधिकाधिक कार्यक्षम होऊ लागली तशी आपण ज्याला संस्कृती म्हणतो त्याची सुरुवात झाली.

शेतीने विश्वसनीय आणि ज्याबाबत अचूक अंदाज बांधता येईल असा अन्न स्रोत दिला.

यामुळे मानवाला प्रथमच मोठ्या प्रमाणात अन्न साठवून ठेवण्याची मोकळीक मिळाली.

मांसापेक्षा दाणे साठवणे खूपच सोपे होते.

अन्न साठ्याला संरक्षणाची गरज होती आणि यातून समूहांना लहान जागांत एकत्रपणे रहाणे गरजेचे वाटू लागले.

प्रथम, सुरुवातीची संरक्षण संरचना उभी राहिली, संघटन वाढविण्याची गरज वाढली

जसजसे आपण संघटित होत गेलो तशा गोष्टी वेगाने कार्यक्षम होत गेल्या.

गावे झाली शहरे, नगरे राज्ये झाली, राज्ये साम्राज्ये झाली.

मानवांदरम्यानच्या सहसंबंधांचा प्रस्फोट झाला व त्यातून ज्ञानचे आदान-प्रदान करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या.

प्रगती घातांकच्या पटीत वाढू लागली.

500 वर्षापूर्वी वैज्ञानिक उत्क्रांती सुरू झाली.

गणित, भौतिकी, खगोलविज्ञान, जीवविज्ञान, आणि रसायनविज्ञान यामुळे आम्हाला सर्व काही माहीत आहे असा विचार आम्ही करत होतो ते सर्व काही बदलून गेले.

आधुनिक जगाचा पाया घातल्यानंतर त्यापाठोपाठ लगेचच औद्योगिक क्रांती अवतरली.

आमच्या एकूणच कार्यक्षमता जसजशा घातांकाच्या पटीत वाढल्या,

तसतसे अधिक लोक माणुसकीच्या प्रगतीसाठी स्वतःचे आयुष्य वेचू लागले

क्रांती सातत्याने होत राहिली.

संगणकाची निर्मिती, त्याची माध्यम म्हणून उत्क्रांती यांचा आपण सर्व रोजच वापर करू लागलो.

आणि आंतरजालाच्या उदयाने आमच्या जगाला आकार दिला.

ते सर्व इतक्या वेगाने कसे झाले याचे आकलन करून घेणे कठीण आहे.

पहिली मानवी प्रजाती उदयाला आल्यानंतर सुमारे 25,000 पिढ्या आतापर्यंत झाल्या आहेत.

शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानवाने दिवसाचा प्रकाश प्रकाश पाहिल्यानंतर सुमारे 7,500 पिढ्या झाल्या आहेत.

500 पिढ्यांपूर्वी, आपण ज्याला संस्कृती म्हणतो तिचा आरंभ झाला.

20 पिढ्यांपूर्वी आपण विज्ञान अस्तित्वात आणायला शिकलो.

केवळ एका पिढीपूर्वी बहुतेक लोकांना आंतरजाल उपलब्ध झाले.

आतापर्यंत अनुभवलेल्या काळापेक्षा मानवतेच्या सर्वात जास्त समृद्ध युगात आज आपण रहातो आहोत.

वातावरणाच्या घडणीपासून ते मोठ्या भूदृश्यात झालेल्या प्रमाणातील बदलांपासून…

आणि इतर प्राण्याच्या (जीवांच्या) अस्तित्वाच्या स्वरूपातही आपण हा ग्रह बदलून टाकला आहे..

आपण कृत्रिम ताऱ्यांनी रात्री उजळतो आणि धातूच्या खोक्यातून लोकांना आकाशात पाठवले आहे.

काही जण तर आपल्या चंद्रावरही चालले.

आपण इतर ग्रहांवर यंत्रमानव पाठवले.

आपण यांत्रिक डोळ्यांच्या मदतीने विश्वाच्या भूतकाळात खोलवर पाहिले आहे.

आमचे ज्ञान आणि आमचे ज्ञान मिळवण्याच्या व त्याचा संचय करण्याच्या मार्गांचा प्रस्फोट झाला आहे.

काही शतकांपूर्वीच्या विद्वानाला विश्वाबद्दल जेवढी माहिती होती त्याहून जास्त माहिती आजच्या माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांला असते.

जरी आपले नियम ठिसूळ असले तरी मानव या ग्रहावर वर्चस्व गाजवित आहे.

आपण अजूनही आपल्या 70,000 वर्षांपूर्वींच्या पूर्वजांपेक्षा वेगळे नाही.

पण आपली जीवनशैली मानव इतिहाच्या 0.001% पेक्षाही कालखंडातच अस्तित्वात आहे.

आजपासून यापुढे आपल्यासाठी भविष्यात काय वाढून ठेवले आहे याबद्दल काहीही सांगता येत नाही.

आपण एक गगनचुंबी इमारत बांधत आहोत, पण ती भक्कम पायावर उभी आहे की घसरत्या पुळणीवर उभी आहे …

याची आपल्याला खात्री नाही.

आतापुरता तरी आपण हा विचार करण्याचे थांबवूया.

जर पुढच्या वेळी तुमची आगगाडी चुकली, तुमचा वडापाव पुरेसा गरम नसेल, किंवा रांगेत कोणी तुमच्यापुढे घुसले तर

हे कृत्रिम मानव जगत किती खास आहे हे आठवा…

कदाचित अशा सर्व क्षुल्लक गोष्टामुळे नाराज होण्याला काही अर्थ नसेल.

ठीक आहे. इतिहासाशी संबंधित दृक्श्राव्यफित बनवण्याचा आमचा हा पहिलाच प्रयत्न होता.

आम्हाला अशा खूप दृ्कश्राव्यफिता तयार करणे आवडेल पण साधारण दृक्श्राव्यफिही तयार व्हायला बराच वेळ घेते.

त्यामुळे आम्हाला वर्षाला फार तर 3 किंवा 4 दृक्श्राव्यफिती बनवता येतात.

आपल्या अभिप्रायाचे आम्ही स्वागत करतो.

फित पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष पाठबळ देऊ इच्छित असाल तर …

तुम्ही ते Patreon वर करू शकता.

तो खरोखर आम्हाला मदत करते.

आपण अधिक लक्ष विचलित आवश्यकता असल्यास आपण विचार असून, अधिक व्हिडिओ आहेत.