मानवतेच्या मर्यादा , आपण किती दूर पोहचू शकतो | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

आपल्याला ओलांडता येणार नाही अशी सीमा आहे काय?

आपण कितीही कठोर प्रयत्न केले तरीही पोहोचू शकणार नाही अशी ठिकाणं आहेत काय ?

प्रत्यक्षात अशी ठिकाणं आहेत.

अगदी विज्ञान काल्पनिका तंत्रज्ञान विचारात घेतलं तरीही आपण आपल्या विश्वाच्या कप्प्यात बंदिस्त झालो आहोत.

हे असं का होतं? आणि आपण किती दूर जाऊ शकतो?

सामान्य आकाराच्या सर्पिल तारकामंडळाच्या; आकाशगंगेच्या शांत बाहूत आपण विसावलेले आहोत.

हा जवळपास 1000,000 प्रकाशवर्ष लांबीचा आहे.

अतिशय वजनदार अशी कृष्णविवरे केंद्रस्थानी असलेले हे तारकामंडळ अब्जावधी तारे, वायूमेघ,

गडद द्रव्य, कृष्णविवरं, न्यूट्रॉन तारे आणि ग्रह यांनी ही आकाशगंगा बनली आहे.

दुरून पाहता आपलं तारकामंडळ घनदाट वाटतं पण वास्तवात ते बहुतांशाने रिक्त अवकाशानं व्यापलेलं आहे.

आपल्या वर्तमान तंत्रज्ञानाच्या आधारे सर्वात जवळच्या ताऱ्यावर माणूस पाठवायला हजारों वर्षं लागतील.

थोडक्यात काय तर आपलं तारकामंडळ बरंच मोठं आहे.

अर्थात आकाशगंगा एकटीच नाही.

देवयानी या तारकामंडळाबरोबरीने तिच्यासोबत पन्नासपेक्षाही अधिक बटु तारकामंडळं आहेत.

यांचा मिळून स्थानिक गट बनतो.

अवकाशाचं हे क्षेत्र जवळपास दहा दशलक्ष प्रकाशवर्षं व्यासाचं आहे.

लानियाकी अतिपुंजक्यातील ती शेकड्यांनी असलेल्या तारकामंडळांच्या गटांपैकी एक आहे.

हा पुंजका लक्षावधी अतिपुंजक्यांपैकी एक आहे.

या सर्वांचं मिळून निरीक्षणाच्या आवाक्यातलं विश्व दिसतं.

आपलं भविष्य वैभवशाली आहे असं आता घडिभर गृहीत धरूया.

मानवतेनं तिसऱ्या प्रकारच्या संस्कृतीचा पल्ला गाठला आहे.

ती परग्रहवासीयांच्या हल्ल्यामुळे नष्ट झालेली नाही.

आणि तिने आपल्या सध्याच्या भौतिकीच्या आकलनावर आधारलेली आंतरतारकीय प्रवास प्रणाली विकसित केली आहे.

सर्वोत्तम दृकसंकल्पनानुसार आपल्याला किती दूर पोहोचणं शक्य आहे?

स्थनिक अतितारका गटापर्यंत तर सहजपणं…

ज्याचा मानवता हा अविभाज्य भाग आहे अशी ती सर्वात भव्य संरचना असेल.

ती नक्कीच प्रचंड असली तरी स्थनिक गट निरीक्षणाच्या आवाक्यातील विश्वाचा

केवळ 0.00000000001 % हिस्सा आहे.

क्षणभरासाठी ही संख्या बाजूला ठेवू.

निरीक्षणाच्या आवाक्यातील विश्वाच्या शंभर अब्जांशापर्यंयतच आपण मर्यादित आहोत.

खरं सांगायचं तर आपल्याला मर्यादा आहे ही सोप्या तथ्याच्या स्वरूपातील वस्तुस्थिती आहे.

आपल्याला कधीही स्पर्श करणं शक्य होणारं नाही असं विश्व आहे हे वास्तव आपल्याला भयभीत करतं.

आपण त्यापुढे का जाऊ शकत नाही?

