व्हिडिओ
ट्रान्स्क्रिप्ट
अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी जवळपास 40 वर्षांपूर्वी
उत्तेजक पदार्थांचा दुरुपयोग हा जनतेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचं जाहीर करून
उत्तेजक विरोधी लढाईची कधीही झाली नव्हती अशी जागतिक मोहीम सुरू केली आहे.
आज त्याची आकडेवारी जाहीर झाली आहे.
उद्ध्वस्त करून सोडणाऱ्या अनपेक्षित परिणामांमुळं उत्तेजक विरोधी युध्द ही प्रचंड अपयश देणारी गोष्ट ठरली आहे.
याच्या परिणामी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लोक तुरुंगात खितपत पडले आहेत.
यातूनच लॅटीन अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या देशात
भ्रष्टाचार, राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार वाढला आहे.
जगभर मानवी हक्कांची पद्धतशीरपणे पायमल्ली होत आहे.
त्याचा कोट्यवधी लोकांच्या जगण्यावर नकारात्मक परिणाम होत आहे.
दर वर्षी अब्जावधी डॉलर वाया घालवून हे घडत आहे.
यातून फक्त सामर्थ्यावान असे उत्तेजकांचे व्यापारी संघ निर्माण होत आहेत व त्यांना बळ पुरवले जात आहे.
हे घडत असताना उत्तेजकांना रोखण्याच्या लढाईचं ध्येय, उत्तेजकरहित
जग अस्तित्वात आणण्याचं ध्येय साध्य करणं पूर्वीपेक्षाही जड जात आहे.
हे का घडत आहे?
“उत्तेजकं नाही, समस्या नाहीत” हा उत्तेजक विरोधी लढाईच्या रणनीतीचा गाभा आहे.
यामुळं गेल्या काही दशकांतील बहुतेककरून सर्व प्रयत्न
उत्तेजकांचा पुरवठा समूळ नष्ट करण्यावर
आणि उत्तेजकांची वहातूक बंद करण्यावर केंद्रित केला होता.
पण यात मागणी व पुरवठा हा
बाजार बलांचा मूलभूत आधार दुर्लक्षिला जातो.
जर सर्वप्रथम मागणीत घट न करता तुम्ही पुरवठा घटवला तर
त्याची किंमत वाढते.
यामुळे कदाचित अनेक उत्पादनांची विक्री कमी करत असेल पण उत्तेजकांच्या बाबतीत ते होत नाही.
उत्तेजकांचा बाजार मूल्य-संवेदनशील नाही.
किंमत किती का असेना उत्तेजकं फस्त केली जातात. त्यात फरक पडत नाही.
म्हणूनच हा परिणाम उत्तेजकांच्या अधिक उत्पादनाला प्रोत्साहित करतो.
अधिक व्यापाऱ्यांची भरती उत्तेजकांची उपलब्धता वाढवते.
याला फुगवटा परिणाम असेही म्हणतात. जरी उत्तेजकांचं उत्पादन
किंवा प्रमुख पुरवठा मार्ग नष्ट केला तरीही शेवटच्या वापरकर्त्याला होणारा पुरवठा घटत नाही.
स्फटिकी मेथ हे याचं परिपूर्ण उदाहरण आहे.
अमेरिकी प्रशासनाने या उत्तेजकाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या
रसायनांच्या विक्रीवर कठोर निर्बंध घालून याचं उत्पादन थांबवण्याचा प्रयत्न केला.
यामुळे बड्या मेथ उत्पादकांच्या व्यवसायाला आळा घातला गेला.
परंतु याच्या परिणामी ज्या रसायनांवर निर्बंध नव्हते
अशा रसायनांचा वापर करून देशात ठिकठिकाणी हजारो लघु- उत्पादन केंद्रे,
विशेषतः बहुतकरून शहरात आणि ग्रामीण समूहांत सुरू झाली.
यावर मात करण्यासाठी काही अमेरिकी राज्यांना मेथचा हा घरगुती पुरवठा घटवण्यासाठी
आणखी काही रसायनांवर निर्बंध घालण्याची गरज वाटली.
यामुळे मेथचं लघु-उत्पादन प्रचंड प्रमाणात घटलं.
