जीएमओ चांगले किंवा वाईट आहेत? जेणेकरून आपले अन्न आणि आपले अन्नद्रव्ये तयार करणे. | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

जीएमओ हा विज्ञानातील वादग्रस्त विषयांपैकी एक विषय आहे.

जेनेटिक इंजिनियरिंग ही भरपूर क्षेत्रांमध्ये वापरली जाते, पण जीएम इन्सुलिनसारखे वैद्यकीय उपयोग स्विकारलेले असतानासुद्धा

वाद सुरू होतात जेव्हा विषय येतो अन्न आणि शेतीमधील उपयोगांबद्द्ल.

असे का?

सारखीच गोष्ट वेगळी का मानली जाते ?

ह्या वादाच्या मुळाशी जाऊया आणि जीएमओ विषयीचे तथ्य, भय आणि भविष्य पाहूया.

काय नैसर्गिक आहे?

मानव हजारो वर्षांपासून वनस्पती आणि प्राण्यांमध्ये जनुकीय बदल घडवून आणत आहे.

कदाचित तुमच्या काही पिकांना चांगले उत्पादन आले असेल.

कदाचित तुमच्या लांडग्यांपैकी एखादा लांडगा विशेषतः विश्वासू होता.

तर तुम्ही बुद्धी वापरली आणि ज्या वनस्पती आणि प्राण्यांचे गुण फायदेशीर होते त्यांचे प्रजनन केले.

जिवांचे गुण हे जनुकांवर(जीन) अवलंबून असतात.

त्यामुळे प्रत्येक पिढीनुसार ही जनुके (जीन) जास्त आढळायला लागतात.

आता हजारो वर्षांनंतर जवळपास आपल्या सभोवतालचे सर्वच वनस्पती आणि प्राणी हे पाळीव बनण्याअगोदरच्या स्थितीपेक्षा बरेच वेगळे आहेत.

जर माणसे हजारो वर्षांपासून जेनेटिक बदल घडवत आहे तर “जनुकीयरित्या परिवर्तित जीव” (जेनेटिकली मॉडिफाइड ओर्गनिस्म) किंवा जीएमओ का वेगळे?

चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा निवडक प्रजनन पद्धत ठेवते.

जेनेटिक इंजिनियरिंग हा घटक काढून टाकते. आपण जे गुण आपल्याला पाहिजे असतील ते आपण निवडू शकतो.

फळांना मोठे करू शकतो,

कीडीपासून संरक्षण, असे अनेक गुण.

तर लोक ह्याबाबतीत एवढे चिंतित का आहेत?

जीएमओ वाईट आहेत का?

जीएमओबद्दलच्या सर्वांत सामान्य आक्षेपापासून सुरुवात करुया.

जीन प्रवाहामुळे जीएम पिके पारंपारिक पिकांबरोबर मिसळले जाऊ शकतात आणि त्या पिकांमध्ये अनपेक्षित नवीन गुणधर्म येऊ शकतात.

एक अशी पद्धत आहे जी ह्याला पूर्णपणे रोखू शकते पण ती पद्धतसुद्धा एक मोठा जीएमओविरोधी मुद्दा आहे.

निरोधक बियाणे

म्हणजे ते वांझ बियाणे बनवू शकतात, ज्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करायला लागतील.

पण ह्या फक्त कल्पनेमुळे लोकांनी त्याला विरोध केला आणि हे तंत्रज्ञान वापरले गेले नाही.

परत आपण जीनच्या अनपेक्षित प्रसाराच्या मुद्द्यावर येतो.

काही घटना घडल्या आहेत की जीएम पिके जिथे पेरली नव्हती तिथे वाढलीत आणि मॉडिफाइड जीन पारंपारिक पिकांमध्ये आढळले.

पण जीएम पिके पूर्णपणे पारंपरिक होऊ शकत नाही .

भरपूर पिके परागण करतात आणि हे सर्व पिके एकमेकांशी संबंधित असावी लागतात.

मोकळी जागा ठेवण्यासारख्या अनेक पीक उगवण्याच्या पद्धती आहेत ज्यामुळे अनपेक्षित मिसळणे कमीतकमी केले जाऊ शकते.

पण जर जीएमओ पीक अनपेक्षितपणे नॉन-जीएमओ बरोबर मिसळल्या जाण्याची शक्यता असेल

तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे.

जीएमओ पिकांपासून मिळणारे अन्न हे नॉन-जीएमओ पिकांपेक्षा वेगळे आहे का?

हा प्रश्न अगदी सुरुवातीपासून एक प्रमुख चिंतेचा विषय राहिला आहे.

संभवनीय धोक्यांकरिता खाल्ली जाणारी जीएम पिके तपासली जातात आणि निकाल हा अनेक संघांकडून तपासला जातो.

