व्हिडिओ
ट्रान्स्क्रिप्ट
जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुम्ही हल्ल्याच्या दहशतीखाली असता.
अब्जावधी बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीचे प्रकार तुमच्या शरीराला स्वतःचं घर बनवण्याच्या प्रयत्नात असतात.
या सर्वांपासून म्हणजेच मृत्यूपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी
आपल्या शरीराने रक्षक, सैनिक, शोध व्यवस्था, शस्त्रास्त्र कारखाने आणि संप्रेषक यांची अति गुंतागुंतीचे छोटेसे संरक्षण दल विकसित केले आहे.
या दृक्श्राव्यफितीपुरतं असं गृहीत धरू की प्रतिबंधक प्रणाली विविध प्रकारची 12 कामं करते. उदाहरणार्थ, शत्रूला ठार करणे, संप्रेषण करणे इत्यादी
आणि यासाठी 21 विविध पेशी आणि 2 प्रोटीन बलें आहेत.
या पेशींना 4 विविध कामे करावी लागतात.
ती निश्चित करूया. या आहेत या आंतरक्रिया.
आता त्या समजून घेण्याच्या दृष्टीने मांडूया.
सर्वप्रथम आपण कामांना रंग देऊया.
आता प्रत्येक चौकट स्पष्ट करूया.
मध्यावरील रंग पेशीचे मुख्य कार्य निर्देशित करतो.
त्याच वेळी भोवतालचा रंग दुय्यम कर्तव्य निर्देशित करतो.
आता प्रतिबंधक प्रणाली या प्रमाणे दिसते.
आता आंतरक्रिया पाहूया.
ही जटीलता भीतिदायक नाही काय?
या दृक्श्राव्याफितीत आपण फक्त या पेशीविषयी बोलूया आणि अन्यांकडे दुर्लक्ष करूया.
मग संसर्गाच्या बाबतीत काय घडतं.
तो एक सुंदर दिवस आहे आणि अचानक एक गंजलेला खिळा उद्भवतो आणि तुम्ही स्वतःला कापून घेता.
प्रतिबंधक प्रणालीच्या पहिल्या अडथळ्यात फूट पडलीः तुमच्या त्वचेला भेग पडली.
आसपासच बॅक्टेरिया या संधीचा फायदा घेतात आणि तुमच्या जखमेत प्रवेश करतात.
ते तुमच्या शरीराचे स्रोत वापरून त्यांची संख्या दर वीस मिनिटांनी दुप्पट करतात.
सुरुवातीला ते नियंत्रणाखाली असतात, पण जेव्हा त्यांची संख्या विशिष्ट होते
ते त्याचं वर्तन बदलतात आणि त्यांच्या भोवतीचं पर्यावरण बदलून शरीराचा नाश करायला सुरुवात करतात.
प्रतिबंधक प्रणालींने त्यांना शक्य तितक्या लवकर थांबणं आवश्यक असतं.
सर्वप्रथम तुमच्या संरक्षक पेशी, ज्यांना महाभक्षी कोशिका म्हणतात, मध्ये पडतात.
त्या शरीराच्या प्रत्येक सीमाभागाचे रक्षण करणाऱ्या प्रचंड पेशी आहेत.
बहुतेकवेळी त्या एकट्याच या हल्ल्याचा बिमोड करतात
कारण त्यांच्यापैकी प्रत्येक शंभर हल्लेखोरांना गिळू शकते.
त्या हल्लेखोराला अख्खा गिळून त्याची आवरणात गठडी बांधतात.
नंतर शत्रूचे विकरांकडून तुकडे होऊन तो ठार केला जातो.
या बरोबरीने ते रक्तवाहिन्यांना या लढाई क्षेत्रात पाणी सोडण्याची आज्ञा देऊन दाह निर्मितीला कारणीभूत ठरतात
आणि यामुळे लढाई सोपी होते.
मध्यम स्वरूपाच्या सूजेच्या स्वरूपात तुम्ही हे पाहू शकता.
जेव्हा महाभक्षी कोशिका दीर्घ काळ लढाई करतात
तेव्हा त्या दूत-प्रोटीने मुक्त करून, स्थान आणि निकड संप्रेषित करून या लढाईला मोठा आधार पुरवतात.