परंतु मेथचा पुरवठा मात्र तितकाच राहिला.
तत्काळ मेक्सिकोच्या व्यापाऱ्यांनी याचा ताबा घेतला आणि मोठी उत्पादन केंद्रं सुरू केली.
त्यांचं मेथ त्यापूर्वीपेक्षाही चांगलं होतं
आणि त्यांना तस्करीचा भरपूर अनुभव होता.
थोडक्यात सांगायचं तर विरोधाच्या या सर्व प्रयत्नांमुळे मेथचं उत्पादन अधिक व्यावसायिक झालं,
उत्तेजक अधिक शक्तिशाली झालं आणि हे होताना पुरवठा अजिबात घटला नाही.
ही लढाई तुम्ही पुरवठ्याच्या बाजूनं जिंकू शकत नाही.
उत्तेजक व्यापक प्रमाणात उपलब्ध आहे एवढंच नाही तर मागणीला धक्काही लागलेला नाही.
पूर्वीच्या तुलनेत शु्द्ध अशा आणखी काही उत्तेजकांची यात भर पडली आहे.
बाहेरून अमेरिकेत येणारा व अंतर्गत पुरवठा
थांबवण्याचे अमेरिकी अंमलबजावणी कार्यालयाचे अंदाजपत्रक 30 अब्ज डॉलर असून
त्याची कार्यक्षमता 1% हून कमी आहे.
जगभरातील अपरिपक्व मुलांना मादक पेयांप्रमाणेच उत्तेजकं सहज उपलब्ध होतात.
पण हे इथंच थांबत नाही.
उत्तेजक बंदी काही प्रमाणात लोकांना ती घेण्यापासून परावृत्त करू शकेल
परंतु या प्रक्रियेत एकूण समाजासाठी ते प्रचंड हानीकारक ठरेल.
या समस्यापैकी ज्यांना आपण उत्तेजकांच्या वापराशी जोडतो
त्या खरं तर त्याच्या विरोधी लढाईमुळं तयार झाल्या आहेत.
उदाहरणार्थ, बंदी उत्तेजकाला अधिक ताकदीचं बनवते.
जत्तेजक अधिक प्रभावी तितकं तुम्ही त्याला कमी जागेत साठवू शकता
त्यामुळे तुम्ही ते अधिक नफा देणारे बनवता.
दारूबंदीमुळं हीच परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यामुळे बिअरपेक्षाही कडक दारू पिण्याचं प्रमाण वाढलं होतं.
उत्तेजक बंदीमुळे जगभरात हिंसाचार व खून देखील वाढले.
टोळ्या व व्यापारी यांना वाद मिटवण्यासाठी कायदे व्यवस्था उपलब्ध नाही
म्हणून ते हिंसाचाराचा आधार घेतात.
यातून सातत वाढणारी क्रौर्याची चक्रे निर्माण झाली आहेत.
काही अंदाजांनुसार उतेजक विरोधी लढाईमुळे मानवी हत्त्यांचं
प्रमाण 25 ते 75 % वाढलं आहे.
2007 तो 2014 या कालखंडात मेस्किको या उत्तेजक पुरवण्यात आघाडीवरील देशात
अंदाजांनुसार 164,000 लोकांची हत्या झाली.
ही संख्या त्याच कालखंडात अफगाणिस्तान आणि इराक
या दोन्ही युध्द टापूंत सृत्यू पावलेल्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे.
परंतु जेव्हा पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या, हिंसाचार न करणाऱ्यांना तुरुंगांत डांबले जाते
तेव्हा उत्तेजक विरोधी युध्द समाजाला बहुधा मोठी हानी पोहोचवतं.
उदाहरणार्थ, उत्तेजक विरोधी युध्दाचा रेटा देणाऱ्यापैकी एक असणाऱ्या अमेरिकेत
यात समील असलेल्यांपैकी 5% लोक आहेत
पण जगातील या कारणाने तुरुंगांत खितपत पडलेल्यांपैकी 25% टक्के लोक अमेरिकेत आहेत.
कठोर आणि किमान अनिवार्य शिक्षा हे याचं प्रमुख कारण आहे.
