मधमाश्यांचा मृत्यू - स्पष्टीकरण- परोपजीवी, विष आणि मानव | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

मानव समाज टोकाचा गुंतागुंतीचा आणि नाजुक आहे.

तो अनेक आधारस्तंभांवर उभारलेला आहे.

मधमाशी हा त्यातला एक स्तंभ आहे.

माणूस जेवत असलेल्या तीनपैकी एक भोजन त्याला मधमाश्यांमुळे मिळते.

जर सर्व मधमाशा मरून गेल्या तर

पाठोपाठ हजारो वनस्पती मृत्यू पावतील

व याच्या परिणामी येत्या काही वर्षांत लक्षावधी लोक भूकबळी ठरतील इतक्या त्या महत्त्वाच्या आहेत

याबरोबरीने मधमाश्यांचा आर्थिक परिणाम प्रचंड आहे.

दर वर्षी त्यांच्यामुळे होणाऱ्या वनस्पतींच्या परागीभवनाचे मूल्य

265 दशलक्ष डॉलर्स आहे.

जे अन्न आपण गृहीत धरतो त्याचे अस्तित्व त्यांच्या अभावी नष्ट होईल

किंवा त्याच्या उत्पादनात प्रचंड घट होईल.

सफरचंदे, कांदे, भोपळे यासह सर्व अन्न आणि गुरांना खाद्य म्हणून वापरात असलेल्या वनस्पती देखील यात येत.

म्हणजेच आपल्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दूध आणि मांस या अन्नावर देखील याचा परिणाम होईल.

अनेकदा आइन्स्टाईन “जर मधमाशा मरून गेल्या तर त्यानंतरच्या काही वर्षांत माणसांनाही त्याच मार्गाने जावे लागेल”

असे म्हणाल्याचे उद्धृत केले जाते.

वास्तवात तो तसे काही म्हणाला असेल असे नाही

पण या विधानात काही तथ्य असणे शक्य आहे.

ते काहीही असो पण मधमाशा दिसेनाशा होत आहेत.

गेल्या काही वर्षांत लक्षावधी पोळी मरून गेली.

मधमाशीपालकांना त्यांच्या वसाहतीमुळे होणारा वार्षिक तोटा 30-90 % आहे.

एकट्या अमेरिकेतील मधमाश्यांची संख्या घटत आहे.

1988 मध्ये 5 दशलक्ष पोळी होती तर आज (2015) मध्ये 2.5 पोळी आहेत.

2006 पासून वसाहती कोसळण्याची व्याधी घडत आहे.

अनेक देशातील मधमाश्यांवर हा परिणाम होतो आहे.

कशामुळे हे होते आहे याची आपल्याला पूर्णपणे खात्री नाही.

मात्र हे फार गंभीर आहे यात शंका नाही.

गेली काही दशके मधमाशा फार धोकादायक शत्रूचे अतिक्रमण अनुभवत आहेत.

अॅक्रॅपिस वूडी या माशीच्या श्वासनलिकेला संसर्ग करणाऱ्या सूक्ष्म कीटकांसारख्या

सरळ भयपटांतून बाहेर पडलेल्यासारख्या या परोपजीवींनी माश्यांवर हल्ल केलेला आहे.

ते त्यात त्यांची अंडी घालतात आणि त्यांच्या बळीतून द्रव शोषून घेतात.

यामुळे त्या बऱ्याच अशक्त होतात. हे परजीवी त्याचे संपूर्ण जीवन माश्यांच्या शरीरात व्यतीत करतात.

व्हारोआ विनाशक हे यथार्थ नाव असलेले सूक्ष्मजीव फक्त मधमाशीच्या पोळ्यात

पुनरुत्पादन करू शकतात. ते मधमाश्यांचे पहिल्या क्रमांकाचे सर्वात घातक शत्रू आहेत.

मादी सूक्ष्म परजीवी कीटक मेणाचे आवरण घातले जाण्यापूर्वीच

मधमाश्यांच्या पोळ्याच्या खणांत प्रवेश करून

मधमाशीच्या अळीचे कोशात रूपांतर होण्यापूर्वीच तिच्या शरीरात अंडी घालते.

