3 कारण न्यूक्लियर ऊर्जेचं अद्याप आहे! | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

आपण अणूऊर्जेचा वापर का सुरू ठेवला पाहिजे याची तीन कारणे.

  1. अणूऊर्जा जीवरक्षक आहे.

नासा या संस्थेने 1913 साली केलेल्या अभ्यासानुसार अणूऊर्जेमुळे

साधारणपणे 1.8 दशलक्ष मृत्यू रोखलेले आहेत.

जरी तुम्ही चेर्नोबिल आणि फुकुशिमा येथल्या मृत्यूंचा समावेश केला तरीही

निर्माण झालेल्या ऊर्जेच्या प्रत्येक एककागणिक झालेल्या मृत्यूंत अणूऊर्जेचा क्रमांक शेवटचा आहे.

अणूकचरा हा खरोखरच विषारी असला तरीही तो कोठेतरी साठवला जातो.

याउलट जैवइंधनांची विषारी सहउत्पादिते पंपाने

आपण दर दिवशी श्वासाद्वारे घेत असलेल्या हवेत सोडली जातात.

म्हणजेच केवळ जाळल्या जाणाऱ्या जैवइंधनांचे प्रमाण कमी करून, अगणित कर्करोग घटना

किंवा फुप्फुसाचे आजार आणि कोळशाच्या खाणींत होणारे अपघात टाळले गेले आहेत.

जर निवडीची संधी मिळाली तर आपण खोल छिद्रात भरले जाणारे अनेक धोकादायक पदार्थ

आणि पंपाने वातावरणात टाकले जाणारे अनेकानेक धोकादायक पदार्थ यांच्या तुलनेत

अणूऊर्जेची निवड अधिक तर्कसंगत ठरेल.

अगदी एकीकडे अणूऊर्जा अधिक धोकादयक वाटत असली तरीही…

हे विमानाने उडणाऱ्यांच्या तुलनेत गाड्या चालवणाऱ्यांच्या मृत्यूदरासारखे आहे.

जर 100 % नूतनीकरण करण्याजोगी ऊर्जा वापरायला सुरुवात झाली आहे असे

अगदी उत्तम-दृश्य समोर आणायचे ठरवले तर त्यासाठी किमान चाळीस वर्षे लागतील.

जोपर्यंत आपण जैविक इंधने वापरत राहू तोपर्यंत

अणूऊर्जा ती करत असलेल्या नाशाच्या तुलनेत कितीतरी जीव वाचवेल.

  1. अणूऊर्जा कार्बन उत्सर्ग कमी करते

जलवायूमान बदलाच्या संदर्भात युक्तिवाद करता, आपला ऊर्जेचा प्रमुख स्रोत असलेल्या

जैवइंधनांच्या तुलनेत अणूऊर्जा एक प्रकारे पर्यावरणाचे कमी नुकसान करते.

1976 पासून जवळपास 64 गिगाटन हरितवायू उत्सर्ग वातावरणात सोडलेले नाहीत

याबद्दल अणूऊर्जेला धन्यवाद द्यायला हवेत.

21व्या शतकाच्या मध्यावधीपर्यंत यात 80-240 गिगाटनांची अधिकची भर पडली असती.

मानवजातीचा ऊर्जेचा उपयोग सातत्याने वाढतो आहे.

अमेरिकन शासनाच्या भविष्यवेधांनुसार येत्या 10 वर्षांत एकटा चीन दर 10 दिवसांत

600 मेगॅवॅटचे इतक्या क्षमतेचे कोळशांवर चालणारे य़ंत्रसंच उभारेल.

चीन केव्हापासून दर वर्षाला 4 अब्ज टन कोळसा जाळत आहे.

कोळसा तुलनेने स्वस्त, अमाप आणि सहज मिळवता येतो.

त्यामुळे मानवजात त्याचा उपयोग इतक्यात थांबवेल ही शक्यता नाही.

अणूऊर्जा हा कदाचित जलवायूमान बदलाचे परिणाम नियंत्रित करणारा

आणि मानव निर्मित जागतिक तापमान वृद्धी टाळण्याचा एकमेव उतारा असू शकेल.

इतर ऊर्जानिर्मिती प्रक्रियांशी तुलना करता अणूऊर्जा हा स्वच्छ पर्याय आहे.

दूरदर्शी विचार करता जरी अणूऊर्जा त्यागणे ही उत्तम कल्पना असली तरी

अन्य पर्यायांशी तुलना करता ते कदाचित पुढच्या

100 वर्षासाठी ते उत्तम निराकरण ठरू शकते.

  1. नवे तंत्रज्ञान

कदाचित नवी तंत्रे अणूऊर्जा निर्मिती कचऱ्याची आणि धोकादायक ऊर्जा यंत्रसंचांची समस्या सोडवू शकतील.

आपण आतापर्यंत वापरत असलेल्या अणूभट्ट्या या बहुकरून कालविसंगत तंत्रवर उभारलेल्या आहेत

कारण 1970 मध्ये अण्विक नवनिर्माण थांबलेले आहे.

थोरियम अणूऊर्जा भट्टीसारखे वरील सर्व समस्या सोडवू

शकणारे नमुने उपलब्ध आहेत.

थोरियमचे वैपुल्य, त्यातून अण्विक अस्त्र बनवणे खरोखरच कठीण असणे आणि

सध्याच्या अणूभट्टीच्या तुलनेत कचऱ्याची निर्मिती दोन घातांकांनी कमी असणे हे या प्रकारे अणूऊर्जा निर्मितीचे वैशिष्ट्य आहे.

काही हजारो वर्षांच्या तुलनेत निर्माण होणारे टाकाऊ साहित्य देखील

कदाचित फक्त काही शेकडो वर्षेच धोकादायक असेल.

200 टन युरेनियम किंवा 3.5 दशलक्ष टन कोळसा जितकी ऊर्जा पुरवतो

अंदाजे तितकीच ऊर्जा 1 टन थोरियम पुरवतो.

जोपर्यंत आपल्याला खात्रीचे पर्यायी तंत्र ज्ञात होत नाही तोपर्यंत अणूऊर्जा स्वतःची आश्वासने पाळत राहील

आणि तोवर आपण किमान अधिक संशोधन करत रहाणे उत्तम होईल.

पण त्यापूर्वी आपण मानवांचे सध्याचे अनेक प्रश्न सोडवण्याची संधी गमावता नये.

हे आव्हान सहजसाध्य नाही परंतु त्याने आपल्याला कधीच अडवलेले नाही.

मग आपण अणूऊर्जा वापरायची काय?

कोणत्याही मोठ्या मानवी प्रयासात धोके गुंतलेले असतातच

आणि आपल्याला कोणताही निर्णय घेताना भावनांवर अवलंबून रहाण्यापेक्षा माहितीच्या आधारे निर्णय घ्यायला हवेत.

जर तुम्हाला युक्तिवादाची दुसरी बाजू ऐकण्याची इच्छा असेल

किंवा अणूऊर्जेची थोडक्यात ओळख हवी असेल तर येथे क्लिक करा.