बँक (पेढी) व्यवसायः स्पष्टीकरण -पैसे व कर्ज | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

आंतरराष्ट्रीय बँका (पतपेढ्या) ही गूढ प्रणाली आहे.

जगभरात 30,000 हजारांहून अधिक विविध बँका आहे.

या सर्वांची मिळून विश्वास बसणार नाही एवढी पुंजी आहे.

केवळ 10 अव्वल बँकांकडे अंदाजे 25 महापद्म अमेरिकी डॉलर्सची संपत्ती आहे.

आज जरी बँक व्यवसाय खूपच गुंतागुंतीचा वाटत असला तरी

मुळात ती जीवन सोपे करण्याची कल्पना होती.

11व्या शतकातील इटली हे व्यापाराचे युरोपीय केंद्र होते.

सर्व खंडांतील व्यापारी त्यांच्या मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी तेथे.एकत्र होत.

पण त्यात एक समस्या होती.

व्यापारासाठी खूप प्रकारची चलने वापरात होती.

पिसामध्ये व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या सात प्रकारच्या नाण्यांशी व्यवहार करावा लागे

आणि सातत्याने पैशांचा विनिमय करावा लागत असे.

हा देव-घेवीचा व्यवसाय साधारणतः बाहेरच्या बाकड्यांवर होत असे.

यामुळेच आपल्याला बँक हा शब्द मिळाला.

बँको हा बाकासाठी वापरला जाणारा इटालीय भाषेतील शब्द आहे.

प्रवासातील धोके, खोटी चलने आणि कर्जे मिळवण्यात येणाऱ्या

अडचणी यामुळे लोक विचारात पडले.

यासाठी नवे व्यवसाय प्रतिमान हवे होते.

गहाणवटदार व्यावसायिकांनी व्यापाऱ्यांना कर्ज देण्यास सुरुवात केली

त्याचवेळी जिनोआच्या व्यापाऱ्यांनी रोखीने रकमा अदा करणे विकसित केले.

युरोपभर पसरलेल्या पत-पैसा हाताळणाऱ्या बँकांच्या जाळ्यांनी

चर्च किंवा युरोपीय राजांना देखील कर्जे द्यायला सुरुवात केली.

आजची परिस्थिती काय आहे?

थोडक्यात सांगायचं तर बँका हा जोखीम व्यवस्थापन व्यवसाय आहे.

हे कार्य कसे चालते याचे सोपे केलेले रूप पुढे दिले आहे.

लोक त्यांचा पैसा बँकेत ठेवतात आणि त्यावर ते व्याजापोटी अल्प रक्कम मिळवतात.

बँक हा पैसा घेते आणि बऱ्याच मोठ्या व्याजदराने उसना देते.

ही मोजून-मापून घेतलेली जोखीम असते कारण काही कर्जदार त्यांचे कर्ज बुडवतील असे गृहीत धरलेले असते..

आर्थिक प्रणालीच्या दृष्टीने ही जोखीम घेण्याची प्रक्रिया आवश्यक आहे

यामुळे लोकांना घरे घेण्यासाठी किंवा उद्योगांना त्यांचा व्यवसाय पसरवून मोठा करण्यासाठी

ही प्रणाली स्रोत पुरवते.

बचत करणाऱ्यांकडचे वापरात नसणारे निधी बँका घेतात

आणि समाजाला काही करण्यासाठी वापरण्याच्या निधीत त्याचे परिवर्तन करतात.

बचत ठेवी स्वीकारणे, कर्जपत्रांचा व्यवसाय करणे, चलनांची खरेदी-विक्री करणे,

व्यवसायांचे परिरक्षण करणे आणि रोखीची व्यवस्थापन सेवा देणे

यांचा बँकांच्या उत्पन्न स्रोतांत समावेश होतो.

आता बऱ्याच बँकांनी जास्त जोखमीच्या

परंतु कमी अवधीत लाभ मिळवून देणाऱ्या

गोष्टींसाठी त्यांची दीर्घ मुदतीची आर्थिक उत्पादिते

पुरवण्याची पारंपरिक भूमिका आता अनेक बँकांनी त्यागली आहे आणि ती त्यांची मुख्य समस्या आहे.

आर्थिक फुगवट्याच्या कालखंडात

बहुसंख्य प्रमुख बँकांनी पत्करलेला मार्ग फारच अनाकलनीय होता.

आपल्या कारभाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा अधिलाभांश मिळवून देण्याच्या प्रस्तावापोटी

त्यांनी अल्पावधीत पैसे देणारे स्वतःच्या पद्धतीने देव-घेवीचे व्यवहार केले.

सगळ्या आर्थिक व्यवस्थांना आणि समाजांना कोलमडून टाकणारा

हा व्यवहार जुगारपेक्षा कमी नव्हता.

मागे 2008 साली,

लेहमान ब्रदर्स सारख्या बँकांनी मुळातच घरखरेदी करू इच्छिणाऱ्यांसारख्या

कोणालाही कर्जे द्यायला सुरुवात केली

तेव्हाच त्यांनी बँकांना टोकाचा धोका असलेल्या जोखमीच्या परिस्थितीत लोटले.

यातून अमेरिकेतील तसेच युरोपच्या काही भागातील घरांचा बाजार कोसळला.

यामुळे रोख्यांच्या किमती भरमसाट उतरल्या

सरतेशेवटी जागतिक बँकांची स्थिती गंभीर झाली आणि

हीच इतिहासातील सर्वात मोठी गंभीर आर्थिक परिस्थिती (महामंदी) ठरली.

कोट्यवधी डॉलर्सची निव्व्ळ वाफ झाली.

कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या आणि खूपसे पैसे गमावले.

जगातील बहुतेक प्रमुख बँकांना कोट्यवधींचा दंड भरावा लागला.

आणि बँक व्यावसायिक सर्वात कमी विश्वासार्ह ठरलेल्या काही व्यवसायिकांतील एक झाले.

बँकांना दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी आणि

बुडीत कर्जांच्या ओझ्यातून मोकळे करण्यासाठी अमेरिकी शासनाने आणि युरोपीय संघटनेने प्रचंड अर्थसाहाय्य उभे केले.

बँक व्यवसायाचा कारभार नियंत्रित करण्यासाठी नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली.

आशा प्रकारच्या भविष्यातील गंभीर आर्थिक परिस्थितीचा धक्का पचवण्यासाठीची

तजवीज म्हणून अनिवार्य बँक आणीबाणी निधी लादला गेला.

पण इतर नव्या कडक कायद्यांना बँक व्यावसायिकांच्या दबावगटांने यशस्वीपणे रोखून धरले.

आज आर्थिक पुरवठा करणारी अनेक प्रतिमाने वेगाने मूळे धरत आहेत.

वार्षिक शुल्क घेऊन आणि विक्रीवर दलाली न आकारता कार्य करणाऱ्या

गुंतवणूक बँका त्यांच्या ग्राहकांच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा देत आहेत.

कर्ज देणाऱ्या अजगरांच्या मुसक्या बांधण्याच्या हेतूने

19व्या शतकात सहकारी तत्त्वांवर चालणाऱ्या कर्ज संघटना अस्तित्वात आल्या.

थोडक्यात या सहकारी पेढ्या बँकांसारख्याच सेवा देत होत्या

परंतु केवळ नफा वाढवण्यावर भर न देता त्या सहभागी मूल्यावर लक्ष केंद्रित करत होत्या.

सदस्यांसाठी छोटा व्यवसाय सुरू करणे, शेती व्यापक करणे, किंवा कुटुंबासाठी घर बांधणे

यासारख्या मदतीच्या संधी निर्माण करून जमा रक्कम पुन्हा समूहांसाठी गुंतवणे हे त्यांचे स्व-घोषित ध्येय होते.

त्यांचे सदस्य त्यांचे नियंत्रण करतात आणि तेच लोकशाही पद्धतीने संचालक मंडळाची निवड करतात.

जगभरातील पत संघटन प्रणाली लक्षणीयरीत्या भिन्न असतात.

काही केवळ मूठभर सदस्य असलेल्या आहेत

तर काही अब्जावधी अमेरिकी डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या

आणि हजारो सदस्य असलेल्या संघटना आहेत.

या पत संघटना कोणत्या स्वरूपाची जोखीम पत्करतात हे त्यांच्या

सदस्यांसाठी निश्चित केलेल्या लाभांच्या लक्ष्यावर अवलंबून असते.

जरी हे काहीसे दुखावणारे असले तरी ते 2008 सालच्या महामंदीतही पारंपरिक बँकांच्या तुलनेत

या पत संघटना चांगल्या प्रकारे टिकाव धरून रहाण्याचे कारण स्पष्ट करते.

अलीकडे अनेक लोक छोट्या रकमेचा सहभाग देऊन, आंतरजालाचा उपयोग करून, मोठा साहसनिधी उभारण्याच्या प्रमाणातही खूप वाढ झाली आहे हे विसरून चालणार नाही.

भन्नाट दृक्श्राव्य खेळ शक्य बनवणे करण्याबरोबरीने आंतरजालाच्या

व्यासपीठाने लोकांना अल्प गुंतवणूक करणाऱ्यांच्या मोठ्या गटाकडून कर्ज मिळवणे शक्य केले आहे.

या व्यवस्थेने बँकांच्या मध्यस्थीला हुशारीने टाळले आहे.

पण हे उद्योगांसाठीही कार्य करत आहे.

किक्स्टार्टर किंवा इंडायगोगो वर असंख्य नव तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत.

आपण मोठ्या गोष्टीचे भाग आहोत हे समाधान निधी देणाऱ्या व्यक्तीला मिळते

आणि ज्यावर त्यांचा विश्वास आहे अशा कल्पनांत त्यांना गुंतवणूक करता येते.

धोका इतक्या व्यापक प्रमाणात पसरवला जाण्यामुळे

जरी उपक्रम अपयशी ठरला तरी होणारे नुकसान मर्यादित असते.

शेवटची परंतु अखेरची नसलेली बाब म्हणजे सू्क्ष्म कर्जेः

बहुतकरून विकसनशील देशात लोकांना गरीबीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी

मदत म्हणून असंख्य छोटी-छोटी कर्जे दिली जातात.

लोकांना यापूर्वी ही कर्जे मिळवणे शक्य नव्हते.

त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या पैशांची गरज होती.

पण यात वेळ घालवणे बँकांना फायद्याचे वाटत नव्हते.

सूक्ष्म कर्जे देणे हा आता अब्जावधी डॉलर्सची उलाढाल करणारा व्यवसाय म्हणून उत्क्रांत झाला आहे.

कदाचित बँक व्यवसाय तुमच्या दारातील रस्त्यावर चालत नसेल

पण बँकेची लोकांना व व्यवसायांना निधी पुरवण्याची भूमिका

आपल्या समाजासाठी कळीची आहे आणि ती त्यांनी निभावली पाहिजे.

भविष्यात ही भूमिका कोण करणार आणि ती कशी करणार

हे मात्र आपल्याला निर्णय घेऊन ठरवावे लागेल.