युद्ध संपले काय? एका विसंगतीचे स्पष्टीकरण | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

हिंसाचार

आणि युद्ध

आयसिसचे विवेकशून्य क्रौर्य सुरूच आहे.

रशियन युक्रेनवर आक्रमण करत आहेत

आणि पॅलेस्टिनियन्स व इस्रायली

यांचा आपापसात संघर्ष सुरू आहे.

या घटना तुम्हाला विषण्ण करतात काय?

खरं सागायचं

तर नाही.

कारण जर तुम्ही संख्या पाहिल्यात

तर युद्धाचं अस्तित्वच नाहीसं

होईल आणि

त्याचवेळी जागतिक लोकसंख्या

कोणत्याही काळात नव्हती इतकी जास्त आहे.

असं वाटतंय् की आपण

मानवाच्या इतिहासातील

सर्वात जास्त शांततामय कालखंडात आहोत.

हे कसं शक्य आहे?

(संगीत)

आजच्या सेप्टेंबर 2014चा विचार केला तर

जगात 4 संघर्ष चालू आहेत

आणि जानेवारी 2013पासून यामुळे

10,000 लोक मृत्यू पावले.

9 संघर्षांत 1,000पेक्षा

जास्त लोक मृत्यू पावले

आणि जानेवारी 2013 पासूनच्या

13 संघर्षांत 100पेक्षा जास्त लोक मारले गेले.

हे अर्थातच शांततेचं लक्षण नव्हे.

पण जरा हे विचारात घ्याः

एकूण मिळून जेवढी युद्धं चालू आहेत

त्यातील एकही दोन देशांमधलं कृतिशील युद्ध नाही.

ती एकतर नागरी युद्धं होती

किंवा ते स्थानिक संघर्ष होते.

जरी नागरी युद्धं भयानक

आणि प्रचंड त्रास देणारी असली तरी,

त्यांचा परिणाम साम्राज्यांतील किंवा राष्ट्रांतील युद्धांच्या तुलनेत

बहुतकरून कमी प्रमाणात होतो.

जेव्हा दोन देश युद्धांत गुंततात तेव्हा

ते फार मोठं बल गतिमान करतात.

त्यांना त्यांचे सर्व स्रोत, सर्व सैन्यबळ

आणि जवळपास सर्व लोकसंख्या

या कामी उपलब्ध असते.

तर मग आपण देशांदेशांतील

युद्धांकडून देशांतील राज्यां राज्यांमधल्या युद्धांकडे

का वळलो?

विस्तारवाद आणि शीतयुद्धं यांचा

याच्याशी बराचसा संबंध आहे.

जेव्हा शीत युद्ध संपलं तेव्हा सशस्त्र संघर्षाचं प्रमुख

कारणही नाहीसं झालं.

परंतु साम्यवादी हुकूमशाहीला

मिळालेल्या संधीमुळे

नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांतील

नवे-जुने तणाव उघड झाले,

नवे संघर्ष उदयाला आले

आणि अनेक वेळा त्यामुळं यु्द्धं घडून आली.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे

1945मध्ये

जवळपास सर्व आफ्रिका, आशियाचा बहुतेक भाग

आणि लॅटिन अमेरिकेचे काही भाग

वसाहतवाद्यांच्या अंमलाखाली होते.

1990 पर्यंत काही बेटे वगळता

सर्व प्रदेश स्वतंत्र झाले.

परंतु थांबा.

तिसऱ्या जगात आजची बहुदेशीय महामंडळं

जे काही करत आहेत

वसाहतवादाएवढेच वाईट आहे असा युक्तिवाद

तुम्ही उपस्थित करू शकत नाही काय?

आपण कांगोकडे पाहूया.

बेल्जियमच्या राजाने

1885मध्ये वसाहत उभारली.

त्याचे क्षेत्र बेल्जियमच्या तुलनेत 80पट आहे.

मूळ कांगोवासियांच्या विरोधात

हिंसाचार केला गेला

आणि आर्थिक पिळवणूकीच्या अमानुष

प्रणालीने

1908 पर्यंत

जवळपास अर्ध्या लोकसंख्येला मारून टाकले.

जवळपास 10 दशलक्ष कांगोवासियांना देहान्त शासन देले गेले

किंवा ते भुकेमुळे मृत्यू पावले.

लक्षावधीना अपंग आणि भयग्रस्त केले गेले.

कांगोच्या आर्थिक पिळवणूकीला

प्राधान्य राहिले

आणि बळजबरीने श्रम करायला भाग पाडणं

1960 साली बेल्जियमच्या अंमल संपेपर्यंत

पूर्णपणे संपलेलं नव्हतं.

ही खरं तर फार पुरातन गोष्ट नाही.

म्हणजे नाही…

आजच्या गिधाडी भा़ंडवलशाही तुलनेत

वसाहतवाद खूपच वाईट होता.

