फर्मीची विसंगती - कोठे आहेत सर्व परग्रहवासी? | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

आपण या संपूर्ण विश्वात एकमेव जिवंत ग्रह आहोत काय?

निरीक्षण करता येणाऱ्या विश्वाचा व्यास जवळपास 90 अब्ज प्रकाशवर्षं लांबीचा आहे.

तेथे किमान शंभर अब्ज तारकामंडळे आहेत आणि या प्रत्येकात एक शतक ते एक हजार अब्ज तारे आहेत.

अलीकडेच आपल्याला समजलेलं आहे की वस्ती करण्याजोगे ग्रह देखील बऱ्याच प्रमाणात आढळतात.

आणि विश्वात बहुत करून महापद्म संख्येने वसती करण्यायोग्य ग्रह असावेत.

जीवन विकसित होण्याच्या व अस्तित्वात असण्याच्या विपुल संधी येथे आहेत असा याचा अर्थ होतो.

पण मग हे आहे कुठं?

या विश्वाने या अवकाशयानाशी जोडी जुळवलेली असायला नको काय?

आपण एक पाऊल मागे जाऊया.

जरी इतर तारकामंडळात परग्रह संस्कृती असल्या तरी

त्यांची कधीतरी त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळण्याचा मार्ग नाही.

मुळातच आपल्या प्रत्यक्षातील गांगेय शेजाराबाहेरील सर्व काही

म्हणजेच स्थानिक गट म्हणता येईल असे काही, हे बऱ्यापैकी कायमचाच आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे.

विश्वाचे सातत्याने होणारे प्रसरण हे याचे कारण आहे.

जरी आपल्याकडे वेगवान अवकाशयान असलं असतं तरीही

विश्वाच्या पूर्णपणे रिकाम्या क्षेत्रांतून प्रवास करून

या ठिकाणी पोहोचण्यासाठी अक्षरशः अब्जावधी वर्षं लागतील.

म्हणून आपण आकाशगंगेवर लक्ष केंद्रित करूया.

आकाशगंगा हे आपलं घर असलेलं तारकामंडळ आहे.

ते चारशे अब्ज ताऱ्यांचं मिळून बनलेलं आहे.

म्हणजेच यात प्रचंड संख्येने तारे आहेत. जे पृथ्वीवरच्या एका वाळूच्या कणापाठी अंदाजे दहा हजार तारे यात आहेत.

आकाशगंगेत जवळपास वीस अब्ज सूर्यासारखे तारे आहेत.

आणि त्यातल्या एकपंचमांश ताऱ्यांचे पृथ्वीच्या आकाराचे ग्रह वस्ती करण्यायोग्य टप्प्यात,

जीवनाच्या अस्तित्वाला योग्य अशा परिस्थितीच्या क्षेत्रात आहेत असं एक अंदाज सुचवतो.

जरी यातले 0.1 टक्के ग्रह जीवन धारणा करणारे असतील तरीही आकाशगंगेत एक दशलक्ष जीवन धारणा करणारे ग्रह असतील.

पण थांबा. आणखीही काही महत्त्वाचं आहे.

आकाशगंगा तीन महापद्म वर्षं वयाची आहे. सुरुवातीला ती जीवनासाठी योग्य जागा नव्हती

कारण मोठ्या प्रमाणात वस्तूंचा विस्फोट होत होता. परंतु दोन अब्ज वर्षांनी पहिला जीवधारक ग्रह जन्माला आला.

पृथ्वी फक्त चार दशलक्ष वर्षं वयाची आहे म्हणून भूतकाळी अन्य ग्रहांवर जीवन विकसित होण्याची संभाव्यता बहुतकरून महापद्म इतकी होती.

जर यातला फक्त एक जरी अवकाश भ्रमण करणाऱ्या अत्युच्च संस्कृतीत विकसित झाला असता तर तो आतापर्यंत आपल्याला दिसला असता.

ही संस्कृती कशी दिसत असेल?

यात तीन प्रकार असू शकतात.

यातल्या एका प्रकारातील संस्कृती त्यांच्या ग्रहावर उपलब्ध असलेल्या सर्व ऊर्जेचा वापर करण्याची क्षमता असणारी असेल.

जर तुम्हाला यांचे आश्चर्य वाटत असेल तर सध्या आपण या मापकावर 0.73 च्या आसपास आहोत

आणि येत्या काही शतकांत आपण वर उल्लेखिलेल्या संस्कृतीच्या प्रकाराजवळ पोहोचू शकतो.

दुसऱ्या प्रकारची संस्कृती स्वतःच्या घर ताऱ्याची सर्व ऊर्जा कामाला जुंपण्याची क्षमता प्राप्त केलेली असणार.

यासाठी एका गंभीर स्वरूपाच्या विज्ञान काल्पनिकेची गरज आहे पण तत्त्वतः ते शक्य आहे.

सूर्याला वेढणाऱ्या महाकाय संकुलाची म्हणजे डायसन गोलकासारखी संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते.

तिसऱ्या प्रकारची संस्कृती मूलतः तिचे संपूर्ण तारकामंडळ व त्याची ऊर्जा नियंत्रणाच ठेवणारी असणार.

इतका पुढारलेला परग्रहवासींचा वंश हे आपल्यासाठी काहीसं देवासारखंच असेल.

पण मुळातच अशी परग्रह संस्कृती आपण का पाहू शकू?

निदान एक हजार वर्षांपर्यंत लोकसंख्या टिकवून ठेवू शकेल असं पिढ्यांचं अवकाशयान आपण बांधू शकलो तरच

दोन दशलक्ष वर्षांत आपण संपूर्ण तारकामंडळात वसाहत करू शकू.