ही अंडी उबवली जातात आणि नवजात कीटक व त्यांची आई वाढत असणाऱ्या माशीचा अन्न म्हणून उपयोग करत

बंदिस्त खणाच्या सुरक्षित जागी रहातात.

बहुतकरून या पायरीला माशी मरत नाही फक्त अशक्त होते.

यामुळे ती मेण चघळून मेणाच्या झाकणामार्गे स्वतःला त्या खणातून

मोकळे करण्याइतपत शक्ती तिच्याकडे असते.

असे करताना ती माशी, आई कीटक व नवजात कीटकांनाही त्या खणातून बाहेर काढते

आणि हे परजीवी कीटक पोळ्यात सर्वत्र पसरायला मोकळे होतात.

10 दिवसात हे प्रक्रिया चक्र पुन्हा सुरू होतं.

परजीवींची संख्या घातांकी प्रमाणात वाढते

आणि याच्या परिणामी संपूर्ण पोळे कोसळते.

एकदा खणाबाहेर पडले की प्रौढ परजीवी माशीच्या शरीरातील द्रव्ये शोषून

त्यांना बऱ्याच प्रमाणात अशक्त करतात.

या वाईटात भर म्हणून या मधमाश्यांना अधिक हानी पोहोचवणाऱ्या विषाणूंना त्यांच्या शरीरात पसरवतात.

याच्या परिणामी निरूपयोगी पंखांसारखे जन्मदोष माशीत निर्माण होतात.

पण याबरोबर विषाणू आणि बुरशीसारखे इतर धोकेही मधमाश्यांना असतात.

सर्वसाधारण परिस्थितीत या घटनांचे व्यवस्थापन करणं शक्य व्हायला हवं.

पण धडकी भरवणाऱ्या प्रमाणात मधमाशा मृत होत आहेत.

त्याचे स्पष्टीकरण वरील प्रकारे पूर्ण होत नाही.

अलीकडच्या काही वर्षांत नवी कीटकनाशके वापरात आणली आहेत.

ती मधमाश्यांसाठी जीवघेणी ठरत आहेत.

निओनिकोटिनॉइड, म्हणजे निकोटीन कुलासमान रासयनिक कुलाला,

डीडीटीसारख्या रसायनाला पर्याय म्हणून 1990च्या सुरुवातीला मान्यता देण्यात आली.

ही रसायने कीटकांच्या चेताप्रणालीची हानी करत त्यांच्यावर हल्ला करतात.

आज ही कीटकनाशके जगभर मोठ्या प्रामाणात वापरात आहेत.

जागतिक पातळीवर त्यांची 2008 साली 1.5 दशलक्ष पौंड इतकी विक्री झाली.

कीटकनाशकांच्या जागतिक बाजारात याचं प्रमाण 24 % आहे.

2013 साली अमेरिकेत जवळपास 95 % मका आणि मोहरीसारख्या कॅनोला या पिकांसाठी तसेच

बहुसंख्य फळे व भाज्यांसाठी,

म्हणजे सफरचंद, चेरी, पीच, संत्री, बटाटे, बेरी, पालेभाज्या, टोमॅटो,

धान्ये, तांदूळ, कठीण कवचाची फळे, द्राक्षे आणि इतर अनेकांसाठी नेओनिकोटिनॉइड वापरली गेली.

परागकण गोळा करताना किंवा प्रदूषित पाण्यामुळे

मधमाशा या विषांच्या संपर्कात येतात.

कधी त्या या गोष्टी पोळ्यात घेऊन येतात.

तेथे त्या विषद्रव्यांचा साठा होऊन हळूहळू संपूर्ण वसाहत मरून जाते.

ही विषे भयानक प्रकारांनी माश्यांना हानी पोहोचवतात.

पुरेशा मोठ्या प्रमाणात विषाचा घोट मिळाला तर लगेचच त्यांना गरगरते, पक्षघात होतो आणि मृत्यू होतो.

परंतु लहानसा घोटही जीवघेणा ठरतो.

