एंटीबायोटिक अपोकलिप्स समजलेली. | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

मानवजग सध्या सहभागाने परिपूर्ण व बहुगुणी जीव घडवण्याच्या प्रयत्नांत आहे

असं जर कोणी तु्म्हाला सांगितलं तर तुमचा प्रतिसाद काय असेल?

असा जीव जो अब्जावधी लोकांना ठार मारेल?

खरंतर या क्षणी अगदी असंच घडत आहे.

आपण बहुगुणी बॅक्टेरिया घडवण्याच्या प्रक्रियेत आहोत.

बॅक्टेरिया ग्रहावरील सर्वात पुरातन सजीवांपैकी आहेत.

या सर्वत्र आढळणाऱ्या आणि सर्वात लहान गोष्टीला आपण अजूनही जीवन असं मानतो.

ते स्वतःला टिकवून ठेवण्यात पारंगत आहेत.

बहुतेक बॅक्टेरिया आपल्यासाठी निरुपद्वी आहेत.

त्यांच्यातील महपद्म बॅक्टेरियांना तुमचं शरीर आसरा देतं आणि टिकून रहायला मदत करतं.

पण काही बॅक्टेरिया मात्र तुमच्या शरीरावर हल्ला करतात, झपाट्याने शरीरात पसरतात आणि तुमचा जीव घेतात.

प्रतिजैवके हे शक्तिशाली अस्त्र विकसित होईपर्यंत बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे

दशलक्षावधी लोकांचा मृत्यू ओढवत होता.

लसीकरणाच्या बरोबरीने प्रतिजैवकांनी औषधोपचारांत क्रांती घडवली

आणि दशलक्षावधी जीव वाचवले.

सहज बळी पडणाऱ्या, प्रचंड संख्येने असणाऱ्या बॅक्टेरियांना प्रतिजैवके बऱ्यापैकी पटकन मारून टाकतात आणि

फक्त टिकावूंचा लहान गट तेवढा शिल्लक उरतो.

आपल्या प्रतिरोध प्रणालीला त्यांचा समाचार घेणे सोपे जाते.

प्रतिजैवकं हे कार्य कसं करतात?

प्रत्येक बॅक्टेरियम ही खूप गुंतागुंतीची यंत्रणा आहे अशी कल्पना करा.

या यंत्रणेमुळे चाललेल्या हजारो गुंतागुंतीच्या प्रक्रिया बॅक्टेरियमला जिवंत आणि कृतिशील ठेवतात.

प्रतिजैवकं ही गुंतागुंतीची यंत्रणा उधळून लावतात.

उदाहरणार्थ, त्यांच्या चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करून

त्यांची वाढ लक्षणीय प्रमाणात मंद करतात त्यामुळे त्यांचा धोका रहात नाही.

अन्य प्रतिजैवके डीएन्एवर हल्ला करतात आणि पुनरुत्पादनाला प्रतिबंध करतात.

यामुळे बॅक्टेरियांचे गुणन थांबते व शेवटी ते मरून जातात.

डीएन्एवर हल्ला झाल्यामुळे त्यांचा कोथळा बाहेर पडतो आणि ते झटकन मरतात.

हे सर्व घडत असताना शरीराच्या पेशींना कोणताही त्रास होत नाही.

पण आता उत्क्रांती सर्व गोष्टी जास्तच गुंतागुंतीच्या करत आहेत.

केवळ अनमान धबक्याने अगदी अल्पसंख्य बॅक्टेरिया तुमच्या शरारात शिरकाव करून शिल्लक रहातातच.

स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःचे मार्ग उत्क्रांत केलेले असावेत.

उदाहरणार्थ, प्रतिजैवकाकडून स्वतःचा नाश होण्यापूर्वीच त्या प्रतिजैवकाला छेदून ते त्याच्या

रेणूत बदल करत असावेत त्यामुळे ते प्रतिजैवक त्यांचा नाश करू शकत नसावे.

किंवा ते प्रतिजैवकांना बाहेर फेकून देणाऱ्या

पंपासाठीस्वतःच्या ऊर्जेची गुंतवणूक करत असावेत.