तीस वर्षांपासूनच्या हजारो तपासण्यानंतर विज्ञान स्पष्ट आहे.

जीएमओ अन्न खाणे हे नॉन-जीएमओ अन्न खाण्यापेक्षा जास्त धोकादायक नाही आहे.

ह्याबाबतीत फक्त आमचे म्हणणे मानून घेऊ नका, ह्या माहितीचे स्तोत्र ह्या विडीओच्या description मध्ये आहे.

पण पिके जी विषारी बनण्यासाठी घडवली गेली आहेत त्यांचे काय?

उदाहरणार्थ, बीटी पिके.

बेसिलस तुरींगिएनसिस ह्या बॅक्टीरियापासून घेतलेले जीन जीएम वनस्पतींना किड्यांच्या पचनव्यवस्थेला निकामी करणारे प्रथिन बनवण्याची क्षमता देते.

वनस्पती स्वतः च कीटकनाशक बनवते.

त्याला खाणारी किडे मरतात.

हे धक्कादायक वाटते!

कीटकनाशक स्प्रे धुतली जाऊ शकतात.

पण बीटी पिकांमधले विष तर वनस्पतीच्या आतच आहे.

पण खरंतर, ही काही मोठी गोष्ट नाही.

विष हे खरंतर वेगळ्या दृष्टीकोनाचा प्रश्न आहे.

एका प्रजातीसाठी जे निरुपद्रवी आहे ते दुसर्‍या प्रजातीला मारू शकते.

उदाहरणार्थ कॉफी हे कीटकांना मारणारे विष आहे पण आपल्यासाठी हानिकारक नाही.

किंवा चॉकलेटचे उदाहरण घ्या, ते कुत्र्यांसाठी हानिकारक आहे पण आपल्यासाठी नाही.

बीटी पिके फक्त किड्यांची पचनव्यवस्था निकामी करण्यासाठी डिझाईन केलेले प्रथिन बनवतात; आपल्यासाठी ते पूर्णपणे निरुपद्रवी आहे.

तसेच एक एकदम उलटी पद्धतसुद्धा आहे.

पिके ही तणनाशकांविरुद्ध प्रतिरोधक बनवली जाऊ शकतात.

ह्या प्रकारे, शेतकरी तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकतात आणि पिकाला हानी न पोहोचवता संसाधनांसाठी झगडणार्‍या इतर वनस्पतींना मारू शकतात.

इथे आपण जीएमओच्या कमजोर मुद्द्याला हात घातला आहे

तणनाशक उद्योगासाठी ते मोठा धंदा आहेत.

अमेरिकेतील ९०% पेक्षा जास्त नगदी पिके ही तणनाशक प्रतिरोधक मुख्यत्वे ग्लाइफॉस्फेटला प्रतिरोधक आहेत.

त्यामुळे ग्लाइफॉस्फेटचा वापर भरपूर वाढला.

हे फक्त वाईटच नाही, हे इतर तण नाशकांपेक्षा माणसांसाठी भरपूर जास्त हानिकारक आहेत.

तरी, ह्याचा अर्थ असा की तण हाताळण्याच्या अनेक पद्धतींना बाजूला राखून शेतकर्‍यांना एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्यासाठी भरपूर प्रोत्साहन आहे.

हा जीएमओवरील वादामधला एक प्रमुख मुद्दा आहे.

ह्या तंत्रज्ञानावरील बरीचशी टीका ही खरंतर आधुनिक शेतीपद्धती आणि आपला अन्न पुरवठा नियंत्रित करण्याऱ्या मोठ्या उद्योगांच्या धंद्यावरील टीका आहे.

ही टीका केवळ वैधच नाही तर ती महत्त्वपूर्ण सुद्धा आहे.

आपण शेती टिकाऊ पद्धतीने केली पाहिजे.

आपल्या पर्यावरणाचे संवर्धन आणि आपला पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्यासाठी जीएमओ हे तंत्रज्ञान खरंतर एक साथीदार आहे, शत्रु नाही.

चांगले जीएमओ काय करू शकतात?

काही सकारात्मक उदाहरणे पाहुयात.

वांगे हे बांगलादेशमध्ये एक महत्त्वाचे पीक आहे पण बर्‍याचदा संपूर्ण पीक हे किड्यांमुळे उद्वस्त होते.

शेतकर्‍यांना कीटकनाशकांवर भरपूर अवलंबून राहावे लागत होते.

हे फक्त भरपूर महागच नाही तर

शेतकरी बर्‍याचदा आजारी पडत होते.

२०१३ मध्ये आलेल्या नवीन जीएम वांग्याच्या उपयोगामुळे हे थांबले.

आपण कीटकांना हानिकारक पण माणसाना निरुपद्रवी असणाऱ्या बीटी प्रथिनाबद्दल बोललो तेच प्रथिन ह्या वांग्यांमध्ये घालण्यात आले होते.

