तुम्ही काय व कोण आहात? | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

तुम्ही तुमचे शरीर आहात काय?

तसं म्हणायला गेलं तर हे अगदी खरय्.

पण हे कोणत्या मर्यादेनंतर खरं ठरत नाही?

तुम्ही, तुम्ही असणं थांबण्यापूर्वी तुमचा स्वतःचा किती भाग तुम्हाला काढून टाकता येईल?

आणि या प्रश्नाला काही अर्थ आहे काय?

तुमचे भौतिक म्हणजे पेशी आहेत. अब्जावधी पेशी म्हणजे तुम्ही.

आकाशगंगेत असलेल्या ताऱ्यांच्या किमान दहापट जास्त संख्येने आहेत या पेशी.

पेशी सजीव आहे. ती विभिन्न अशा 50 हजार प्रथिनांनी बनलेले यंत्र असते.

तिला भान नाही, इच्छा नाही, तिचं काहीही प्रयोजन नाही, ती फक्त आहे

पण तरीही ती एक व्यक्ती आहे.

अन्न तयार करणं, स्रोत जमा करणं, वस्तूंची आसपास वाहतूक करणं

पर्यावरण निरखून पाहणं इत्यादी कामं पार पाडण्यासाठी

तुमच्या पेशी एकत्र मिळून प्रचंड संरचना उभी करतात.

जर तुम्ही तुमच्या शरीरातून पेशी वेगळ्या केल्या आणि त्या योग्य वातावरणात ठेवल्या

तर त्या काही काळ जिवंत राहू शकतील.

म्हणजेच तुमच्या पेशी तुमच्याशिवाय अस्तित्वात राहू शकतील, त्यांच्याशिवाय तुम्ही अस्तित्वात राहू शकणार नाही.

जर आपण सर्व पेशी काढून घेतल्या तर ‘तुम्ही’ अस्तित्वात रहाणार नाही.

तुमच्या पेशींचा ढीग तुम्ही असणं केव्हा थांबवतो याची काही मर्यादा आहे काय?

उदाहरणार्थ, जर तुम्ही अवयव दान केलं तर तुमच्या लक्षावधी पेशी

अन्य कोणाच्या तरी शरीरात जिवंत रहाणं सुरू ठेवतील.

तुमचा भाग अन्य व्यक्तीच्या शरीराचा भाग झाला

किंवा ते अन्य शरीर तुमच्या शरीराचा भाग जिवंत ठेवत आहे असा याचा अर्थ आहे काय?

किंवा आपण एका प्रयोगाची कल्पना करूया.

तुम्ही आणि रस्त्यावरची कोणतीही व्यक्ती यांनी पेशींची अदलाबदल केली.

एका वेळी एक याप्रमाणे तुमचं शरीर त्या शरीरातील एक पेशी घेते

आणि ते शरीर तुमची एक पेशी घेते.

अशा किती पेशींची अदलाबदल केली तर ते दुसरं शरीर म्हणजे तुम्ही व्हाल?

या पेशी कधी काळी किंवा याच एका अत्यंत धिम्या आणि सकल मार्गानं तुमचं दूरांतरण करतील काय?

आपण हे अधिक गुंतागुंतीचं करूया.

आपण काहीतरी स्थिर आहोत असं मानणं समर्थनीय नाही.

तुमच्या जीवनकाळात तुमच्या बहुतेक सर्व पेशींना मरावे लागतेच.

केवळ या दृक्श्रव्याफितीची सुरुवात झाल्यापासून दोनशे पन्नास दशलक्ष पेशी मेल्या आहेत.

दर सेकंदाला एक ते तीन दशलक्ष पेशी मृत्यू पावतात.

सात वर्षांच्या कालखंडात तुमच्या बहुतेक पेशी किमान एकदातरी बदलल्या जातात.

तुमच्या पेशींची मांडणी बदलण्याच्या प्रत्येक वेळी तुम्ही पूर्वीपेक्षा किंचित वेगळे असता.

म्हणजेच तुम्ही सातत्याने मरत असता.

जर नशिबानं तुम्ही म्हातारं होण्याइतकं जगलात

तर तुम्ही अंदाजे दशलक्ष अब्ज पेशींच्या चर्कातून गेला आहात.

म्हणजेच आपण स्वतः आहोत असं तुम्ही जे समजता ते वास्तवात फक्त झटकन् घेतलेलं छायाचित्र असतं.

परंतु कधीतरी, पेशी तुटतात आणि त्यांना मरायचं नसतं

आणि आपल्या शरीराच्या एकत्मतेच्या मूळ स्वरूपासंबंधात प्रश्न निर्माण होतात.

त्यांना आपण कर्करोगपेशी म्हणतो. त्या जैविक सामाजिक करार रद्द करतात

आणि मुळातून अमर होतात.

कर्करोग बाहेरून आक्रमण करत नाही.

तो स्वतःचं अस्तित्व तुमच्या अस्तित्वावर लादणारा तुमचा भाग असतो.

परंतु तम्ही कर्करोग पेशी आपल्या आतला अन्य घटक होऊन रहातो असाही युक्तिवाद तुम्ही करू शकता.

दुसरं म्हणजे अन्य अस्तित्वाला फक्त तगून व टिकून रहायचं असतं असंही म्हणायला हरकत नाही.

यासाठी आपण त्याला दषी ठरवू शकतो काय?

1951 मध्ये मृत्यू पावलेल्या कर्करुग्ण असलेल्या छोट्या हेन्रित्ता लॅक्सच्या

पेशीची काळीज गोठवणारी गोष्ट आहे ही.

साधारणतः कोणतीही पेशी फक्त काही काळच प्रयोगशाळेत जगू शकते

व यामुळे संशोधन करणं फारच कठीण होऊन बसतं.