सांगायचं तर या सगळ्याला रिक्तत्वाचं स्वरूप कारणीभूत आहे.

शून्य किंवा रिक्त अवकाश हे वास्तवात रिक्त नसतं, त्याची स्वतःची अशी आंतरिक ऊर्जा असते.

त्यालाच ‘पुंज चढ-उतार’ म्हणून ओळखतात

लहान प्रमाणात विचारात घेतलं तर तिथे सातत्याने घटना घडत असतात.

कण प्रतिकण स्वतःला निर्माण करतात आणि नामशेष करतात

ही पुंज पोकळी हा बुडबुड्यासारखा भाग असल्याची कल्पना तुम्ही करू शकता.

काही भाग घनदाट तर काही भाग कमी घन असतात.

आता आपण 13.3 अब्ज वर्षांमागे जाऊया.

या काळात अवकाश वस्त्र कशाचेही बनलेलं नव्हतं.

वौश्विक फुगणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेनंतर, म्हणजे महास्फोटानंतर निरीक्षणाच्या आवाक्यातील विश्व

सेकंदाच्या भागाइतक्या अवधीत गोटीच्या आकारापासून ते महापद्म किलोमीटर एवढ्या आकारात प्रसरण पावले.

विश्वाचे हे अचानक ताणलं जाणं इतकं वेगवान आणि टोकाचं होतं.

त्यामुळे हे सर्व पुंज चढ-उतारही ताणले गेले

आणि अणूंच्या घटकांतील अंतर हे तारकामंडळीय अंतराइतके व्यापक झाले.

यामुळे दाट व कमी दाट भाग तयार झाले.

या फुगण्यानंतर गुरुत्व एकत्रितपणे सर्वकाही पुन्हा खेचू लागलं.

मोठ्या प्रमाणावर हे प्रसरण फारच झटकन झालं आणि ते खूपच सामर्थ्यवान होतं व गुरुत्वाला त्यावर मात करणं शक्य नव्हतं..

पण लहान प्रमाणावर मात्र गुरुत्व विजयी ठरलं.

काळ जाता जाता विश्वाचे दाटीचे भाग किंवा कप्पे

आज आपण ज्यात रहातो अशा तारकामंडळांच्या स्वरूपात वाढले.

फक्त आपल्या कप्प्यातील गोष्टी - स्थानिक गटातल्या- आपल्याशी गुरुत्वाकर्षणाने बद्ध झालेल्या असतात.

पण थांबा. मग समस्या काय आहे?

आपण आपल्या कप्प्यातून पुढच्या कप्प्यात का प्रवेश करू शकत नाही?

या संदर्भात गडद ऊर्जा सर्व काही गुंतागुंतीचं करून ठेवते.

साधारणपणे सहा अब्ज वर्षांपूर्वी गडद ऊर्जेने सगळ्याचा ताबा घेतला.

ही ऊर्जा मुळातच अदृश्य बल वा परिणाम आहे

आणि तो विश्वाचं प्रसरण गतिमान करतो.

हे का घडतं किंवा गडद ऊर्जा काय आहे हे आपल्याला माहीत नाही परंतु आपण तिचा परिणाम स्पष्टपणे पाहू शकतो.

सुरुवातीच्या विश्वात स्थानिक गटाभोवती मोठे आणि थंड ठिपके होते.

ते हजारो तारकामंडळे असलेल्या गुच्छांत वा पुंजक्यात रूपांरित झाले.

भरपूर गोष्टींनी आपल्याला वेढून टाकले आहे पण त्यापैकीच्या आपल्या स्थानिक गटाच्या

बाहेरील एकाही रचनेशी आणि तारकामंडळाशी आपण गुरुत्वाकर्षणाने जोडलेलो नाही.

म्हणजे जेवढं विश्व प्रसरण पावेल तेवढंच आपण आणि अन्य

गुरुत्वीय कप्प्यांतील अंतर वाढत जातं.

कालौघात गडद ऊर्जा उरलेले विश्व आपल्यापासून दूर रेटत जाईल.

परिणामी अन्य गुच्छ, तारकामंडळं आणि गट गट आपल्याला पोहोचेच्या बाहेर जातात.