ह्यामुळे वांग्यांवरील किटकनाशकांचा वापर ८०% नी कमी झाला, शेतकर्‍यांचे आरोग्य सुधारले, आणि त्यांचे उत्पन्न बरेच वाढले.

आणि काहीवेळा जीएम पद्धत हा एकच पर्याय असू शकतो.

१९९०च्या दशकात, हवाई मधील पपईची शेती रिंगस्पोट व्हायरसच्या आक्रमणामुळे धोक्यात आली होती.

ह्यावर उपाय म्हणजे पपईंचे जेनेटिक इंजिनियरिंग वापरून त्या व्हायरसविरूद्ध लसीकरण करण्यात आले. ह्याच्याविना हवाईमधील पपईची शेती बरबाद झाली असती.

भविष्य

ह्या सर्व घटनामधून आपल्याला बरेच मर्यादित वापर कळतात. सध्या वापरातील ९९% जीएमओ हे कीटकनाशके बनवतात किंवा त्यांचा प्रतिरोध करतात.

पण आपण भरपूर काही करू शकतो.वैज्ञानिक अश्या जीएमओ वर काम करत आहेत जे आपला आहार सुधारतील.

वनस्पती जे जास्त किंवा वेगळे पोषकतत्त्वे बनवतील, जसे की अँटिऑक्सिडेंट जास्त असलेली फळे ज्यांच्यामुळे रोगांविरुद्ध झगडण्यात मदत होईल.

किंवा जास्त व्हिटॅमिन असलेला भात.

मोठ्या प्रमाणावर, आपण हवामान बदलाला संवेदनक्षम अशी पिके तयार करत आहोत.

पिके जी अनियमित हवामान आणि प्रतिकूल मातीला तोंड देऊ शकतात,

ज्यामुळे ती दुष्काळ आणि पुरांमध्ये तग धरू शकतील.

जीएमओ पर्यावरणावरील शेतीचे परिणाम कमी करण्याबरोबरच त्याला वाचवण्यात मदत करतील.

वैज्ञानिक अश्या पिकांवर काम करत आहेत जे सूक्ष्मजंतूंप्रमाणे हवेमधून नायट्रोजन घेऊ शकतील.

नायट्रोजन हे एक सामान्य खत आहे पण त्याच्या संचयामुळे भूजल प्रदूषित होते आणि हवामान बदल आणखी वाढतो.

स्वतःहून नायट्रोजन गोळा करणारी पिके एकाच वेळी दोन समस्या सोडवू शकतात.

विकसित देशांमध्ये खतांचा अधिक वापर तसेच विकसनशील देशांमध्ये खतांची कमतरता.

आपण अमेरीकन चेस्टनट झाडासारखी प्रभावी कार्बन गोळा करणारी झाडे बनवू शकू आणि हवामान बदल उलटवू शकू.

आपल्या जवळ आज जी साधने उपलब्ध आहेत त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती हीच मर्यादा आहे.

निष्कर्ष

जग दररोज ५० लाख किलो अन्न खाते.

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार 2050 मध्ये आपल्याला ७०% अधिक आवश्यकता असेल.

आपण हे अन्न अजून जंगले नष्ट करून शेत आणि माळरान बनवू शकतो, अजून कीटकनाशके वापरून मिळवू शकतो

किंवा आपण आता जी जमीन वापरात आहे त्यामधेच जीएमओ पीकांसारखे प्रभावी पद्धत वापरण्याचा मार्ग निवडू शकतो.

ह्याचा अर्थ असा की शेतजमीन वाढवण्यापेक्षा शेती सुपीक बनवण्यामुळे जीएमओ नवीन सेंद्रिय पद्धती सारखे बनू शकतात.

थोडक्यात काय तर जीएमओमध्ये शेती मोठ्या प्रमाणावर बदलण्याची क्षमता तर आहेच पण आपल्या गैरव्यवहारांचे परिणाम कमी करण्याची पण क्षमता आहे.

जीएमओ जीवावरण वाचवण्यासाठी आपले सर्वात शक्तिशाली शस्त्र बनू शकतात.

ही विडीओ बनवण्यासाठी ६०० पेक्षा जास्त तास लागली आणि हे patreon.com वरील मदतीशिवाय अशक्य असते.

जर तुम्ही संशोधन करून बनवलेल्या विडीओ बनवण्यासाठी मदत केलीत तर आमचे खरंच भले होईल!

आणि तुम्हाला स्वतःला एक पक्षी म्हणून बक्षीस मिळेल.

जर तुम्हाला जेनेटिक परिवर्तनाबद्दल अजून शिकायचे असेल, तर आम्ही ह्या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे समजवणार्‍या अजून विडीओ बनवल्या आहेत.

मथळ्याचे श्रेय description मध्ये आहे.