आशावादी निहिलिज्म | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

मानवाचे अस्तित्व भयभीत करणारे आणि गोंधळात टाकणारे आहे.

हजारो वर्षांपूर्वी आपण भानावर आलो व आपण स्वतःला विचित्र जागेत आढळलो.

ती इतर जीवांनी भरलेली होती. काहींना आपण खात होतो तर काही आपल्याला खात होते.

तेथे एक द्रवरूप गोष्ट होती. ती आपण पीत होतो. काही गोष्टी वापरून आपण इतर गोष्टी बनवत होतो.

दिवसभराच्या आकाशात छोटा पिवळा गोलक होता. तो आपली कातडी ऊबदार करायचा.

रात्रीचं आकाश सुंदर प्रकाशाने भरलेलं होतं.

ही जागा नक्कीच आपल्यासाठीच बनवलेली होती.

काहीतरी आपल्यावर नजर ठेवून होतं.

आपण आपल्या जागेत होतो. या भावनेने सगळंच आपल्यासाठी कमी भीतिदायक आणि कमी गोंधळाचं बनलं.

पण जसं आपलं वय वाढत गेलं तसं आपण जगाबद्दल आणि स्वतःबद्दल अधिक शिकत गेलो.

चमचमणारे दिवे आपल्यासाठी चमकत, सुंदर दिसत नाहीत. ते तेथे फक्त आहेत हे आपल्याला समजले.

ज्याला आपण आता विश्व म्हणतो त्याचं केंद्र आपण नाही हे आपल्याला कळून चुकलं.

त्यातलं बरचसं आपण विचार करत होतो त्यापेक्षांही खूपच पूर्वीपासून आहे.

आपण अनेक छोट्या मृत गोष्टींचे बनलेले आहोत.

काही छोट्या गोष्टी, काही कारणाने मृत नसलेल्या मोठ्या गोष्टी बनवतात

आणि अब्जावधी वर्षे मागे पडलेल्या इतिहासातील आपण म्हणजे एक तात्पुरती पायरी आहोत हे सर्व आपल्याला समजलं.

आपण ज्याला कधीही सोडून जाणार नाही अशा आकाशगंगांच्या गटाचा भाग असलेल्या सर्वसाधारण आकाशगंगेच्या पू्र्णपणे शांत असलेल्या एका बाहूतील

मध्यम आकाराच्या ताऱ्याभोवती भ्रमण करणाऱ्या धुळीच्या ओलसर कणावर आपण रहातो हे आपण भीतीपोटीच्या आदराने समजून घेतलं.

हजारोनी एकत्र आलेल्या आकाशगंगांच्या अतिविशाल गटातील आपली आकाशगंगा फक्त एक आहे.

पण हा अतिविशाल गट देखील अशा हजारोंनी एकत्र आलेल्या निरीक्षणक्षम विश्वाच्या गटांतील फक्त एक आहे.

हे विश्व कोट्यवधी पट मोठे असण्याची शक्यता आहे पण त्याचीआपल्याला खात्री देता येणार नाही.

आपण त्याचे वर्णन करण्यासाठी दोनशे कोटी आकाशगंगा,

महापद्म तारे, किंवा परार्ध ग्रह असे शब्द वापरू शकतो.

पण या सर्व संख्यांना काहीही अर्थ नाही. या संकल्पना आपल्या मेंदूच्या आवाक्यातल्या नाहीत.

हे विश्व फारच मोठे आहे. त्याची व्याप्ती आपल्या समजेपलीकडची आहे.

पण आपल्याला त्रस्त करणारी संकल्पना आकार ही नसून

काळ ही आहे. किंवा अधिक नेमकेपणाने सांगायचे तर आपल्यापाशी किती वेळ आहे या प्रश्नाला आपल्याला तोंड द्यायचे आहे.

शंभर वर्षे जगण्याइतके तुम्ही भाग्यवान असाल तर

तर तुम्हाला पाच हजार दोनशे आठवड्यांचा अवधी उपलब्ध आहे.

जर तुम्ही आता पंचवीस वर्षांचे असाल तर तुमच्यापाशी तीन हजार नऊशे आठवडे तुमच्या हातात आहेत.

जर तुम्ह सत्तराव्या वर्षी मरणार असाल तर दोन हजार तिनशे चाळीस आठवडे शिल्लक आहेत.

खूप वेळ आहे हा पण

पुढे काय?

तुमच्या जैविक प्रक्रिया खंडित होतील,

आणि तुम्ही, म्हणजे एक गतिमान रचना आहात, ती गतिमान असणे थांबून जाईल.

तुम्ही पूर्णपणे नाहीसे होईपर्यंत ती विरघळत राहील.

आपल्यात असा एक भाग आहे, जो आपण पाहू वा मोजू शकत नाही असा काहींचा विश्वास आहे.

यालाच जीव म्हणत असावेत परंतु आपल्याकडे हे शोधण्याचा मार्ग नाही

आणि आपण कायमचे मृत होऊन जाऊ.

अर्थात हे ऐकायला कमी भितीदायक वाटतं.

तुम्ही अस्तित्वात येण्यापूर्वी हे विश्व 13.75 अब्ज वर्षे झाली होती हे तुमच्या लक्षात राहिले नाही

तर एकादा का तुम्ही गेलात की त्यानंतर महापद्म आणि महापद्म आणि महापद्म वर्षे क्षणात येऊन जातील.

डोळे मिटा आणि एक मोजा.

इतकाच काळ गेला असं नेहमीच वाटेल.

आपल्याला जेवढं माहीत आहे त्यानुसार शेवटी विश्व मरेल अणि काहीही पुन्हा बदलणार नाही.