हेन्रित्ताच्या कर्कपेशी अमर होत्या.

दशकभरात त्या पुन्हा पुन्हा गुणित झाल्या

आणि असंख्य रुग्णांना वाचवणाऱ्या असंख्य संशोधन प्रकल्पांसाठी वापरल्या गेल्या.

हेन्रित्ताच्या पेशी अजूनही जिवंत आहेत आणि त्या

सर्व मिळून त्या किमान 20 टन जैवभारात वाढलेल्या आहेत.

याचा अर्थ असा की कोणीतरी अनेक दशकांपूर्वी मरून गेले आहे असे

मानलेले असले तरीही त्याचे जिवंत भाग जगभर आहेत.

या पेशींत कितीशी हेन्रित्ता आहे?

काही झालं तरी तुमच्या पेशींपैकी एक तुम्हाला कशी “तुम्ही” बनवते?

कदाचित् त्याच्यातील माहिती, तुमचा डीएनए याला करणीभूत आहे काय?

अगदी अलीकडे पर्यंत तुमच्या शरीरातील सर्व पेशींचा जनुकीय संकेत मुळातच समान असावा

असा विश्वास वाटत होता.

परंतु तो आता चुकीचा ठरला आहे.

तुमचा जनुकसंच भ्रमणक्षम आहे व

कालप्रवाहात तो जनुकीय बदल आणि पर्यावरणीय प्रभावामुळे बदलतो.

हे विशेषतः तुमच्या मेंदूत घडतं.

अलीकडील संशोधनांनुसार प्रौढ व्यक्तीतील एका चेतापेशीतील जनुसंचात

मुळात त्याच्या भोवतालच्या पेशींत नसलेले हजारापेक्षाही जास्त जनुकीय बदल त्याच्या जनुकीय संकेतात घडतात.

पण तुमच्या डीएनएमध्ये तुम्ही खरोखरच किती असता?

मानवातील आठ टक्के जनुकसंच हे कोणेएकेकाळी आपल्या पूर्वजांना झालेल्या

विषाणू संसर्गातून आलेले आणि आपल्यात मिसळलेले आहेत.

तुमच्या पेशींना शक्तिपुरवठा करणारी यंत्रणा असलेल्या तंतुकणिका एकेकाळी आपल्यात एकात्मिक झालेले बॅक्टेरिया आहेत.

अजूनही त्यांचा स्वतःचा डीएनए टिकून आहे.

सर्वसाधारण पेशीत त्या शेकड्यांनी असतात.

अतिशय लहान अशा शेकड्यांनी असणाऱ्या या खरोखरच मानवी नाहीत परंतु त्या अस्तित्वात आहेत.

हे गोंधळात टाकणारं आहे. चला… आपण थोडा त्यांचा मागोवा घेऊया.

तुम्ही अनेक महापद्मांच्या संख्येने असलेल्या सूक्ष्म गोष्टींनी बनलेले आहोत हे आपल्याला माहीत आहे.

त्या गोष्टी त्याच्याहून लहान असलेल्या व सतत बदलत रहाणाऱ्या गोष्टींनी बनलेल्या आहेत.

एकत्रितपणे या सर्व लहान गोष्टी स्थिर नाहीत तर गतिमान आहेत.

त्यांची घडण आणि स्थिती सतत बदलत असते.

म्हणूनच आपण कादाचित कोणतीही स्पष्ट बाह्यसीमा नसलेली स्व-चिरस्थायी रचना आहोत.

या रचनेने कोणत्यातरी एका बिंदूवर स्व-भान प्राप्त केले आणि

आता काळ आणि अवकाश यांच्या माध्यमांतून स्वतःबद्दल विचार करण्याची क्षमता आपल्यकडे आहे.

परंतु आपलं अस्तित्व हे खरंतर फक्त नेमकं या क्षणापुरतंच आहे.

ही रचना कोठे सुरू होतेः

तुमच्या कल्पनेबरोबर, जेव्हा पहिला मानव उदयाला आला तेव्हापासून.

जेव्हा पहिल्या जीवाने आपल्या छोट्या ग्रहाला पादाक्रांत करायला सुरुवात केली तेव्हा,

की जेव्हा तुमचं शरीर घडवणारी मूलद्रव्यं तुमच्या ताऱ्यात घडवली गेली तेव्हा?

आपले मानवी मेंदू निरपेक्षतेशी व्यवहार करण्यासाटी उत्क्रांत झालेले आहेत.

वास्तव बनवणाऱ्या धूसर सीमा आपल्या आवाक्यात येणं कठीण असतं.

कदाचित आरंभ व शेवट, जीवन व मृत्यू, तुम्ही व मी

इत्यादी वास्तवात निरपेक्ष नसावं परंतु ते प्रवाही रचनेचा घटक असावं.

विचित्र आणि सुंदर अशा विश्वात बेमालून हरवून गेलेली अशी ही रचना असावी.

आपण कोण आहोत हा फक्त आपल्यापुरता

मर्यादित प्रश्न नाही पण तो आपल्या मनांचा देखील प्रश्न आहे

जशा आपल्या पेशी विभाजित होतात आणि आपल्यापासून विभक्त होतात, तसेच

कवटीत असूनही आपले मेंदू तुकडे होऊन आपल्यापासून वेगळे होतात.

माझ्या वाहिनीवर जाऊन पुढचा भाग पाहण्यासाठी येथे टिकटिक करा.

ठीक आहे. आता तुम्ही CGP Greyची दृक्श्राव्यफित पाहू शकता.

जर तुम्ही त्याच्या वाहिनीचे वर्गणीदार नसाल

तर तुम्ही वर्णीदार होणं आवश्यक आहे.

Amara.org समूहाने उपशीर्षके तयार केली .