त्यामुळे माशी जगात कसा विहार करायचा ते विसरून जाते.

याच्या परिणामी ती भरकटते, वाट चुकते, आणि स्वतःच्या पोळ्यापासून विभक्त होऊन एकाकी मृत्यू पावते.

जर असे वारंवार घडले तर पोळे तग धरण्याची क्षमता गमावून बसते.

आपल्याला माहीत आहे की निओनिकोटिनॉइड माश्यांसाठी हनीकारक आहे

आणि आपल्याला त्याच्या पर्यायाची गरज आहे,

पण त्याला विलंब करून अब्जावधी डॉलर्स मिळवणे शक्य होते.

रासायनिक उद्योगाने प्रायोजित केलेले अभ्यास हे वैज्ञानिकांनी स्वतंत्रपणे केलेल्या अभ्यासांच्या तुलनेत चमत्काराने

ही कीटकनाशके माश्यांसाठी खूपच कमी विषारी आहेत असे सिद्ध करतात.

माश्यांच्या मृत्यूला आणखीही काही घटक कारणीभूत आहेत.

उदाहरणार्थ, अतिरेकी जनुकीय सारखेपणा, एकसूरी धान्योत्पादन

अधिक संख्येमुळे पोषणात कमतरता, मानवी हस्तक्षेपामुळे येणारा ताण

आणि अन्य कीटकनाशके यांचा माश्यांच्या मृत्यूशी संबंध आहे.

यातील प्रत्येक घटक स्वतंत्रपणे माशीसाठी मोठी समस्या ठरते.

पण एकत्रितपणे ते बहुतकरून वसाहत कोलमडण्याचे कारण ठरू शकतात.

अलीकडील दशकांत परोपजीवी त्यांच्या खेळात वरटढ ठरल्यामुळे

मधमाशा आता टिकून रहाण्यासाठी लढाई करत आहेत.

जर त्या ही लढाई हरल्या तर तो मोठाच उत्पात ठरेल.

तुलनेने अधिक अन्न वैपुल्य आणि वैविध्य यांच्या सह

आपल्याला जगणं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला ही कठीण समस्या सोडवली पाहिजे.

जरी आपण स्वयंभू असल्याचा आव आणत असलो तरीही

मानव समूहाटी पृथ्वी आणि अन्य जीवांशी खोलवर आंतरजोडणी झालेली आहे.

जरी आपल्याला निसर्ग सौंदर्य़ाचे जतन करायचे नसेल तरीही स्वतःला खात्रीने टिकवून ठेवण्यासाठी

आपल्याला आपल्या भोवतालाची चांगली काळजी घ्यायला हवी.

या दृक्श्राव्यफितीला ऑस्ट्रेलियन अॅकॅडमी ऑफ सायन्सने पाठबळ दिले आहे.

ही संस्था वैज्ञानिक उत्कृष्टतेला प्रस्थापित करण्यासाठी आणि पाठबळ देण्यासाठी कार्य करते.

अधिक माहितीसाठी www.nova.au ला भेट द्या.

त्यांच्या बरोबर काम करणं उत्साहवर्धक होतं म्हणूनच त्यांच्या संकेतस्थळाला भेट द्या

तुम्ही patreon वर दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे आम्हाला दृक्श्राव्यफिती बनवणे शक्य झाले.

नुकताच आम्ही कामाचा (मैलाचा दगड पार केला) महत्त्वाचा टप्पा गाठला

आणि त्यामुळे जुलै महिन्यात एक जादा दृक्श्राव्यफित असेल.

जर आम्हाला पाठबळ देऊन तुम्हाला कुर्झजेसाग्ट पक्षी - फौजेचा भाग व्हायचं असेल

तर Patreon पृष्ठ पाहा.

नुकताच यूट्यूब वाहिनीच्या क्षेत्र दिनाने आम्हाला

काहीतरी वेगळं करण्याची संधी दिलीः Game of Thornes बद्दल छोटी दृक्श्राव्यफित बनवायला सांगितली.

त्यांच्या वाहिनीवर जाऊन पाहा.

उपशीर्षके Amara.org समूहाने तयार केली.