तो फक्त दोन पिढ्यांपूर्वींच त्याचा शेवट झालेला आहे.

आजच्या घडीला चालू असलेले

संघर्ष

हे साठ वर्षांपूर्वी परकीय अंमलाखाली

असलेल्या प्रदेशात चालू आहेत.

पण आता परिस्थिती सुधारत आहे.

1985पर्यंत

नागरीयुद्धात एका बाजूचा विजय

होणं हे सर्वसामान्य होतं.

या उलट आता विजय दुर्मिळ झाले आहेत.

त्याचवेळी

वाटाघाटीने समझोता होण्याचं प्रमाण 10% टक्क्यांवरून

जवळपास 40% पोहोचलं आहे.

उरलेल्या जगाचं काय?

राष्ट्रराज्यांनी परस्परांवर

हल्ले करणं का थांबवलं?

त्याची 4 प्रमुख कारणं आहेत.

एक.

लोकशाहीकरण.

एकतंत्री कारभाराकडून लोकतंत्री

मार्गाकडे हळूहळू होणारा विकास.

गणतंत्रें क्वचितच् परस्परांशी लढतात.

1900पासून देशांदेशांत झालेल्या सर्व युद्धांतील

फक्त थोडीच

गणतंत्रांदरम्यान लढली गेली आहत.

दोन.

जागतिकीकरण.

आर्थिक ध्यये साध्य करण्याच्या दृष्टीने

पूर्वीप्रमाणे यु्द्धें परिणामकारक ठरत नाहीत.

बळजबरीने स्रोत कबजात घेण्यापेक्षा

ते जागतिक बाजारात खरेदी करणे

आजच्या घडीला फारच स्वस्त पडते.

इतर देशांतील लोक मृत होण्यापेक्षा ते

जिवंत असणे आपल्यासाठी अधिक मोलाचे आहे

एकंदरीत पाहता ही बऱ्यापैकी नवी संकल्पना आहे.

तीन.

युद्धं हा 20व्या शतकाचा भाग होता.

पहिल्या जागतिक युद्धापर्यंत युद्धांकडे

मानवी अनुभवांचा अनिवार्य घटक म्हणून पाहिलं जात होतं.

जेव्हा मुत्सद्देगिरी फोल ठरे

तेव्हा ध्येय साध्य करण्यासाठी

वापरायचे ते एक बहुमोल उपकरण होतं.

आज आपल्याकडे आक्रमक कृतींना बेकायदेशीर

म्हणून जाहीर करण्याचे नियम आहेत आणि

फक्त स्व-संरक्षणासाठी सैन्यबलाचा वापर करण्याचे करार आहेत.

किंवा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आधिकाराने

सैन्यबळ वापरता येते.

हे नियम अजूनही मोडले जातात पण आज

विरोध आणि नाराजी ओढवून घेतल्याशिवाय

असं करणं हे फार कठीण जातं.

तसंच हेग येथे आपलं युद्ध गुन्ह्यासाठीचं

आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.

आणि हा अगदी अलीकडचा नवोपक्रम आहे.

चार

आता बहुतकरून सीमा निश्चित झाल्या आहेत.

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर

जेव्हा बहुसंख्य देशांनी

आंतरराष्ट्रीय सीमा स्वीकारण्याचं आणि अन्य

देशांच्या स्वायत्ततेचा आदर करण्याची शपथ घेतली

तेव्हाच सामान्यतः सीमांवरून होणारी युद्धे थांबली.

पण हे सर्व म्हणजे फक्त एखादी नियमाला धरून नसणारी बाब तर नव्हे

किंवा आपण टिकावू शांतता प्राप्तीच्या मार्गावर आहोत काय?

खर सांगायचं तर

अजून तरी आपल्याला काहीही माहीत नाही.

आपल्याला यासाठी दर शतकामागे साधारणपणे एका वा दोन मोठ्या युद्धांची सामग्री

देणाऱ्या पुरेशा मोठ्या न्यादर्शाची गरज आहे

यावरून आपल्याला इतिहासाची सरासरी काढता येईल.

ते न होण्याची शक्यता

वर्तवण्यासाठी दुसऱ्या जागतिक युद्धानंतर

आपल्याला पुरेसा अवधी मिळालेला नाही.

जर येत्या 75 वर्षांत

एकादे प्रमुख युद्ध घडले नाही

तरच मानवता बदलत आहे

असे आपण खऱोखरच आत्मविश्वासाने म्हणू शकू.

म्हणून कदाचित यु्द्धं संपून जातील असं तुमच्या लक्षात आलं असेल..

अनेक ठिकाणी तिटकारा आणणारे संधर्ष चालू आहेत

पण एकंदरीत

चांगली सुधारणा होत आहे.

आणि शांतता व लोकशाही यांचा आग्रह धरून

त्यात आपण अधिक चांगली सुधारणा करू शकतो.

Amara.org समूहाने उपशीर्षके तयार केली.