प्रतिजैवकाला दाद न देणाऱ्या थोड्या बॅक्टेरियांचा समाचार घेणे ही फारशी मोठी बाब नसते.

कारण शरीरातील प्रतिरोधप्रणाली त्यांचा सहज नायनाट करते.

पण जर का त्यांनी यातून सुटका करून घेतली तर ते स्वतःची प्रतिरोधक्षमता पसरवतात.

बॅक्टेरीया स्वरक्षणाचा प्रसार कसा करतात?

बॅक्टेरियांत दोन प्रकारचे डीएन्ए असतात ही सर्व प्रथम लक्षात घेण्याजोगी बाब आहे.

जनुके आणि प्लझ्माइडस् हे लहान व मुक्तपणे तरंगणारे भाग असे ते प्रकार आहेत.

बॅक्टेरिया एकमेकांना मिठी मारतात आणि प्लाझ्माइडची अदलाबदल करतात.

या अदलाबदलीमुळे त्यांच्या उपयुक्त क्षमतांची अदलाबदल होते.

या प्रकारे बॅक्टेरियांच्या समूहात प्रतिबंध क्षमता पसरते.

किंवा रूपांतरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेद्वारे बॅक्टेरिया मृत बॅक्टेरियांची सुगी करून… साठवण करून

डीएन्एचे तुकडे गोळा करतात.

ही प्रक्रिया बॅक्टेरियांच्या भिन्न प्रजातींतही होते.

याचाच परिणाम म्हणून पुढे गुणित प्रतिजैवकांपासून सुरक्षित रहाणाऱ्या

विविध शक्तिशाली बहुगुणी बॅक्टेरियांची निर्मिती होते.

विशेषतः रुग्णालये त्यांच्यासाठी परिपूर्ण पैदासकेंद्रे ठरतात.

माणसांची स्मृती अल्प आहे.

त्यामुळे प्रतिजैवकपूर्व युगाच्या भयाचे धक्के त्यांच्या विस्मृतीत गेले आहेत.

विज्ञानाने संपादित केलेली खेळी बदलून टाकणारी ही वस्तू उपलब्धी मानण्याऐवजी

आज आपण या शक्तिशाली औषधाला फक्त खरेदी-विक्रीयोग्य वस्तू म्हणून हाताळतो.

यातून विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

विकसनशील देशातील अब्जावधी लोकांना

अजूनही प्रतिजैवके मिळणे दुरापास्त आहे.

तर जगाच्या काही भागांत प्रतिजैवके वापरण्यासाठी उदारहस्ते लिहून दिली जातात

आणि निष्काळजीपणे घेतली जातात.

प्रतिजैवके हा औषधांतील सर्वात शेवटचा आसरा असायला हवा.

तुमची सर्दी तुम्हाला वैताग आणते म्हणून उपयोगात आणण्यासाठी ते नाही.

मांसाच्या निर्मितीत होणारा उपयोग ही प्रतिजैवकांबाबतची आणखी एक गंभीर समस्या आहे.

कोणत्याही विशिष्ट कालखंडात मानवाला

20 ते 30 महापद्म प्राणी सांभाळता येतात.

मांसाचे उत्पादन खूप फायदेशीर व्हावे (ग्राहकांना स्वस्त मिळावे) म्हणून प्राण्यांना अत्यंत गलिच्छ परिस्थितीत ठेवले जाते.

त्यांना गचडीने अस्वच्छ परिस्थितीत डांबले जाते.

ही जागा रोगांच्या पैदाशीसाठी परिपूर्ण असते.

यावर उपाय म्हणून प्राण्यांनी जास्तीत जास्त बॅक्टेरिया मारून टाकावेत म्हणून त्यांना प्रतिजैवके दिली जातात.

यातून प्राण्यांना आजारांपासून दूर ठेवले जाते.

केवळ एका डॉलरला चीझबर्गर विकता यावा यासाठी हा खटाटोप केला जातो.

