न्यूक्लियर ऊर्जा कसं कार्य करते? 1/3 | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

तुम्ही कधी अणूऊर्जेबाबतच्या युक्तिवादात पडला होता काय?

आम्ही मात्र यात पडलो होतो आणि आम्हाला ते नैराश्यात व गोंधळात टाकणारे वाटले.

चला तर मग… आपण हा विषय आपल्या पकडीत घेण्याचा प्रयत्न करू या

प्रस्तावना

या सगळ्याची सुरुवात1940 साली झाली.

युद्धाचे आणि अणूबॉम्बच्या वापराचे धक्के आणि भीती यांच्या नंतर

नव्या तंत्रज्ञानातून निर्माण झालेले, जगाला पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे रहायला

मदत देणारे अणूऊर्जा हे शांततेची हमी देणारे सहउत्पादित ठरले.

प्रत्येकाच्या कल्पना-भराऱ्या बेभान धावत होत्या…

वीज फुकट मिळेल काय?

अँटार्टिकावर वसती करण्यासाठी अणऊर्जेची मदत होईल काय?

अणूऊर्जेवर चालणाऱ्या चारचाक्या, विमाने किंवा घरे अस्तित्वात येतील काय?

हे फक्त काही वर्षांच्या कष्टाच्या कामांएवढंच दूर आहे असं वाटत होतं.

एका गोष्टीची मात्र खात्री होतीः भविष्य अण्विक होतं.

मग काही वर्षांनंतर, म्हणजे अण्विक युगाची नशा चढल्यासारखं झालं होतं त्यानंतर,

असं लक्षात आलं की अणूऊर्जा ही गुंतागुंतीची आणि फारच महागडी आहे.

कागदावर भौतिकीचे अभियांत्रिकी रूपांतर करणे फार सोपे होते

पण वास्तवात ते कठीण होते.

अणूऊर्जा ही गुंतवणूक म्हणून फार जोखमीची आहे असा विचार करून बहुतेक

खाजगी कंपन्याही वायू, कोळसा आणि तेल यांना चिकटून रहाण्याला पसंती देत होत्या.

प्रचंड प्रमाणात स्वस्त वीज निर्माण करण्याची,

वायू व तेल यांच्या आयातीपासूनच्या स्वातंत्र्याची.

लपवून का होईना, काहीची अणू अस्त्रे बाळगण्याची इच्छा पूर्ण होण्याची संभाव्यता

हे अण्विक युगाचे आश्वासन, उत्तेजित करणारे नवे तंत्रज्ञान यामुळे

मिळालेल्या प्रेरणातून

अनेक लोक ही कल्पना सोडून द्यायला राजी नव्हते.

1970 च्या सुरुवातीला जेव्हा मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या किमती गगनाला भिडल्या…

तेव्हा एकदाचा अणूऊर्जेचा सोनेरी क्षण अवतरला.

आता चकित करणाऱ्या वेगाने व्यापारी रस व गुंतवणूक वाढली.

1970 आणि 1985 या काळात जगात असलेल्या सर्वांपैकी निम्म्यापेक्षा

जास्त अणूभट्ट्या उभारल्या गेल्या.

पण कोणत्या प्रकारच्या अणूभट्ट्या उभारायच्या…

निवड करण्यासाठी किती विविध प्रकार उपलब्ध आहेत?

हलक्या पाण्यावर चालणाऱ्या व सर्वात निम्न गुणवत्तेच्या अणूभट्टीने आश्चर्यकररीत्या

ही स्पर्धा जिंकली.

त्या भट्टीत नवीन असे काही नव्हते. आणि ती वैज्ञानिकांच्याही आवडीची नव्हती…

पण तिचे काही लाभ निर्णायक होते.

ती अस्तित्वात होती, ती काम देत होती आणि ती कमालीची स्वस्त होती.

तर मग ही हलक्या पाण्याची भट्टी काय साधत होती?

तिचं मूलभूत तत्त्व कमालीचं सोपं होतं…

कृत्रिम साखळी अभिक्रिया वापरून पाणी तापवलं जात होतं.

कोणत्याही रासायनिक अभिक्रियेपेक्षा अणू विखंडन

अनेक दशलक्ष पट जास्त ऊर्जा मुक्त करते.

युरेनियम-235, सारख्या अस्थिरतेच्या काठावर असलेल्या जड मूलद्रव्यावर

न्यूट्रॉनचा मारा केला जातो.