हा कालखंड मोठा वाटत असेल पण आकाशगंगा प्रचंड आहे हे लक्षात ठेवा.

म्हणूनच जर संपूर्ण तारकामंडळावर वसाहत करायला काही दशलक्ष वर्षं लागली

आणि जरी आकाशगंगेत महापद्म ग्रह नसले तरी दशलक्ष जीवधारक ग्रह असणं शक्य असलं तरी

आणि या अन्य जीव स्वरूपांना आपल्याला मिळालेल्या वेळेपेक्षा बराच जास्त वेळ मिळाला असे असले तरी

हे सर्व परग्रहवासी आहेत कोठे?

ही आहे फर्मीची विसंगती आणि कोणाहीकडे त्याचं उत्तर नाही.

पण आपल्याला काही कल्पना आहे.

आपण चाळण्यांविषयी बोलूया.

या संदर्भात चाळणी वास्तवात ओलांडायला खूप कठीण असा अडथळा प्रतिरूपित करते.

त्या भीतीच्या विविध पातळ्यांच्या स्वरूपात येतात.

एकः यात प्रचंड चाळण्या येतात आमि आपण त्या पार केल्या आहेत.

आपल्याला वाटते तसे गुंतागुंतीचे जीवन विकसित होणे कदाचित काहीसे कठीणच असणार.

जीवनाचा आरंभ होणे शक्य करणारी प्रक्रिया अजूनही पूर्णपणे उलगडलेली नाही

आणि कदाचित त्यासाठीच्या गरजा वास्तवात खूपच गुंतागुतीच्या असतील.

कदाचित भूतकाळात हे विश्व काहीसे जीवधारणेला प्रतिकूल होतं असेल आणि फक्त अलीकडे सर्व गोष्टी थंड झाल्यामुळे गुंतागुंतीचं जीवन अस्तित्वात येणे शक्य झालं असावं.

जरी आपण संपूर्ण विश्वातील पहिली संस्कृती नसलो तरी आपण एकमेव किंवा किमान पहिल्या काहींपैकी एक तर नक्कीच आहोत असा याचा अर्थ होतो.

दोनः आपल्यापुढे असलेल्या काही चाळण्या आहेत.

ही चाळणी खरोखरच खूप दुःखद आहे.

कदाचित विश्वात आपल्या पातळीचे जीवन सर्वत्र अस्तित्वात असेल पण एखाद्या बिंदूला ते नाश पावत असेल, जो बिंदू आपल्यापुढे ठाकलेला आहे.

उदाहरणादाखल भीतिदीयक भविष्यकालीन तंत्रज्ञान अस्तित्वात आह पण जर ते कृतिशील झालं तर ते ग्रहचा नाश करेल.

प्रत्येक प्रगत संस्कृतीचे अंतिम शब्द पुढीलप्रमाणे असतील;

एकदा का मी हे बटण दाबले की हे नवीन उपकरण आपले सर्व प्रश्न सोडवेल.

जर हे खरे असेल तर आपण अंताच्या जवळ आणि त्यांनतरच्या मानवी अस्तत्वाच्या प्रारंभापाशी पोहोचलो आहोत.

किंवा तेथे विश्व नियंत्रित करणारी प्राचीन तिसऱ्या प्रकारची संस्कृती असावी

आणि एकदा का संस्कृती पुरेशी प्रगत झाली की तत्क्षणी ती नाहीशी होत असेल.

कदचित बाहेर असं काही असेल की ते न शोधणंच चांगलं ठरेल.

आपल्याला हे समजण्याचा काही मार्ग नाही.

एक शेवटचा विचार म्हणजे कदाचित आपणच एकटे असू.

या घडीला आपल्याखेरीज एकादे जीवन असल्याचा कोणताही पुरावा नाही.

काहीही नाहीः हे विश्व रिकामे व मृत भासते.

कोणीही आपल्याला संदेश पाठवत नाही की कोणीही आपल्या सादाला प्रतिसाद देत नाही

कदाचित आपण या शाश्वत विश्वातल्या ओल्या चिखलाच्या गोळ्यावर बंदिस्त झालेले पूर्णपणे एकाकी असू.

हा विचार तुम्हाला घाबरवून टाकतो काय? तसं असेल तर तुम्ही योग्य भावनिक प्रतिसाद देत आहात.

जर आपण या ग्रहावरील जीवन मरू दिलं तर या विश्वात जीवन शिल्लक रहाणार नाही. जीवन कायमचं नाहीसं होईल.

जर अशी परिस्थिती असेल तर फक्त साहसाने ताऱ्यावर आक्रमण करून प्रथम तिसऱ्या प्रकारच्या संस्कृतीची पातळी गाठायला हवी.

विश्व शेवटचा श्वास घेऊन विस्मृतीत जाईपर्यंत

जीवनाच्या नाजुक ज्योतीचं अस्तित्व तगवण्यासाठी आणि पसरवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे.

विश्व खूपच सुंदर आहे आणि त्याचा अनुभव कोणा अन्य व्यक्तीमार्फत घेता येणार नाही.

तुमच्या पाठबळामुळे ही दृक्श्राव्यफित बनवणं शक्य झालं. आमची एक दृक्श्राव्यफित बनवायला आम्हाला 200 तास लागतात.

तुम्ही Patreon वर दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल आभार आणि हळू हळू आम्ही आणखी दृक्श्राव्यफिती बनवत आहोत.

तुम्हाला जर आम्हाला मदत करायची असेल आणि तुमचा व्यक्तिगत पक्षी मिळवायचा असेल तर Patreon पृष्ठ पाहा.