या कार्यप्रणालीच्या परिणामी आपण अधिकाधिक बॅक्टेरिया निर्माण केले आहेत

यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही.

हे प्रतिजैवकांना प्रतिरोध करणारे बॅक्टेरिया आहेत.

यावर प्रतिहल्ला म्हणून आपण विविध प्रतिजैवके वापरतो,

आणि आपल्यापाशी दुसरेही गुप्त अस्त्र आहेः आपल्याकडे विशिष्ट प्रतिजैवके आहेत.

ती प्रतिरोध विकसित केलेल्या बॅक्टेरियाचा समूळ नाश करतात.

सर्वशक्तिमान बॅक्टेरियाची निर्मिती टाळण्यासाठी त्यांच्या वापरावर कडक निर्बध आहेत.

किंवा निदान आपल्याला तसं वाटत तरी असावं.

2015 सालाच्या शेवटी घाबरवणारी बातमी चीनमधून आली.

शेवटचा उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या कोलिस्टिन या प्रतिजैवकाला होणाऱ्या

प्रतिरोधाचा शोध लागला आहे.

कोलिस्टिन हे जुने औषध फारच क्वचित वापरले जात होते कारण त्यामुळे यकृताची हानी होण्याची शक्यता होती.

रुग्णालयांत होणाऱ्या काही गुंतागुतीच्या संसर्गांत

इतर औषधांच्या संपूर्ण गटाला प्रतिरोध करणाऱ्या बॅक्टेरियांशी लढण्यासाठीचा अंतिम आसरा

म्हणून त्यांच्याकडून फारसा प्रतिरोध होणार नाही अशा या औषधाचा वापर केला जात होता आणि त्यामुळे त्याची थोरवी वाढली होती.

बॅक्टेरियांकडून कोलिस्टिनला होणारा प्रतिरोध ही अतिशय वाईट बातमी आहे.

यामुळे संरक्षणाच्या शेवटच्या फळीचा विध्वंस होऊन परिणामी अनेक लोक मृत्यूमुखी पडतील.

हे कसं घडेल?

वर्षांनुवर्षे चीनी वराहपालन केंद्रात लक्षावधी प्राण्यांना कोलिस्टिन दिले जात होते.

प्रतिरोधक बॅक्टेरिया विकसित झाले आणि सुरुवातीला ते एका प्राण्यातून दुसऱ्या प्राण्यात पसरले

आणि नंतर कोणाच्याही लक्षात न येता ते माणसांत पसरले.

पृथ्वीवरून दर दिवशी सरासरी 1,00,000 उड्डाणे घेतली जातात.

म्हणजे जवळ जवळ या ग्रहावरचा प्रत्येक माणूस इतरांशी जोडला जातो.

आधुनिक जग निर्माण करून आपण घातक साथींना

सोयीच्या अशा सुविधा तयार केल्या आहेत.

तरीही आपल्याला अजून तरी घाबरून जाण्याची गरज नाही.

जशा जुन्या गोष्टी निरुपयोगी होतात, दर दिवशी तंत्रज्ञान प्रगत होते,

बॅक्टेरियांची उत्क्रांती होते, माणसे संशोधन करतात, नवी प्रतिजैवके विकसित केली जातात.

समस्या खरी व गंभीर आहे पण लढाई संपलेली नाही.

जर मनवांनी योग्य खेळी केल्या तर शक्तिशाली जीव

फारसा शक्तिशाली असणारही नाही.

ही दृक्श्राव्यफित तयार करणे प्रेक्षकांच्या Patreon.com वर मिळालेल्या पाठबळांमुळे

आणि बिल व मेलिंदा फाऊंडेशन यांच्या अनुदानामुळे शक्य झाले.

जर आम्हाला आणखी काही दृक्श्राव्यफिती बनवण्यासाठी पाठबळ द्यायचे असेल तर

तुम्ही कुर्झजेसाग्ट भित्तिपत्र किंवा मग विकत घेूऊ शकता किंवा Patreon वर देणग्या देऊ शकता.

तुमच्या मदतीबद्दल आभार.

Amara.org समूहाने उपशीर्षके तयार केली.