व्हिडिओ
ट्रान्स्क्रिप्ट
जलचलित भंगविस्तारण - भेगविस्तारण म्हणजे काय?
औद्योगिक उत्क्रांतीपासून आपला ऊर्जेचा वापर अखंडित वाढतो आहे.
या वापरासाठी लागणारी बहुतांश ऊर्जा कोळसा व नैसर्गिक वायू ही जिवावशेष इंधने पुरवतात.
नैसर्गिक वायूचे उत्खनन करण्याच्या वादग्रस्त पद्धतीवर सध्या खूप चर्चा होत आहे.
जलचलित भेगविस्तारण किंवा भंगविस्तारण
सोप्या रीतीने सांगायचं तर पृथ्वीच्या आत खोलवर असलेला नैसर्गिक वायू मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे भेग विस्तारण.
या पद्धतीत जाळीदार खडकाला पाणी, वाळू आणि रसायने यांचा उपयोग करून भेग पाडली जाते.
यामुळे बंदिस्त वायू मुक्त करता येतो.
1940 पासून भेगविस्ताराचे तंत्र ज्ञात झालेले आहे.
तथापि गेल्या दहा वर्षांत भेगविस्तार फोफावला आहे…
विशेषतः अमेरिकेत.
अमेरिकेतील व युरोपखंडातील बहुतेक पारंपरिक नैसर्गिक स्रोत संपुष्टात आल्यामुळे हे घडत आहे.
तसेच नैसर्गिक वायू आणि अन्य इंधनांच्या किमती हळूहळू वाढत आहेत.
भेगविस्तारणासारखी लक्षणीयरीत्या गुंतागुंतीची आणि खर्चिक पद्धत आता आकर्षक आणि किफायतशीर झाली आहे.
या अवधीत, एकट्या अमेरिकेतच भेगविस्तारणाचा उपयोग दशलक्ष पटीने वाढलेला आहे.
भेगविस्तारण वापरून 60% पेक्षा जास्त सर्व नव्या तेल आणि वायू विहिरी खोदल्या आहेत.
चला आपण वास्तवात भेगविस्तारण कशा प्रकारे कार्य करतं ते पाहूया.
प्रथम भूमीत काही मीटर लांबीचा एक दंड कोरून काढला जातो.
तेथून खडकाच्या वायूने भरलेल्या पापुद्र्यात क्षितिज समांतर छिद्र पाडले जाते.
त्यानंतर उच्च दाबाच्या पंपांचा उपयोग करून भंगविस्तारण द्रव जमिनीत भरला जातो.
हा द्राव सरासरी 8 दशलक्ष लीटर पाण्यापासून बनलेला असतो.
65,000 लोकांची एका दिवसाची गरज भागण्याइतके इतके हे पाणी आहे.
भरीला यात शेकडो टन वाळू आणि जवळपास 200,000 लीटर रसायने असतात.
हे मिश्रण खडकाच्या पापुद्र्यात घुसते आणि त्यात असंख्य तडे निर्माण करते.
तडे जुळून येण्याला वाळू प्रतिबंध करते.
रसायने विविध कामे पार पाडतात.
इतर कामांबरोबरीने ती पाण्याचे संघनन करतात …
बॅक्टेरिया मारून टाकतात.
किंवा खनिजे विरघळवतात.
यानंतर बहुतेक भेगविस्तार द्राव हा दाबाने बाहेर खेचला जातो.
आणि यावेळी नैसर्गिक वायू प्राप्त करणे शक्य होते.
वायू स्रोत पूर्णपणे संपुष्टात येताच खोदलेले छिद्र पक्के बंद केले जाते.
नियमानुसार भेगविस्तार द्राव पंपाने पुन्हा खोलवरच्या भूमीगत स्तरात गोळा केला जातो आणि छिद्र पक्के बंद केले जाते.
तथापि भेगविस्तार अनेक विचार करण्यायोग्य जोखमींशी संबंधित असतो.
अगदी प्राथमिक स्वरूपाची जोखीम म्हणजे त्याच्यामुळे प्यायच्या पाण्याचे स्रोत दूषित होतात.
भेगविस्तारामुळे केवळ मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो एवढेच नाही तर
त्याच्या परिणामी भर म्हणून त्याचे दूषितीकरण होते. हे पाणी अत्यंत विषारी असते.
या पाण्याचे जलशुद्धीकरण यंत्रणेतही हे दूषितीकरण नाहीसे करता येत नाही इतके ते तीव्र असते .
जरी हा धोका ज्ञात असला तरीही आणि सैद्धांतिकदष्ट्या त्याचे व्यवस्थापन करणे शक्य असूनही
बेफिकिरीमुळे अमेरिकेत स्रोत दूषितीकरण केव्हाचेच झालेले आहे.
हे बंदिस्त पाणी भविष्यात कशा प्रकारचे वर्तन करेल याविषयी अजून तरी कोणालाही काही माहिती नाही
कारण या विषयावर अजून तरी दीर्घ कालावधीचा एकही अभ्यास झालेला नाही.
भेगविस्तारणासाठी वापरली जाणारी रसायने धोकादायक ते आत्यंतिक विषारी
आणि बेन्झॉल किंवा फॉर्मिक आम्लाप्रमाणे कर्करोगाला कारणीभूत ठरणारी अशी विभिन्न प्रकारातील आहेत.
या रासायनिक मिश्रणाच्या मौल्यवान घटकांबाबत भेगविस्तार वापरणाऱ्या कंपन्या काहीही सांगत नाहीत
पण या प्रक्रियेत जवळपास 700 विविध रासायनिक अभिकारक वापरले जात असावेत.
मुक्त केले जाणारे हरितगृह वायू ही दुसरी जोखीम आहे.
भेगविस्तारणातून पुनःप्राप्त केला जाणाऱ्या वायूत मोठ्या प्रमाणात मिथेन असतो.
हा हरितगृह वायू कार्बन डायॉक्साईडच्या तुलनेत 25पट शक्तिशाली असतो.
जळण्याच्या बाबतीत नैसर्गक वायू हा कोळशापेक्षा कमी हानिकारक असतो.
तथापि या एकंदरीत भेगविस्तारणाचे जलवायूमान संतुलनावर होणारे
नकारात्मक परिणाम व्यापक असतात.
सर्वात पहिली बाब म्हणजे भेगविस्तारण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करते.
दुसरे म्हणजे खोदलेली छिद्रे लगेचच संपुष्टात येतात आणि यामुळे
ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या वायू विहीर म्हणतात तिच्यासाठी वारंवार भेगविस्तारण छिद्रे खोदावी लागतात.
यात भरीला जवळपास 3% पुनःप्राप्त वायू निष्कर्षणाच्या प्रक्रियेत वातावरणात मुक्त होतो.
म्हणूनच भेगविस्तारणाच्या फायदे व तोटे यांचा ताळमेळ
घालण्यासाठी त्याच्या अपेक्षित लाभाचे मूल्यनिर्धारण कसे करणार?
लहान ते मध्यम कालावधीसाठी विचार करता योग्य प्रकारे वापर केल्यास
हे तंत्र आपली अल्पमोली उर्जेची मागणी पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे.
पण भेगविस्तारणाचे भविष्यकालीन परिणाम पाहता येत नाहीत
आणि पिण्याच्या पाण्याबाबतची जोखीम यांना कमी लेखून चालणार नाही.
Amara.org समूहाने उपशीर्षके तयार केली