न्यूट्रॉन युरेनियममध्ये शोषले जातात पण तो अणू अस्थिर होतो.

बहुतेक वेळा लगेचच तो वेगाने हालचाल करणाऱ्या हलक्या मूलद्रव्यांत विभागला जातो.

आणि काही जास्तीचे न्यूट्रॉन्स मुक्त होतात आणि प्रारणांच्या स्वरूपात उर्जा मुक्त होते.

काटेकोरपणे नियंत्रित केलेल्या साखळी अभिक्रियेत ही प्रारणे आसपासच्या पाण्याची उष्णता वाढवतात तर न्यूट्रॉन्स इतर अणूंबरोबरच्या प्रक्रियेची पुनरावृत्ती करतात

आणि यातून अधिक ऊर्जा व प्रारणे मुक्त होतात.

अणऊबॉम्बमुळे घडणाऱ्या सैरभैर स्वरूपाच्या वेगवान अशा विध्वंसक क्रियेपेक्षा ही क्रिया भिन्न असते.

आपल्या हलक्या पाण्याच्या भट्टीत न्यूट्रॉनची ऊर्जा नियंत्रित करण्यासाठी सौम्य रसायनिक अभिकारकाची गरज असते.

सामान्य आणि नेहमीच्या वापरातले पाणी हे काम पार पाडते. असा वापर व्यवहार्यही ठरतो….

कारण एवीतेवी झोतयंत्रे चालवायला पाण्याचाच वापर केला जातो.

सोपी आणि स्वस्त असल्यामुळे हलक्या पाण्याची अणूभट्टी प्रचलित झाली.

तथापि ही अणूभट्टी सुरक्षित नव्हती की कार्यक्षम नव्हती

की तंत्रिकदृष्ट्याही प्रभावी नव्हती.

जरी 1979 साली पेन्सिल्व्हानियामध्ये थ्री माइल आयलँड अणूभट्टीचा गाभा विरघळला

आणि केवळ थोडक्यात आपत्ती टळली तरी

नव्याने पल्लवित झालेले हे अणूऊर्जा वेड जेमतेम दशकभर टिकले

1986 मध्ये चेर्नोविल दुर्घटनेतील किरणोत्सारी ढगाने, मध्य युरोपला प्रत्यक्ष धोका निर्माण केला

आणि 2011 बरीच लांबलेली फुकुशिमा आपत्ती यामुळे

नव्या चर्चा घडू लागल्या आणि काळजी व्यक्त होऊ लागली.

1980 सालात 218 नव्या अणूऊर्जा भट्ट्या कार्यरत झाल्या होत्या तरीही

80च्या अखेरीपर्यत त्यांची संख्या

आणि अणू वीजनिर्मितीतील त्यांचा जागतिक वाटा मंदावला होता

असं असेल तर आताची परिस्थिती काय आहे?

आज अणूऊर्जा जगाच्या एकूण ऊर्जा मागणीपैकी 10% गरज भागवते.

31 देशांत मिळून जवळपास 439 अणूभट्ट्या आहेत.

2015 साली जवळपास 70 नव्या अणूभट्ट्यांचे बांधकाम चालू होते.

यातील बहुतेक झपाट्याने विकसित होणाऱ्या देशातील आहेत.

सर्वच्या सर्व जमेस धरता जगभर 116 नव्या नियोजित केल्या आहेत.

बऱ्यापैकी जुन्या तंत्रावर आधारलेल्या बहुसंख्य अणूभट्ट्या उभारल्याला 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे.

यातील 18 % पेक्षा जास्त या विविध प्रकारच्या हलक्या पाण्याच्या अणूभट्ट्या आहेत.

आज अनेक देशांना निवडीचा प्रश्न भेडसावतो आहे.

कदाचित फारशा चाचण्या न केलेल्या नमुन्याच्या, जुन्या होत जाणाऱ्या अणूभट्ट्या अधिक कार्यक्षम असणाऱ्या वापराव्यात

किंवा अणूऊर्जेपासून दूर जाऊन नव्या वेगळ्या किमतीच्या

आणि पर्यावरणावर वेगळा परिणाम करणाऱ्या तंत्रांना जवळ करावे असा तिढा त्यांना सोडवावा लागेल.

मग आपण अणूऊर्जा वापरावी काय?

यापुढच्या आठवड्यात बाजूचे व विरोधातले युक्तिवाद येथे सादर केले जातील.

वर्गणीदार व्हा म्हणजे तुमची संधी चुकणार नाही.