फर्मीची विसंगती 2 -निराकरण आणि कल्पना- सर्व परग्रहवासी कोठे आहेत? | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

निरीक्षणक्षम विश्वात पृथ्वीवर असलेल्या वाळूच्या प्रत्येक कणासाठी बहुतेक 10,000 तारे असावेत.

आपल्याला माहीत आहे की विश्वात बहुतकरून महापद्म ग्रह असावेत.

तर मग सर्व परग्रहवासी कोठे असावेत?

हीच ती फर्मी विसंगती आहे.

जर तुम्हाला या विषयी अधिक माहिती हवी असेल तर पहिला भाग पाहा.

येथे आपण फर्मीच्या विसंगतीच्या शक्य निराकरणाकडे पाहणार आहोत.

म्हणजे आपला नाश होईल की वैभवशाली भविष्य आपली वाट पाहत आहे.

अवकाश प्रवास हा कष्टप्रद आहे. जरी शक्य असले तरी दुसऱ्या ताऱ्याकडे जाण्यासाठी प्रवास करणे हे प्रचंड आव्हान आहे.

त्यासाठी प्रचंड वजनाचे सामान कक्षेत ठेवून त्याची जुळणी करावी लागेल.

अगदी पहिल्या ओरखड्यापासून सुरुवात करून कदाचित हजारो वर्षांचा प्रवासात टिकाव धरून रहावे लागेल.

आणि तो दूरवरून दिसतो तसा स्वागतशील नसेल तर काय होईल?

या सहलीत टिकून रहाण्यासारखे यान घडवणे हे मुळातच अतिशय कठीण आहे.

कदाचित आंतरतारकीय आक्रमण खेचून घेणं शक्य होणार नाही.

वेळेचा देखील विचार करायला हवा; विश्व फार पुरातन आहे.

पृथ्वीवर जीवसृष्टी असल्याला किमान 3.6 अब्ज वर्षे लोटली आहेत.

पृथ्वीवरच्या बुद्धिमान मानवी जीवनाला 250,000 वर्षे झाली आहेत.

इतक्या मोठ्या दूरच्या अंतरांवरून संपर्क साधण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आपल्या हाती आल्याला साधारणपणे फक्त शतक झाले आहे.

हजारों प्रणालींच्या विस्तारात पसरलेली परग्रहवासियांची भव्य साम्राज्ये असणे शक्य आहे.

ही साम्राज्ये हजारो वर्षे अस्तित्वात होती असतील आणि कदाचित आपली भेट हुकली असेल.

त्या दूरवरच्या जगात भव्य अवशेष कुजत पडलेले असणे शक्य आहे.

या पृथ्वीवरच्या 99% प्रजाती या मृत पावलेल्या आहेत.

हे आज किंवा पुढे कधीतरी आपलंही नशीब असेल असा युक्तिवाद करणं सोपं आहे.

कदाचित पुन्हा पुन्हा बुद्धिमान जीवन विकसित होईल, थोड्या प्रणालींदरम्यान पसरेल आणि मरून जाईल.

परंतु गांगेय संस्कृती कदाचित परस्परांना भेटणार नाहीत.

मग कदाचित तो विश्वातील सर्व जीवांना एकत्र आणणारा व ताऱ्यांकडे पाहून प्रत्येकजण कोठे आहे असे आश्चर्य करायला लावणारा अनुभव असेल.

पण परग्रहवासी आपल्यासारखे असतील असे गृहीत धरण्यासाठी एकही कारण आपल्यापाशी नाही.

किंवा आपला तर्क त्यांच्या उपयोगी पडेल असेही नाही.

कदाचित आपली संपर्कमाध्यमे अत्यंत मागास आणि कालोचित नसतील.

कल्पना करा की मोर्स-संकेत प्रक्षेपक यंत्र असलेल्या कक्षात बसून तुम्ही संदेश पाठवत आहात.

पण कोणीही उत्तर देणार नाही आणि तुम्हाला खूपच एकाकी वाटेल.

