व्हिडिओ
ट्रान्स्क्रिप्ट
जे काही येथे आहे त्या सर्वांचा आरंभ.
महास्फोट.
विश्व अचानक जन्माला आलं आणि ते अनंत नाही अशी ही कल्पना आहे.
विश्व हे अनंत आणि कालातीत (त्याच्यावर काळाचा म्हणजे वयाचा परिणाम होणार नाही) आहे
असा विचार वैज्ञानिक विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत करत होते.
आइन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताने आपल्याला गुरुत्वाकर्षणाचे अधिक चांगले आकलन करून घ्यायला मदत देई पर्यंत
आणि एडविन हबल यांनी आकाशगंगा एकमेकींपासून दूर जात असल्याचे शोधून काढेपर्यंत
तो पूर्वीच्या अटकळींशी सुसंगत ठरत होता
1964 साली, सुरुवातीच्या विश्वाचा अवशेष असलेले
वैश्विक पार्श्वभूमी प्रारण अपघाताने शोधले गेले.
ते आणि इतर निरीक्षणातून उपलब्ध झालेल पुरावे यातून महास्फोट
हा सिद्धांत विज्ञानाने स्वीकारला.
तेव्हापासून, हबल दूरदर्शीसारख्या सुधारित तंत्रज्ञानाने
आपल्याला महास्फोटाचे आणि विश्वाच्या संरचनेचे बऱ्यापैकी चांगले चित्र रचायला मदत दिली.
विश्वाचे प्रचंड गतीने प्रसरण होत आहे असे अलीकडची
निरीक्षणे देखील सुचवत असावीत असे वाटते.
पण महास्फोट कशा रीतीने कार्य करतो?
शून्यातून एखादी गोष्ट कशी काय निर्माण होऊ शकते?
चला तर, आपल्याला जे माहीत आहे त्याचा विचार करू.
सुरुवातीच्या भागाकडे आपण दुर्लक्ष करू.
पहिली बाब ही की महास्फोट हा स्फोट नव्हताच.
एकाच वेळी सर्वत्र सर्व अवकाश ताणले जात होते.
विश्वाने फारच लहान असण्यापासून सुरुवात केली
आणि झापाट्याने ते फुटबॉल इतक्या आकारमानात प्रसरण पावले
विश्वाचे कशातही प्रसरण झाले नाही, अवकाश मात्र स्वतःतच प्रसरण पावत होते.
विश्वाला सीमा नसल्याने ते कोणत्याही घटकाच्या स्वरूपात प्रसरण पावत नाही.
व्याख्येनुसार पाहिल्यास विश्वाचे बाहेरचे असे काहीही अस्तित्वात नाही.
सर्व विश्व हे येथे आहे.
या उष्ण व घनदाट पर्यावरणात ऊर्जा कणांच्या स्वरूपात स्वतःला व्यक्त करते
आणि ते कण काळात फक्त ओझरते अस्तित्वात असतात.
ग्लुऑन्सपासून क्वार्क्सच्या जोड्या निर्माण होतात, बहुदा अधिक ग्लुऑन्स मु्क्त करून…
ते परस्परांना नष्ट करतात.
त्यांना आंतरक्रिया करण्यासाठी अन्य अल्पजीवी क्वार्क्स मिळतात
आणि नव्या क्वार्क जोड्या व ग्लुऑन्स तयार होतात.
वस्तुमान आणि ऊर्जा या गोष्टी फक्त सैद्धांतिक सममूल्ये नाहीत…
अतिउच्च तापमानाला हे घटक व्यावहारिक दृष्टीनेही समान असतात.
याच काळादरम्यान कधीतरी द्रव्याने प्रतिद्रव्यावर मात केली.
आज आपल्याकडे जवळपास सर्व द्रव्य आहे आणि प्रतिद्रव्य मात्र जवळपास नाहीच.
कोणत्यातरी प्रकारे दर अब्ज प्रतिद्रव्य कणांपासून
एक अब्ज आणि एक द्रव्य कण तयार झाले.
विश्वातील एकाच ताकद एकवटलेल्या बलाऐवजी
आता येथे त्याची अनेक विविध नियमांनुसार कृतिशील असणारी सुधारित रूपांतरे होती..
तोपर्यंत विश्वाचा व्यास अब्ज किलो मीटरनी ताणला गेला होता.
परिणामी तापमानात घट झाली.
क्वार्क जन्माला येण्याचे आणि त्याचे पुन्हा उर्जेत रूपांतर करणारे
चक्र अचानक थांबले.
येथून पुढे आपल्यापाशी जे काही आहे त्यासोबत काम करू.