याच्या परिणामी न्यूट्रोफिल रक्तातील स्वतःचे गस्तीमार्ग सोडून लढाईच्या क्षेत्राकडे वळतात.
न्यूट्रोफिल इतक्या आवेशानं लढतात की या प्रक्रियेत त्या निरोगी पेशींनाही ठार मारतात.
या बरोबरीने त्या बॅक्टेरियांना बंदिस्त करून त्यांना ठार करणारे अडथळे निर्माण करतात.
स्वतःकडून फार मोठा हानी घडू नये म्हणून पाच दिवसानंतर आत्महत्या करण्यासाठी त्या उत्क्रांत झालेल्या आहेत, इतक्या त्या भीतिदायक आहेत.
आक्रमण थोपवण्यासाठी हे पुरेसे पडत नसेल तर प्रतिबंधक प्रणालीचा मेंदू यात उडी घेतो.
शाखाकृती पेशी कृतिरत होऊन ती संरक्षक शिपायांना इशारे देते आणि शत्रूचे नमुने गोळा करायला सुरुवात करते.
ते शत्रूचा चेदामेंदा करतात आणि त्यांच्या भागांना स्वतःच्या बाह्य आवरणावर ठेवतात.
आता शाखाकृती पेशी कळीचा निर्णय घेतात.
संसंर्ग झालेल्या शरीर पेशींचा नाश करणाऱ्या विषाणूरोधी बलाला बोलवायचे
की बॅक्टेरियांना ठार करणाऱ्या दलाला बोलवायचे?
या बाबतीत बॅक्टेरियारोधी बले आवश्यक आहेत.
हे दल साधारणपणे दिवसभराच्या अवधीत सर्वात जवळच्या लसिकग्रंथीपर्यंत प्रवास करते.
येथे अब्जावधी साहाय्यक आणि जीव घेणाऱ्या टी पेशी कृतिरित व्हायला सज्ज असतात.
जेव्हा टी पेशी जन्माला येतात तेव्हा त्या अत्यंत कठीण आणि जटील अशा प्रशिक्षण प्रक्रियेतून जातात आणि
त्यापैकी फक्त एकचतुर्थांश टिकाव धरतात.
या तगून राहिलेल्या पेशी विशिष्ट रचनेने सुसज्ज असतात.
शाखाकृती पेशी स्वतःच्या मार्गात योग्य अशा रचनेच्या साहाय्यक टी पेशीच्या शोधात असते.
शाखाकृती पेशी स्वतःच्या आवरणावर मांडलेल्या घुसखोराच्या भागांना बांधून घेईल अशा प्रकारच्या सहाय्यक टी पेशीच्या शोधात असते.
जेव्हा तिला अशी पेशी सापडते तेव्हा साखळी अभिक्रिया सुरू होते.
जेव्हा साहाय्यक टी पेशी कृतिशील होते, ती झपाट्याने हजारोपटीने स्वतःच्या प्रती निर्माण करते.
यातील काही स्मृती टी पेशी होऊन लसिकाग्रंथीत रहातात आणि तुम्हाला या शत्रूच्या विरोधात पूर्णपणे सुरक्षित बनवतात.
काही मदतीसाठी युद्धक्षेत्राकडे प्रवास करतात.
आणि तिसरा गट अतिशय सामर्थियवान अशा शस्त्रास्त्र निर्माणीला कृतिरत बनवण्यासाठी
लसिकाग्रंथीच्या केंद्रापर्यत प्रवास करू लागतो.
टी पेशीप्रमाणेच त्या विशिष्ट रचनेने युक्त असतात.
आणि जेव्हा समान रचनेची बी पेशी आणि टी पेशी एकमेकांना गाठतात तेव्हा जणू काही नरकाचं साम्राज्य सूरू होतं.
बी पेशी वेगाने स्वतःच्या प्रती निर्माण करून सक्षावधी छोटी शस्त्रे निर्माण करू लागतात.
त्या खूप कष्टाचे काम करतात आणि अक्षरशः वेगाने थकून मृत्यू पावतात.
या ठिकाणी साहाय्यक टी पेशी दुसरी महत्त्वाची भूमिका करतात. त्या काम करणाऱ्या कष्टाळू निर्माणींना चेतवून सांगतातः
इतक्यात मरू नका, आम्हाला तुमची गरज आहे. काम करत रहा.