कदाचित बुद्धिमान प्रजातीच्या दृष्टीने अजूनही आपण सापडण्याच्या आवाक्यात असणार नाही.

जोपर्यंत आपण योग्य प्रकारे संपर्क करणे शिकेपर्यंत आपण त्यांना न सापडता राहू.

आणि जरी आपण परग्रहवासीयांना भेटलो तरी त्यांच्याशी अर्थपूर्णरीत्या संपर्क साधणे शक्य होण्याच्या दृष्टीने आपण त्यांच्यापेक्षा फारच वेगळे असण्याची शक्यता आहे.

तुम्ही शक्य तितक्या चलाख खारीची कल्पना करा.

तुम्ही कितीही कष्टपूर्वक प्रयत्न केला तरी तुम्ही ती आपल्या समाजाला स्पष्ट करू शकणार नाही.

कितीही झालं तरी खारीच्या परिप्रेक्ष्यातून झाड हेच तिच्यासाठी प्रगत बुद्धिमत्तेप्रमाणे टिकण्यासाठी लागणारे सर्व काही आहे.

संपूर्ण जंगल कापून काढणारी माणसे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे परंतु खारींचा द्वेष करतो म्हणून जंगलाचा नाश करत नाही.

आपल्याला फक्त साधन स्रोत हवे असतात.

खारीच्या इच्छांची आणि खारीच्या तगून रहाण्याची काळजी आपल्याला करण्याची गरज नाही.

स्रोतांची गरज असलेल्या आपल्यासारख्या तिसऱ्या प्रकारच्या संस्कृतीला अशाच प्रकारे गृहीत धरले जाईल.

ते कदाचित आपल्या महासागरांचे बाष्पीभवन करून त्यांना जे काही हवं ते गोळा करणे सोपं करतील.

आपलले वाहन गतिमान करण्यापूर्वी एखादा परग्रहवासी क्षणभरासाठी असा विचार करेल, “ही पाहा इवलीशी माकडं! ती खरंच मोहक कॉक्रिटच्या इमारती उभारतात. .

आणि आता त्यांचा मृत्यू झाला आहे

पण जर इतर सर्व प्रजातींना नाहीसे करण्याची इच्छा असलेली संस्कृती त्या तिथे असली

तर ती अर्थकारणापेक्षा संस्कृतीमुळे प्रेरित झालेली असण्याची शक्यता फारच कमी आहे.

आणि तसंही स्वतःच्या प्रती तयार करणाऱ्या सूक्ष्म-यंत्रांच्या साहाय्याने अवकाश शोध घेणाऱ्या परिपूर्ण अस्त्राची निर्मिती करून

विनाशाच्या प्रक्रियेला स्वयंचलित करणं हे जास्त परिणामकारक ठरेल.

यांचं कार्य रेण्वीय पातळीवर प्रचंड वेगानं चालतं आणि मरणप्राय असते.

त्या यंत्राकडे हल्ला करण्याची ताकद आहे आणि ते क्षणार्धात कोणत्याही गोष्टीचा एकूण एक भाग सुटा करून टाकतं.

तुम्ही फक्त त्यांना चार सूचना द्या.

एकः जीवधारणा करणारा ग्रह शोधा.

दोनः या ग्रहावरील एकूण एक गोष्ट तिच्या भागांत सुटी करून टाका.

तीनः हे स्रोत नव्या अवकाश शोधांची बाधणी करण्यासाठी वापरा.

चारः पुनरावृत्ती करा.

अशासारखे जगविनाशी यंत्र काही अब्ज वर्षांच्या कालावधीत आकाशगंगेला पूर्णपणे बंध्य करून टाकेल.

पण तुम्ही स्रोत गोळा करण्यासाठी किंवा वंशहत्या करण्यासाठी प्रकाश वर्षांनुवर्षे का उडत रहायचं?

खरं पाहता प्रकाशाचा वेग तसा फार नाही.

एखाद्याने प्रकाशाच्या गतीने प्रवास केला तरी आकाशगंगा ओलांडण्यास एका मार्गाने 1,00,000 वर्षे लागतील

आणि तुम्ही बहुतकरून मंदगतीने प्रवास कराल.