क्वार्क्सनी हॅड्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स सारखे नवे कण तयार करायला सुरुवात केली
सर्व प्रकारचे हॅड्रॉन्स बनवणाऱ्या क्वार्क्सच्या अनेकविध जुळण्या होत्या
पण कितीही वेळ लांबीच्या पुरेशा स्थिर रहाणाऱ्या जुळण्या फारच थोड्या होत्या
कृपया आता थोडा वेळ थांबा आणि लक्षात घ्या की आतापावेतो येथील सर्व गोष्टींचा
आरंभ झाल्याला फक्त एक सेकंद लोटलेला आहे.
हे विश्व जे शंभर अब्ज किलोमीटरइतके वाढले आहे
ते आता बहुसंख्य न्यूट्रॉन्सचा प्रोटॉन्समध्ये ऱ्हास होण्यासाठी पुरेसे थंड झाले आहे
आणि हायड्रोजनचा पहिला अणू तयार झाला आहे.
कल्पना करा की या क्षणी हे विश्व दहा अब्ज अंश सेल्शिअस तापमान .
असलेले अगणित कण असलेले टोकाचे उष्ण सूप आहे
पुढच्या काही मिनिटांतच गोष्टी थंड होऊन वेगाने स्थिरावल्या.
हॅड्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सपासून अणू तयार झाले
आणि स्थिर आणि विद्युतभाराच्या दृष्टीने उदासीन अशा पर्यावरणाच्या घडणीला सुरुवात झाली.
या काळात तेथे तारे नव्हते आणि हायड्रोजन वायू दृश्य प्रकाशाला आसपास भटकायला
मोकळीक देत नव्हता म्हणून काहीजण या कालखंडाला काळे युग म्हणतात.
पण काहीही असलं तरी, तेथे डोळे असलेलं असं काहीही जिवंत नसताना
दृश्य प्रकाश याचा अर्थ काय असेल?
जेव्हा दशलक्षावधी वर्षांनंतर हायड्रोजन वायू एकत्र गोळा झाला आणि
गुरुत्वाकर्षणाने त्याला प्रचंड दाबाखाली आणले तेव्हा तारे आणि आकाशगंगा घडायला सुरुवात झाली.
विश्वात आज अजूनही झिरपत असलेला आणि दृश्य प्रकाशाला स्वतःतून जाऊ देणारा आयनद्रायू,
त्याच्या प्रारणांनी स्थिर असलेला हायड्रोजन वायू विरघळल्यामुळे तयार झाला.
शेवटी तेथे प्रकाश अस्तित्वात आलाच.
ठीक आहे, पण ज्या भागाबद्दल आपण काही बोललो नाही त्याचं काय?
अगदी सुरुवातीला काय घडलं?
या भागाची व्याख्या महास्फोट अशी केली जाऊ शकते.
त्यावेळी काय झालं हे आपल्याला अजिबात माहीत नाही.
या ठिकाणी आपली साधने मोडीत निघतात.
नैसर्गिक नियमांना अर्थ उरत नाही, काळ स्वतःच विक्षिप्त वागतो.
या वेळी काय घडलं याचं आकलन होण्यासाठी आपल्याला
आइन्स्टाईनचा सापेक्षतावाद आणि पुंजयांत्रिकी यांचा मेळ घालणाऱ्या उपपत्तीची गरज आहे.
अगदी या क्षणी यावर अनेक वैज्ञानिक काम करत आहेत.
पण यामुळे आपले अनेक प्रश्न अनुत्तरित रहातात.
आपल्या विश्वापूर्वी येथे एखादे दुसरे विश्व होते काय?
की हेच पहिले आणि एकमेव विश्व आहे?
कशामुळे महास्फोट सुरू झाला? किंवा
तो आपल्याला अजूनही समजू न शकलेल्या नियमाच्या आधारे नैसर्गिकरीत्या घडून आला काय?
आपल्याला माहीत नाही आणि कदाचित ते आपल्याला कधीच माहीत होणारही नाही.
पण आपल्याला हे माहीत आहे की आपल्याला माहीत असलेले विश्व येथ सुरू झालं.
त्याने कणांना, आकाशगंगांना, ताऱ्यांना, या पृथ्वीला आणि तुम्हाला जन्माला घातलं.
ज्या अर्थी आपण मृत ताऱ्यापासून बनलेले आहोत
त्या अर्थी आपण या विश्वाचे भाग आहोत; त्यापासून भिन्न नाही.
तुम्ही असेही म्हणू शकता की आम्ही विश्वाच्या स्वतःला अनुभवण्याच्या मार्गावर आहोत.
मग चला तर… जोपर्यंत विचारण्यासाठी प्रश्न शिल्लक रहात नाही, आपण त्याची अनुभूती घेत राहूया.