3 कारण न्यूक्लियर ऊर्जा खराब आहे! | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

आपण अण्विक ऊर्जेचा वापर थांबवण्याची तीन कारणे.

  1. अण्विक अस्त्रांची वेगवान वाढ.

जगातील सर्वात पहिल्या वहिल्या अण्विक चाचणीचा भडका उडाल्यानंतर

केवळ एका वर्षानंतर, 1944 साली

प्रत्येकी एक या प्रमाणे दोन अणूबॉम्बनी दोन मोठ्या शहरांचा नाश केला

आणि लगेचच अण्विक तंत्रज्ञानाने जगाच्या मंचावर हिंसक प्रवेश केला.

त्यानंतर अणूभट्टी तंत्रज्ञान वीज निर्मितीचे साधन म्हणून उत्क्रांत झाले.

परंतु ते नेहमीच अण्विक अस्त्र तंत्रज्ञानाशी

फार जवळून जोडले गेले आहे.

भट्टी तंत्रज्ञान उपलब्ध असल्याखेरीज

अण्विक अस्त्रे विकसित करणे जवळ जवळ अशक्य आहे.

वस्तुतः ज्या राष्ट्रांकडे अण्वस्त्रे नाहीत त्यांना ती देऊ नयेत यासाठी केलेला करारच

अण्विक भट्टीचा प्रसार होण्याचे प्रयोजन बनले आहे.

आणि अण्वस्त्र प्रसारांच्या विरोधात मात्र या कराराला मर्यादित यश मिळाले आहे.

गेल्या चाळीस वर्षात पाच देशांनी भट्टी तंत्रज्ञानाच्या मदतीने

स्वतःची अस्त्रे निर्माण केली आहेत.

अण्विक अस्त्र निर्मिती उपक्रम आणि शांततेसाठीचा ऊर्जा उपक्रम

यात वरवर पाहता काहीही फरक नाही ही वस्तुस्थिती आहे.

1970 मध्ये शांततापूर्ण तंत्रज्ञान छोट्या राष्ट्रांना बड्या अण्विक सत्ता अत्यंत आनंदाने विकत होत्या.

यानंतर त्यांनी स्वतःची अण्वस्त्रे

विकसित केली.

शांततापूर्ण भट्ट्यांनी नेहमीच प्राणघातक अण्विक अस्त्रांचा मार्ग सुकर केला.

  1. अण्विक कचरा आणि अण्विक इंधनांनी होणारे प्रदूषण हे फक्त किरणेत्सारी नाही

तर त्यात प्लुटोनियमसारखी अत्यंत विषारी मूलद्रव्येही असतात.

त्यांचा धोका अनेक हजारो वर्षांनी फक्त हळूहळू नाहीसा होतो

आणि त्यावर पुनर्प्रक्रिया म्हणून ओळखली जाणारी प्रक्रिया देखील होते.

वापरलेल्या अण्विक इंधनातून प्लुटोनियमचे निष्कर्षण केले जाते असा याचा अर्थ आहे.

याचा उपयोग अण्विक शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी आणि नव्याने इंधन म्हणून अशा दोन गोष्टींसाठी होऊ शकतो.

पण ते इंधन म्हणून फार कमी क्वचित वापरले जाते.

कारण त्यासाठी योग्य प्रकारची भट्टी आपल्याकडे नाही.

मिलीग्रॅम प्लुटोनियम तुमचा जीव घेईल. काही किलोग्रॅमचा अणूबॉम्ब बनवता येतो.

जर्मनी सारख्या देशात अक्षरशः

टनांनी हे मूलद्रव्य आसपास पडून आहे.

कारण दशकांपूर्वी पुनर्प्रक्रिया ही खूपच चांगली कल्पना होती

आणि

हा सर्व कचरा कोठे जाईल कारण तो महासागरात टाकण्यावर बंदी आहे.

आपण तो पुरण्याचा प्रयत्न केला पण तो हजारो वर्षे तेथे तो निश्चितपणे सुरक्षित राहील

अशी जागा मिळालेली नाही.

साधारण 40 देश मिळून जवळपास 400 भट्ट्या कार्यरत ठेवतात.

या अनेक हजारो टन अण्विक कचऱ्याचे व्यवस्थापन

करण्यासाठी सध्या गांभीर्याने विचार करून फक्त एक

कायमस्वरूपी नागरी कचरा गोदाम छोट्या फिनलँडमध्ये उघडले जात आहे.

  1. अपघात आणि आपत्ती

अण्विक ऊर्जा वापराच्या साठ वर्षांहून अधिक कालावधीतत अणू भट्ट्यांत

किंवा अण्विक कचरा व्यवस्थापनाशी संबंधित असे सात मोठे अपघात झाले.

त्यातील दोन अण्विक कचऱ्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित होते

परंतु त्यातील चारांनी लक्षणीय प्रमाणात

पर्यावरणात किरणोत्सार पसरवला.

1957, 1987 आणि 2011 मध्ये

रशियातील युक्रेन येथे आणि जपानमधील काही प्रदेश

नंतरच्या काही दशकांसाठी मानवी वसतीला अयोग्य झाले.

यामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येबाबत मोठ्याप्रमाणात मतभेद आहेत परंतु त्यांची संख्या हजारोंनी असावी.

या आपत्ती घटना पूर्णपणे भिन्न अणूभट्ट्यांत,

पूर्णपणे भिन्न राष्ट्रांत आणि अनेक दशकांच्या अंतराने घडल्या.

या संख्या पाहतांना आपण स्वतःसाठी प्रश्न उपस्थित करू शकतो.

जगातील 10% वीज पुरवठ्यासाठी दर 30 वर्षांच्या अवधीनंतर होत्याचे नव्हते करणाऱ्या

आपत्तीची किंमत मोजणे योग्य आहे काय?

दर 10 वर्षानी

पृथ्वीवर कोठेतरी फुकुशिमा किंवा चेर्नोबिल सारखे

30% अपघात घडणे योग्य आहे काय? किती प्रदेश दूषित व्हायला हवे आहेत?

आपल्याला असे व्हायला नको आहे. आपण कोठे थांबायला हवे?

मग आपण अणूऊर्जा वापरावी काय?

यात जोखीम ही लाभाच्या वरचढ आहे

म्हणून या दिशेने विचार करणे

आणि हे तंत्रज्ञान आपल्या भल्यासाठी आपण सोडून द्यायला हवे.

जर या युक्तिवादाची दुसरी बाजू ऐकायची असेल तर