संस्कृतींचा नाश करणे आणि साम्राज्ये उभी करण्याऐवजी ज्यात अधिक आनंद घेता येईल अशा कितीतरी गोष्टी करता येतील

मॅत्रिओष्का मेंदू ही एक स्वारस्यपूर्ण संक्लपना आहे.

ती ताऱ्याला वेढणारी बृहद् रचना आहे.

इतक्या शक्तिमान संगणकाची गणनक्षमता एकढी आहे की सर्वच्या सर्व प्रजाती स्वतःचं अस्तित्वभान त्यांच्यात साठवून अभिरूप विश्वात अस्तित्वात असतील.

कोणालाही कधीही कंटाळवाणं किंवा दुःखी न वाटता अगदी परिपूर्ण असं शु्दध हर्षोन्माद अनुभवू शकेल इतकी क्षमता असलेलं जीवन अनुभवता येईल.

जर रक्तबटूच्या भोवती असं विश्व उभारलं तर या संगणकला येत्या दहा महापद्म वर्षांसाठी उर्जा पुरवठा मिळू शकेल.

जर पर्याय असेल तर आपल्याला तारकामंडळ जिंकायला आवडेल की अन्य जीवधारकांशी संपर्क साधायला आवडेल.

फर्मीच्या विसंगतीच्या या सर्व निराकरणांची एक समस्या आहे.

आपल्याला तंत्रज्ञानाच्या सीमा कोठे आहेत हे माहीत नाही.

कदाचित आपण या मर्यादेच्या जवळपास असी किंवा जरा देखील जवळ नसू.

अधिक शक्तिशाली तंत्रज्ञान आपली वाट पाहत आहे.

ते आपल्याला अमरत्व बहाल करून, आपल्याला अन्य तारकामंडळांपर्यंत पोहोचवून आपलं देवत्वाच्या पायरीपर्यंत उन्नयन होणार आहे.

आपल्याला काहीही माहीत नाही ही एक गोष्ट आपल्याला मान्य करायलाच हवी.

मानवांनी आपल्या अस्तित्वाचा 90 % पेक्षा अधिक काळ शिकारी कंदमुळे गोळा करणारे म्हणून व्यतित केला आहे.

विश्वाचे केंद्र आहोत असा विचार आम्ही 500 वर्षांपूर्वी करत होतो.

200 वर्षांपासून आपण मानवी श्रमांचा ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणून वापर करत होतो.

राजकीय एकमतीच्या अभावी 30 वर्षांपूर्वी आपण एकमेकांकडे विनाशकारी शस्त्रे रोखली होती.

तारकामंडळाच्या कालपटावर आपण गर्भावस्थेतच आहोत.

आपण येथपर्यंत पोहोचलो परंतु अजून दूरवर पोहोचायचे आहे.

आपण खरोखरच विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत हा दंभ अजूनही मानवांत जबरदस्तपणे टिकून आहे.

म्हणून विश्वाच्या जीवनासंबंधाने आपल्याला उद्दाम गृहीतके करणे सोपे जाते.

पण काहीही झालं तरी शेवटी तोच तर शोध घेण्याचा एकमेव मार्ग आहे. खरं ना?

सर्वांनी इकडं लक्ष द्या.

शेवटी एकदाचं आपलं स्वतःचं सबरेड्डीट आहे बरं.

भविष्यातल्या दृक्श्राव्य़फितींची सर्वेक्षणे, चर्चा यासाठी याचा उपयोग करा.

म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यासारखे काहीही.

पॅट्रेऑनवर दिलेल्या तुमच्या आधारामुळे ही दृक्श्राव्यफित बनवणे शक्य झाले.

जर आम्ही अधिक दृक्श्राव्यफिती बनवाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर

आणि कदाचित त्याबदल्यात तुम्हाला स्वतःचे पक्षी अवतार मिळवायचे असतील तर

तपास करत रहा.