गल्फ स्ट्रीमचे स्पष्टीकरण. | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

सागरी वाहक पट्टा आणि गल्फ (आखाती) प्रवाह

सागरी प्रवाह आपल्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करतात.

ते आपले हवामान, जलवायूमान निर्धारित करतात आणि याबरोबरीने बरेच काही करतात.

महासागरी प्रवाह आणि वारे प्रणाली

यांच्यामुळे विषुववृत्ताकडून ध्रुवापर्यंत उष्णता वाहून नेली जाते

जागतिक जलवायूमानासंर्भात हे दोन घटक मोठ्या इंजिनाप्रमाणे कार्यरत असतात.

महासागरात असंख्य प्रवाह आहेत.

ज्याला महासागरी वाहतुक पट्टा असे म्हणतात. तो आपल्या जलवायूमानाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे

सागरी वाहतुक पट्टा ही संज्ञा एकत्र असणाऱ्या सागरी प्रवाहांचे वर्णन करते.

या प्रवाहांच्या परिणामी पाच सागरांपैकी चार एकमेकांशी पाण्याची देवाण-घेवाण करू शकतात.

हे प्रवाह जागतिक अभिसरण प्रणाली तयार करतात.

हा वाहतूक पट्टा थर्मोहालाइन (उष्मा-लवण) अभिसरण म्हणूनही ओळखला जातो.

यातील उष्मा (थर्मो) ही संज्ञा तापमानाचा निर्देश करते

आणि लवण (हालाइन) ही संज्ञा पाण्यातील मिठाची संहती निर्देशित करते.

उष्मा व लवण संहती पाण्याची घनता निर्धारित करतात.

पाण्याचा काही भाग जरी वाऱ्यांमुळे वाहून नेला जात असला तरीही

जागतिक महासागरांच्या घनतांतील फरक हाच प्रामुख्याने त्यांच्या

वाहण्याला करणीभूत होतो.

गरम पाण्याची घनता कमी असते आणि ते वर येते…. तरंगते… तर थंड पाणी खाली जाते… बुडते.

जर मिठाचे प्रमाण जास्त झाले तर पाण्याची घनता देखील वाढते.

विशेषकरून विषुववृत्तवर सूर्याकडून मिळणारी उष्णता तीव्र असते.

यामुळे तेथे मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होते आणि त्यामुळे पाण्यातील मिठाचे प्रमाण वर जाते.

येथेच गल्फ प्रवाह तयार होतो.

युरोपच्या जलवायूमानासंबंधात आखाती प्रवाह अतिशय महत्त्वाचा आहे.

त्याच्या 10,000 किमी लांबीमुळे तो पृथ्वीवरील सर्वात लांब आणि वेगवान प्रवाह ठरला आहे.

आणि तो सर्वात उबदार आहे.

साधारणपणे 2 मीटर दर सेकंदाला या प्रमाणे वाहताना तो 100,000,000 घनमीटर पाणी

युरोप खंडाच्या दिशेने वाहून नेतो.

सतत वाहणारे वारे, आग्नेय व्यापारी वारे

यामुळे त्याच्या पृष्ठावरील गरम पाणी वायव्येला

असलेल्या मेक्सिकोच्या आखातात वाहून नेले जाते व तेथे ते 30 अंश सेल्सियस पर्यंत तापते.

पृथ्वीचे परिवलन आणि पश्चिमी वारे गल्फ प्रवाहाला

युरोपच्या दिशेला वळवतात आणि तो विभाजित होतो.

यातील एक भाग दक्षिणेला वाहतो, दुसरा पूर्वेला कॅनरी प्रवाह म्हणून वाहतो

तिसरा भाग उत्तरेला उत्तर अॅटलांटिक प्रवाह म्हणून जातो

आणि तेथील वातावरणात तो उष्णता मुक्त करतो.

या ठिकाणी पाणी तुलनेने थंड होते.

बाष्पीभवनामुळे त्यातील मिठाचे प्रमाण आणि घनता वाढते.

ग्रीनलँड, नॉर्वे आणि आइसलँड यांच्यादरम्यान ते उतरते.