अल्पसंख्यांकांना याचा विशेष त्रास भोगावा लागतो.
अमेरिकेतील कैद्यांपैकी 40% व्यक्ती आफ्रिकी अमेरिकी असतात.
आणि जेवढी श्वेतवर्णी मुलं उत्तजकांच्या अधीन असतात
त्याच्या दहा पटीने कृष्णवर्णी मुलांना उत्तेजकांसंबंधित गुन्ह्यांसाठी अटक केली जाण्याची शक्यता असते.
असो… पण आपण या दृष्टीने वास्तवात काही करू शकतो काय?
या गोंधळातून वाबेर पडण्याचा काही मार्ग आहे काय?
1980मध्ये हेरॉईनच्या वापराशी संबंधित अशी
गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या स्वित्झर्लंडमध्ये उद्भवली.
एच् आय व्हीचं प्रमाण गगनाला भिडलं आणि रस्त्यांवरील गुन्हे्यांचा समस्या निर्माण झाली.
स्विस अधिकाऱ्यांनी नवी रणनीती अजमावलीः त्यांनी हानी कमी केली.
त्यांनी हेरॉइन देखभालीची विनामूल्य केंद्रं स्थापन केली.
यांत व्यसनींवर उपचार करून त्यांचं स्थिरीकरण होऊ लागलं.
येथे लोकांना उत्तम दर्जाचं हेरऑइन विनामूल्य पुरवलं जाई.
त्यांना तेथे निर्जंतुक सुया आणि उत्तेजकं टोचून घेण्यासाठी सुरक्षित खोली,
आंघोळीची सोय, झोपण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय निगराणी उपलब्ध होती.
सामाजिक कार्यकर्ते त्यांना घरे शोधण्यासाठी आणि इतर समस्यांना तोंड देण्यासाठी मदत करत.
याच्या परिणामी उत्तेजकांसंबंधित गुन्ह्यांत तीव्र घट झाली आणि
आणि केंद्रातील दोन तृतीयांश लोकांना नियमित काम मिळालं.
कारण आता त्यांनी बरं होण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे केंद्रांना
आता त्यांच्या व्यसनासाठी पैसा पुरवावा लागत नव्हता.
आज स्वित्झर्लंडमध्ये 70 % पेक्षा जास्त हेरॉइन व्यसनींना उपचार मिळतो.
एच् आय् व्ही संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
अधिक प्रमाणात हेरॉइन घेतल्यामुळे घेतल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंत 50% घट आली आहे.
उत्तेजकांशी संबंधित रस्त्यांवरील लैंगिक व्यवहारांत आणि गुन्ह्यांत प्रचंड घट झालेली आहे.
याचा अर्थ आसा की केवळ स्वस्त असणाऱ्याच नव्हेत तर
अधिक समस्या निर्माण करता प्रत्यक्षात उपयुक्त ठरणाऱ्या अन्य पद्धती आहेत.
उत्तेजकबंदीने जी प्रणाली उभी केली तिने मानवी हक्कांवर नांगर फिरवला.
अशक्यप्राय ध्येयाच्या पाठी लागून प्रचंड पैसा खर्चला
आणि भरपूर मानवी दुःखं निर्माण केली
40 वर्षांच्या संघर्षानंतर शेवटी उत्तेजक विरोधी युध्द थांबवण्याची
आणि काहीतरी चंगलं घडवायचीवेळ आली आहे
ओपन सोसायटी फाऊंडेशन आणि प्रेक्षकांनी पॅट्रेऑनवर दिलेल्या देणग्यांतून ही
दृकिश्राव्यफित बनवली आहे.
तुम्ही उत्तेजकांच्या धेरणावर कसा प्रभाव टाकू शकाल हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर
Stop the harm campaign पाहा.
आता आमच्याकडे विक्रीयोग्य साहित्य आहे.
जर तुम्हाला कुर्झजेसाग्ट भित्तिपत्र, टीशर्ट, पेला
किंवा छोट्या सैतानाचं चिकट चित्र हवं असेल
तर तुम्ही आता ते DFTBA दुकानातून घेऊ शकता.
Amara.org समूहानं उपशीर्षकं तयार केली.