यात जर संसर्ग संपला तर शरीराला स्वतःची ऊर्जा वाया घालवावी लागू नये म्हणून किंवा इजा होऊ नये म्हणून त्या निर्माणी मरतील याची खात्री देखील देतात.
पण बी पेशी काय निर्माण करतात?
तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच ऐकलं असेल. त्यांना प्रतिपिंड म्हणतात.
विशिष्ट घूसखोरांच्या पृष्ठाला चिकटून बसण्यासाठी योजलेले ते छोटे प्रोटीन असते.
थोडी विशिष्ट कामे करण्याकरीता अगदी विशिष्ट प्रकारची प्रतिपिंडे यात असतात.
या विशिष्ट घूसखोरीवर कोणत्या प्रकारचे प्रतिपिंड हवे ते साहाय्यक टी पेशी रक्तद्रव्य पेशीला सांगते.
अशा अब्जावधी प्रतिपिंडांचा रक्तात पूर येतो व तो शरीरा संतृप्त करतो.
दरम्यान संसर्गाच्या ठिकाणी परिस्थिती गंभीर होते.
घूसखोरांची संख्या वाढून ते शरीराला इजा करायला सुरुवात करतात.
शरीराच्या संरक्षक आणि हल्ला करणाऱ्या पेशी जोरदार लढा देतात पण त्या प्रक्रियेत मृत्यू पावतात.
साहाय्यक टी पेशी त्यांना अधिक आक्रमक आणि अधिक काळ जिवंत रहाण्याची आज्ञा देऊन पाठबळ देतात.
परंतु मदतीशिवाय त्या बॅक्टेरियांवर कबजा करू शकत नाहीत.
परंतु आता संरक्षणाची दुसरी फळी मदतीला येते.
अब्जावधी प्रतिपिंडानी लढाईक्षेत्र भरून जाते आणि अनेक घूसखोर निकामी होतात.
यात हे घूसखोर असहाय्य होतात किंवा मरून जातात.
ती बॅक्टेरियांना देखील मुर्छित करून त्यांना सहज लक्ष्य करतात.
प्रतिपिंडाच्या पाठी मारेकरी पेशींना जोडता येण्यासाठी रचलेल्या असतात. यामुळे त्या शत्रूशी सहज जोडल्या जाऊन शत्रूला सहज मारू शकतात.
महाभक्षीकोशिका प्रतिपिंडे जोडलेल्या बॅक्टेरियांना खाण्यात विशेष वाकबगार असतात.
आता तोल स्थान बदलतो आणि सांघिक प्रयत्नाने संसर्ग नाहीसा केला जातो.
या वेळी लक्षावधी शरीर पेशी मरून गेलेल्या असतात परंतु ते पार महत्त्वाचे नसते कारण झालेल्या नुकसानीची लगेच भरपाई केली जाते.
बहुतेक रोगप्रतिबंधक पेशी आता नकामी झालेल्या असतात आणि त्यांना सातत्याने इषारे मिळत नसल्याने त्या आत्महत्या करतात. यामुळे स्रोत वाया जाऊ दिले जात नाहीत..
पण स्मृती पेशीसारख्या काही मागे उरतात.
जर भविष्यात या शत्रूशी सामना करण्याची पाळी आली तर त्यासाठी त्या सज्ज असतात आणि तुमच्या लक्षात येण्यापूर्वीच त्या त्याला मारून टाकतात.
कार्यरत असलेल्या रोगप्रतिबंधक प्रणालीच्या भागाचे हे फारच सोपं स्पष्टीकरण आहे.
या पातळीला म्हणजे, आपण यात सहभागी असेल्या अनेकांना आणि संपूर्ण रासायनिकीला वगळून हा विचार केला तेव्हा आता ही प्रणाली किती गुंतागुंतीची आहे याची तुम्हाला कल्पना करता येईल
जीवनाची गुंतागुंत भीतिदायक आहे पण जर ती समजून घेण्यासाठी आपण वेळ दिला तर आपल्याला न संपणाऱ्या आश्चर्यांना व भव्य सौंदर्याला सामोरे जाता येईल.