पुढचा तारकामंडळ गट मुळातच लक्षावधी प्रकाशवर्षे दूर आहे पण

ते सर्व आपल्यापासून, ज्याची कधीच तुलना करता येणार नाही अशा गतीने आपल्यापासून दूर जात आहेत.

आपण स्थानिक गटाला मागे टाकून आंतर तारकामंडळीय अवकाशातून

अंधारात उड्डाण केले तरी आपण कधीच कोठेही पोहोचणार नाही.

एकीकडे आपण अधिकाधिक अडकून राहू तितका स्थानिक गट घट्टपणे बांधला जाईल

आणि तो एकत्रित मिसळून जाऊन एक लंबवर्तुळाकार तारकामंडळ तयार होईल.

काही अब्ज वर्षांनंतर तयार होणाऱ्या या तारकामंडळाचे नवखे नसलेले नाव आहे ‘मिल्कड्रोमेडा’.

परंतु हे अधिक निराश करणारे आहे.

केव्हा ना केव्हा स्थानिक गटाबाहेरील तारकामंडळं इतकी दूर गेलेली असतील की

आणि ती खूपच फिकट असल्यामुळे त्यांची नोंदही घेता येणार नाही. आपल्यापर्यंत पोहोचणारे अल्पसंख्य फोटॉन

इतक्या लांबीच्या तरंगलांबीचे असतील की ते दिसू शकणार नाहीत.

एकदा हे घडले की बाहेरच्या स्थानिक गटाबाबत काहीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.

हे विश्व आपल्या दृष्टीसमोरून मागे पडलेले असेल.

कायमच ते सर्व दिशांनी गडद आणि रिक्त भासेल.

दूरच्या भविष्यातील मिल्कड्रोमेडात जन्मल्यामुळे

संपूर्ण विश्वात अन्य काहीही नसून फक्त आपलेच तारकामंडळ आहे असा विचार हे लोक करतील

जेव्हा हे लोक दूरच्या रिक्त अवकाशात पाहतील तेव्हा त्यांना फक्त अधिक रिक्तता आणि अंधार दिसेल.

त्याच्या पार्श्वभूमीवरचे वैश्विक प्रारण ते पाहू शकणार नाहीत.

तसेच ते महास्फोटाबद्दल काहीही जाणून घेऊ शकणार नाहीत.

आज आपल्याला जे काही माहीत आहे ते जाणून घेण्याचा मार्गही त्यांना माहीत नसणार.

प्रसरण पावत असलेल्या विश्वाबद्दल, ते कोठे सुरू झाले आणि त्याचा अंत काय असेल हे त्यांना माहीत होणार नाही.

हे विश्व स्थिर आणि शाश्वत आहे असा विचार ते करतील.

मिल्कड्रोमेडा अंधारातील एखादे बेट असेल आणि हळू हळू ते अधिक अंधारं होत जाईल.

पण तरीही महापद्म तारकांसह स्थानिक गट

हा मानवांसाठी पुरेसा मोठा असेल.

एवढं सगळं झालं तरी आपली सूर्यमाला कशी ओलांडायची हे आपण ठरवलेलं नाही.

आणि आपल्याला आपले तारकामंडळ धुंडाळायला अब्जावधी वर्षं लागतील.

कालौघातील परिपूर्ण अशा विशिष्ट क्षणी अस्तित्वात असण्याइतकं आपलं नशिब जोरदार असेल

तर आपल्याला आपलं दूरचं भविष्यच नव्हे तर बहुतांश भूतकाळही पाहता येईल.

एकाकी आणि दूरस्थ अशा स्थानिक गटाप्रमाणे,

आता जसं भव्य व नेत्रदीपक आहे तसं आपलं संपूर्ण विश्व आपण पाहू शकतो.

त्यांच्या खगोलवैज्ञानिक ब्लॉगचा येथे पाठपुरावा करा.

तुम्ही पॅट्रेऑनवर किंवा कुर्झजेसाग्ट मर्चवर आम्हाला थेट साहाय्य देऊ शकता.

त्याचा खरच फार उपयोग होतो.