आमच्या दृक्श्राव्यफितीने अनेक लोकांत अस्तित्वात्मक दहशत प्रवर्तित केली असणार

आणि तिच्या शेवटच्या काही मिनिटांनी तर कोणतीच मदत दिली नसणार.

तुम्हाला पाहिजे असेल तर आता एकदा आम्ही या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊ करत आहेत.

हा मार्ग वैज्ञानिक नाही, तो व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन आहे. तेच कुर्झजेसाग्टचे तत्त्वज्ञान आहे.

तो स्वीकारताना बरोबरीने आमची अडचणही लक्षात घ्या; मानवी अस्तित्वाबद्दल आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काही माहीत नाही.

आम्ही अस्तित्वाच्या भयाला आशावादी विनाशवादाच्या मदतीने सामोरे जातो आहोत.

आम्हाला म्हणायचंय् तरी काय?

सारांशाने सांगायचे तर 200 महापद्म, महापद्म तारे आपल्यासाठी बनवले गेले असण्याची शक्यता नाही.

कसेही पाहिले तरी अस्तित्वासंबंधाने आपल्याबाबतीत सर्वात क्रूर चेष्टा केली आहे असे वाटते.

ही गोष्ट आपल्याबद्द्लची नाही हे स्व-भान आल्यानंतर आमच्या लक्षात आले.

इलेक्ट्रॉन्स आणि पेशीतील ऊर्जाघर यांच्याबद्दल माहिती असणं खरंच काहीतरी मोठं आहे यात शंका नाही.

वैफल्यग्रस्तता कमी करण्यासाठी विज्ञान खूप काही करत नाही.

हे ठीक आहे पण पुढे काय?

तुमच्या जगण्यावर भीतीचा फक्त एकच मारा झालेला आहे पण त्याने तुम्हाला मुक्तही केलं आहे.

जर विश्वाचा उष्णता मृत्यूने शेवट होणार असेल तर तुमच्या जीवनात तुम्ही सहन केलेली प्रत्येक मानहानी विसरली जाईल

सरतेशेवटी तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीला कोणतेही महत्त्व नाही.

तुम्ही केलेली प्रत्येक वाईट कृती शून्यवत होईल.

जर जीवन म्हणजे आपल्याला मिळालेले अनुभव असतील तर तेच आपल्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात.

जर विश्वाला काही तत्त्वे नसतील तर आपण एकदा निर्णय घेऊन ठरवलेली तत्त्वे संबद्ध असतील.

जर विश्वाचे काही प्रयोजन नसेल तर आपल्याला त्याचे प्रयोजन त्यावर जरबेने लादावे लागेल

कोणत्यातरी क्षणालाका होईना पण अगदी खात्रीने मानवाच्या अस्तित्वाचा अंत होणारच आहे.

पण आपण संपण्यापूर्वी आपल्याला स्वतःचे आणि आपल्याभोवतीच्या जगाचे अन्वेषण करायला हवे.

आपल्याला भावना अनुभवायला हव्यात. आपल्याला अन्न, पुस्तके, सूर्योदय आणि एकमेकांचा सहवास अनुभवायला हवा.

आपण या गोष्टींसबंधाने विचार करू शकतो हेच आश्चर्यकारक आहे ही वस्तुस्थिती आहे.

आपण प्रत्येक गोष्टीपासून विभक्त आहोत असा विचार करणे सोपे असले तरी ते सत्य नाही.

न्यूट्रॉन हा जसा ताऱ्याचा किंवा कृष्णविवराचा किंवा तेजोमेघाचा भाग आहेत

तसेच आपण विश्वाचा भाग आहोत.

याहून उत्तम बाब म्हणजे आपण त्याचा विचार करणारा आणि भावना असणारा भाग आहोत.

विश्वाचा केंद्रीय अवयव आहोत.

विश्वाच्या आकाराच्या खेळमैदानात आपण खरोखरच मुक्त आहोत.

म्हणून आपण समाधानाने जगण्याचे ध्येय ठेवू शकतो आणि ताऱ्यांत आपल्या कल्पनेतील सुराज्या उभारू शकतो.

आपल्याला जे माहीत करून घ्यायला हवं आहे ते सगळं आपल्याला सापडलेलं नाही.

या विश्वाचे जसे नियम आहेत तसे ते का आहेत हे आपल्याला माहीत नाही;

जीवन कसं अस्तित्वात आलं, जीवन काय आहे.

भान म्हणजे काय आहे किंवा या विश्वात आपण एकटेच आहोत काय याची आपल्याला कल्पना नाही.

परंतु आपण काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू शकतो.

भेट देण्यासाठी अब्जाबधी तारे आहेत, बरे करण्यासाठी रोग आहेत,

ज्यांना मदत हवी आहे असे लोक आहेत आणि अनुभवण्यासाठी समाधानाच्या भावना आहेत,

आणि संपवण्यासाठी दृक्श्राव्य खेळ आहेत.

येथे खूप काही करण्याजोगं आहे

तर मग आता आटोपतं घेताना तुम्ही बहुतेक तुम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेचा भाग चांगल्या प्रकारे वापरला असं म्हणायला पाहिजे.

जर हा आमचा जीवनावरचा एक उतारा असेल तर मजा न करण्याचे काहीही कारण नाही

आणि जीवन शक्य तितके समाधानाने जगण्याची भरपूर कारणे आहेत.

जर तुम्ही इतरांचे जीवन चांगले बनवले तर तो तुमच्यासाठी अधिलांभांश ठरेल.

जर तुम्ही आकाशगंगांचे मानवी साम्राज्य उभारण्यासाठी मदत कराल तर अधिलाभांश आणखी जास्त असेल.

स्वतःला आनंदी ठेवणाऱ्या कृती तुम्ही करा.

हे तुमच्यासाठी काय आहे हे तुम्हाला निश्चित करायला हवं.