या ठिकाणी पृथ्वीवरचा सर्वात मोठा धबधबा आढळतो.

चिमनेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धबधब्याच्या पाण्याचे स्तंभ साधारणपणे 15 किमी रुंदीचे असून ते 4000 मीटर उंचीवरून उडी घेतात.

हा धबधबा दर सेकंदाला 17,000,000 घनमीटर म्हणजे साधारण

जगातील सर्व नद्या जेवढे पाणी वाहून नेतात त्याच्या 15 पट जास्त पाणी वाहून नेतो.

यामुळे प्रचंड ताकदीचा भोवरा तयार होतो आणि तो सातत्याने नवे पाणी खेचून घेतो.

तसेच यामुळेच गल्फ प्रवाह युरोपच्या दिशेने वाहू लागतो.

कॅरिबियन ते उत्तरीय प्रदेशापर्यंत ये-जा करणाऱ्या असंख्य प्रजाती गल्फ प्रवाहाचा

उपयोग स्वतःच्या जीवनरहाटीसाठी करतात.

पण तो आपल्यासाठी केवळ प्राणी आणतो असे नाही

तर त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्ण हवाही वाहून आणली जाते.

त्याने युरोपच्या किनाऱ्याला आणलेली उष्णता मिळवायची झाली तर

आपल्याला 1,000,000 अणूऊर्जा भट्ट्यांची गरज पडेल.

म्हणूनच आपण गल्फ प्रवाहाला उष्णतेचा पंप म्हणतो.

त्याच्या अभावी येथील तापमान मोठ्या प्रमाणात थंड झाले असते..

किमान पाच ते दहा अंशानी तरी ते कमी झाले असते.

टवटवीत शेतांऐवजी आपल्याला युरोपात दीर्घ हिंवाळे

आणि हिमाच्छादित भूदृश्य अनुभवावे लागले असते.

गेल्या काही वर्षांत माध्यमांतील वैज्ञानिक आणि पंडित पुन्हा पुन्हा

जलवायूमान बदलामुळे गल्फ प्रवाह वाहणार नाही

अशी भीती व्यक्त करत आहेत.

हिमाच्या ध्रुवीय टोप्या वितळत असल्याने ग्रीनलँडच्या आसपासच्या पाण्यातील मिठाचे प्रमाण

कमी होईल आणि त्याबरोबर त्याची घनताही कमी होईल.

यामुळे उत्तर अॅटलांटिक प्रवाह पुरेसा जड रहाणार नाही

आणि तो नेहमीप्रमाणे बुडणार नाही.

सर्वात वाईट म्हणजे ही घटना गल्फ प्रवाहाला म्हणजे आपल्या उष्णता पंपाचे काम थांबवेल.

जलवायूमान बदलांमुळे याची भरपाई होईल

असे काही जलवायूमान तज्ज्ञांनी गृहीत धरले आहे.

आपल्याला माहिती आहे की हवामान बदल ही नित्याची बाब आहे.

गेल्या काही दशलक्ष वर्षांपासूनच्या पृथ्वीच्या विकासाकडे पाहून त्यांनी हे गृहीतक मांडले आहे.

येथे हिमयुगे अवतरली आणि उबदार कालखंडही झाले.

गेल्या हिमयुगातील वितळलेल्या पाण्याच्या राक्षसी प्रवाहामुळे

उष्णता आणणारा उत्तर अॅटलांटिक प्रवाह हा विकल झाला होता. त्यामुळे उत्तर पृथ्वी गोलार्ध हिमाने पूर्णपणे आच्छादला गेला होता.

जलवायूमान बदलाचा जागतिक वाहतुक पट्ट्यावर काय परिणाम होईल

याबाबत वैज्ञानिक विविध दृष्टिकोन मांडत आहेत

पण यामुळे गेल्या हिमयुगानंतरही बऱ्यापैकी

स्थिर राहिलेली सागरी प्रवाह व वारे प्रणाली

आपल्याला अजूनही आकलन होऊ न शकणाऱ्या पद्धतीने बदलेल हे निश्चित आहे.

उपशीर्षके Amare.org समूहाने तयार केली.